चालू घडामोडी : १७ फेब्रुवारी


१२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा समाप्त

 • ईशान्य भारतातील पार पडलेल्या १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. केंद्रीय क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवल यांनी ही स्पर्धा संपल्याचे जाहीर केले. आसामच्या गुवाहाटी आणि मेघालयच्या शिलाँग अशा दोन शहरात ही स्पर्धा पार पडली.
 • भारताने ही स्पर्धा तिसऱ्यांदा आयोजित केली होती. यापूर्वी, कलकत्ता (१९८७), मद्रास (१९९५) या शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 • भारताने यावेळेस ३०८ पदकांची कमाई केली. त्यात १८८ सुवर्णपदके, ९० रौप्य व ३० ब्राँझपदकांचा समावेश होता. या कामगिरीसह भारताने या स्पर्धेतील आपली हुकुमत दाखवून दिली.
 • भारताने तिरंदाजी, बॅडमिंटन, बाॅक्सिंग, टेबल टेनिस आणि टेनिसह दहा खेळ प्रकारांमध्ये सुवर्णपदकांचे क्लीन स्वीप केले. भारताला सर्वाधिक ५८ पदके अॅथलेटिक्समध्ये मिळाली.
 • वैयक्तिक कामगिरीचा विचार करता श्रीलंकेचा जलतरणपटू मॅथ्यू एबेसिंघेने चमकदार कामगिरी करीत सात सुवर्णपदके पटकावली. भारतीय नेमबाज चैन सिंगने शानदार कामगिरी करत या स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले.
 • नेपाळ आगामी १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
पदकतालिका
क्रमांक देश सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण
भारत १८८ ९० ३० ३०८
श्रीलंका २५ ६३ ९८ १८६
पाकिस्तान १२ ३७ ५७ १०६
अफगाणिस्तान १९ ३५
बांगलादेश १५ ५६ ७५
नेपाळ २३ ३४ ६०
मालदीव
भूतान १५ १६

देशाच्या सौरऊर्जा निर्मितिक्षमतेत वाढ

 • केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्रोत) मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील सौरऊर्जेची निर्मितिक्षमता वाढत असून यंदा त्यात आणखी ३,७९० मेगावॉट क्षमतेने वाढ होणार आहे. मार्चअखेर ही क्षमता ९,०३८ मेगावॉट होणार आहे.
 • पुढील आर्थिक वर्षापर्यंत देशातील सौरऊर्जा निर्मिती २०,००० मेगावॉटपर्यंत पोचेल. सध्या भारतात ५,२४८ मेगावॉट सौरऊर्जा तयार केली जाते.
 • सरकारच्या राष्ट्रीय सौरऊर्जा मोहिमेचे लक्ष्य २०२०पर्यंत २०,००० वरून १ लाख मेगावॉटवर पोचणार आहे. 
 • उद्योग, घरे, संस्था, व्यावसायिक व अन्य इमारतींवरील सौर पॅनेलद्वारे तयार केली जाणाऱ्या सौर ऊर्जा इमारतीमधील रहिवाशांसाठी वापरली जाईल. उर्वरित ऊर्जेचा वापर वीज वितरण केंद्रासाठी केला जाईल.
 • या उद्दिष्टामुळे दरवर्षी तयार होणारा ६० लाख टन कार्बनचे प्रमाण कमी होऊन वैश्विक पर्यावरण बदलासंदर्भात भारताने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, असे अहवालात नमूद केले आहे.

५८वे ग्रॅमी संगीत पुरस्कार

 • लॉस एंजलिस येथे झालेल्या यंदाच्या ५८व्या ग्रॅमी संगीत पुरस्कारांमध्ये रॅपर केंड्रिक लॅमरने पाच पुरस्कार पटकावले, तर टेलर स्विफ्टच्या ‘१९८९’ या अल्बमला ‘सर्वोत्कृष्ट अल्बम’चा पुरस्कार मिळाला. लॅमरला या पुरस्कारांसाठी ११ तर, स्विफ्टला ५ नामांकने मिळाली होती.
 • लॅमरचा ‘टू पीप्स अ बटरफ्लाय’ हा अल्बम स्पर्धेत होता, मात्र स्विफ्टच्या महिला सबलीकरणासंदर्भातील अल्बमने बाजी मारली.
 • ब्रुनो मार्स आणि निर्माता मार्क रॉन्सन यांच्या ‘अपटाऊन फंक’ या गीताला ‘रेकॉर्ड ऑफ द इअर’ पुरस्कार मिळाला. ब्रिटिश गीतकार व गायक एड शिरनच्या ‘थिकिंग आउट लाउड’ या गाण्याला पुरस्कार मिळाला.
 • 'बाफ्ता' पुरस्कारावर मोहर उमटवलेल्या भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक असिफ कपाडिया यांच्या उत्कृष्ट चित्रपट संगीताच्या विभागात ‘अॅमी’ या डॉक्युमेंटरीला पुरस्कार मिळाला आहे.
 • त्याचवेळी प्रख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांना मात्र यंदाही या पुरस्काराने हुलकावणी दिली. अनुष्का यांनी पिता दिवंगत पं. रविशंकर यांच्या स्मरणार्थ होम हा अल्बम बनवला होता.

अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

 • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत. 
 • सध्याचे दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी येत्या २९ फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी येत्या १ मार्चपासून दिल्ली पोलीस आयुक्तपदाची धुरा अलोक वर्मा सांभाऴणार आहेत.
 • दिल्ली पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत अलोक वर्मा यांच्यासह १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी धर्मेद्र कुमार यांचेही नाव चर्चेत होते.
 • १९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अलोक वर्मा सध्या तिहार जेलच्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत. 

सरफराज खानचा जागतिक विक्रम

 • नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने जागतिक विक्रम केला आहे.
 • शेवटच्या सामन्यात ५१ धावांची खेळी करताना सरफराजने युवा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला.
 • स्पर्धा इतिहासात त्याने एकूण १२ सामने खेळताना, १२ डावांमध्ये ७ अर्धशतक केले आहेत. यातील ५ अर्धशतके त्याने यंदाच्या स्पर्धेत झळकावली असून, २ अर्धशतके २०१४ साली झळकावली होती.
 • अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकताना सरफराजने वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा विक्रम मोडला. ब्रेथवेटने २०१२ साली झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत सहा अर्धशतके साजरी केली होती.
 • तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सरफराज तिसऱ्या स्थानी असून, त्याने १२ सामन्यांत ५६६ धावा काढल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा