चालू घडामोडी : ११ मार्च

मुंबई-नागपूर मार्गावर हायस्पीड रेल्वे

  • स्पेनच्या मदतीने देशात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यातूनच बुलेट ट्रेनच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन हायस्पीड रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.
  • दोन टप्प्यांत देशातील प्रमुख मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई-नागपूर या नवीन मार्गाचे तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई-कोलकाता मार्गाचे नियोजन आहे.
  • राज्याच्या राजधानी व उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सुमारे चार तासांत कापले जाईल.
  • या प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी स्पेनच्या चार सदस्यीय समितीने मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाला भेट दिली.
 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रमुख वैशिष्ट्ये 
  • मुंबई-नागपूर पहिला टप्पा
  • मुंबई-कोलकाता दुसरा टप्पा
  • तीन हजार किलोमीटरचे अंतर जोडले जाणार
  • प्रकल्पासाठी आठ वर्षांचा कालावधी अपेक्षित
  • स्वतंत्र डबल लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करणार
  • रेल्वेस्थानक व बसस्थानक राहणार एकमेकांजवळ
  • सध्याचा रेल्वेमार्ग कायम ठेवून नवीन मार्ग उभारण्याचा मानस
  • भारतीय रेल्वे विकास निगम लिमेटडअंतर्गत प्रकल्प

शेष भारताचे २६व्यांदा इराणी चषक विजेता

  • फलंदाजांच्या दिमाखदार सांघिक कामगिरीच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध ४८० धावांचे लक्ष्य पेलत जेतेपदाची कमाई केली. शेष भारत संघाने २६व्यांदा चषकावर नाव कोरले.
  • रणजी स्पर्धेतील विजेता आणि शेष भारत संघ यांच्यामध्ये इराणी चषक स्पर्धा खेळविण्यात येते. यंदाची रणजी स्पर्धा मुंबई संघाने जिंकली आहे, त्यामळे मुंबई संघ व शेष भारत संघ यांच्यात इराणी चषकासाठी स्पर्धा होती.
  • चौथ्या डावात ४८० धावांचे प्रचंड लक्ष्य मिळालेल्या शेष भारताने पाचव्या दिवशी १ बाद १०० धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली.
  • ब्रेबर्न स्टेडियमवर झालेल्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी ३८० धावांची गरज होती व शेष भारताने ही लढत ४ विकेटस राखून जिंकली.
  • सलामीवीर फैझ फझलने १२७ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. सुदीप चॅटर्जी (५४), करुण नायर (९२) आणि शेल्डन जॅक्सन (नाबाद ५९) यांनीही निर्णायक खेळ केला.

लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’

  • महाराष्ट्र वन विभागाने आपल्या डेपोतील लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’ तयार केले आहे. हा देशातील पहिला प्रयोग असून, वन विभागाने या ई-लिलाव पद्घतीचा अलीकडेच बल्लारशा येथील डेपोतून शुभारंभ केला.
  • लाकडांच्या लिलाव प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सहभागी होता यावे, या हेतूने ही पद्घती सुरू करण्यात आली आहे. यात लोकांना देश-विदेशात कुठेही बसून वन विभागातील लाकडांची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात बल्लारशा येथे हा ई-लिलाव सुरू केला असून, यानंतर परतवाडा व यवतमाळ येथील जोडमोहा डेपोतसुद्घा ही पद्घती सुरू करण्याचा मानस वन विभागाचा मानस आहे.
  • सध्या बल्लारशा येथील लिलावासाठी प्रत्येक महिन्यातील १६ व १७ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
  • या पद्धतीमुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, वन विभागाच्या तिजोरीतील महसूल वाढण्याची अपेक्षा आहे.

अशा प्रकारच्या सर्व नोट्स Offline असताना तुम्हाला वाचायच्या असल्यास “MPSC Toppers”चे Mobile Application डाउनलोड करा.
कृपया तुमच्या मित्रांना हे Application नक्की शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा