जगभरातील रसिकांना उत्सुकता असलेल्या ८८व्या ऑस्कर अकादमी चित्रपट पुरस्कार वितरणाचा सोहळा लॉस एंजलिस येथे पार पडला.
चर्चमधील मुलांच्या लैंगिक शोषणाची भांडाफोड करणाऱ्या पत्रकारांची गोष्ट सांगणाऱ्या टॉम मॅककार्थे दिग्दर्शित ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटाने यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला.
लिओनार्डो डी काप्रिओला ‘रेव्हनंट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ब्री लार्सन या अभिनेत्रीला ‘रूम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
जॉर्ज मिलर दिग्दर्शित ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ने संकलन, निर्मिती, ध्वनी संकलन, मिक्सिंग, कॉस्च्युम आणि मेकअप व हेअरस्टाइल अशा सहा तांत्रिक पुरस्कारांत बाजी मारत सर्वाधिक पुरस्कार पटकावले.
‘रेव्हनंट’चे दिग्दर्शक अलहोद्रो इन्यारितू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ऍलेसिया विकॅंडरला (द डॅनिश गर्ल) सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा तर मार्क रायलन्स (ब्रिज आॅफ स्पाइज) यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
भारतीय वंशाचे दिग्दर्शक आसिफ कापडिया यांच्या ‘एमी’ या माहितीपटालाही पुरस्कार मिळाला. एमी वाइनहाउस या जाझ गायिकेच्या आयुष्यावर हा माहितीपट बेतला आहे.
या सोहळ्यात हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्राला पुरस्कार प्रदान करण्याचा मान मिळाला.
Best
ReplyDeletepdf format nahi ka sir
ReplyDeleteNICE SIR
ReplyDelete