चालू घडामोडी : २७ व २८ एप्रिल

‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेला सुरुवात

 • युद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी ‘हार्ट ऑफ एशिया’ ही परिषद २७ एप्रिलपासून सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.
 • पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
 • दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद या दोन आव्हानांचा सामना करण्याबाबत या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे.
 • अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे.
 • अफगाणिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्याबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे करार करण्याबाबतही उपस्थित देशांमध्ये चर्चा होईल.
 भारताची भूमिका 
 • अफगाणिस्तानमधील स्थैर्य आणि सुरक्षेसाठी आशियामधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट करावेत, ही भारताची प्रमुख मागणी आहे.
 • दहशतवाद्यांना असणारी आर्थिक रसद तोडून त्यांना मिळणारा पाठिंबा थांबविण्याबरोबरच मूलतत्त्ववादी आणि फुटीरतावादी यांच्याविरोधातही कारवाई करण्याबाबत भारत आग्रही आहे.
 • अफगाणिस्तानमध्ये संपर्क आणि दळणवळण जाळे विकसित करून आंतरराष्ट्रीय बाजाराशी त्यांना जोडणे, हा परिस्थिती सुधारण्याचा चांगला मार्ग असल्याचेही भारताचे म्हणणे आहे.
 हार्ट ऑफ एशिया 
 • २०११पासून ‘हार्ट ऑफ एशिया’ या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरवात झाली असून, आतापर्यंतच्या सर्व परिषदांमध्ये भारताने ठोस भूमिका मांडली आहे.
 • या परिषदेमध्ये अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे.
 • तसेच, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, इजिप्त, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीडन, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय युनियनचा परिषदेला पाठिंबा आहे.

सचिन तेंडुलकर यांची खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला मदत

 • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. या जिल्ह्यातील तीन गावांना विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. 
 • बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील माध्यमिक शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी तेंडुलकर यांनी ४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 • दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोन्हाळी गावातील अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी व पथदिव्यांसाठी तेंडुलकर यांनी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 • करमाळा तालुक्यातील पोमलवाडी व पसिरातील रस्त्यांच्या कामांसाठी तेंडुलकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

ई-कॉमर्समध्ये अॅमेझॉन इंडिया दुसऱ्या स्थानी

 • ई-कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार, अॅमेझॉन इंडिया ही स्नॅपडीलला मागे टाकत सर्वाधिक उत्पादनांची विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.
 • पहिल्या क्रमांकावर अद्यापही फ्लिपकार्टचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे परदेशातील अॅमेझॉनचे भारतीय बाजारपेठेत वाढणारे महत्त्व अधोरेखित होत आहे. 
 • गेल्या महिन्यात माल वितरणाचा विचार केला असता, फ्लिपकार्टची बाजारपेठेत ३७ टक्के हिस्सेदारी होती. तर अॅमेझॉन इंडिया व स्नॅपडीलची हिस्सेदारी अनुक्रमे २४ व १५ टक्के होती.
 • गेल्या महिन्यात ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिवसाला ८ ते ९ लाख वस्तूंचे वितरण केले आहे.
 • अॅमेझॉनने भारतीय व्यवसायात जानेवारी महिन्यापासून ६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी अॅमेझॉन इंडियाची २५० टक्के दराने वाढ झाली आहे.

सुदर्शन पटनाईक यांना आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक

 • प्रख्यात भारतीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
 • त्यांनी या स्पर्धेत अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५ फुटांची कलाकृती साकरली होती.
 • या यशानंतर रशियातील भारताचे राजदूत पंकज सारन यांनी पटनाईक यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत जगभरातील २० वाळू शिल्पकार सहभागी झाले होते.

कन्हैया कुमारचा ‘बिहार ते तिहार’ प्रवास

 • जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता पुस्तकरूपाने आपला जीवनप्रवास मांडणार आहे. ‘बिहार ते तिहार’ असे या पुस्तकाचे नाव आहे. 
 • हैदराबादमधील वेमुला प्रकरणानंतर जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 • कन्हैयाची सुटका झाल्यानंतर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तो आपल्या भाषणात जोरदार टीकास्त्र सोडत आहे.
 • बिहारमधील एका छोट्या खेड्यातून पुढे आलेल्या या विद्यार्थी नेत्याचा जीवनप्रवास देशातील विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न जुग्गरनॉट प्रकाशन करणार आहे.

No comments:

Post a Comment