चालू घडामोडी : १४ जून

उद्योगपती विजय मल्या फरार घोषित

  • भारतातील बॅंकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्जे थकवून भारत सोडून गेलेले उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. 
  • अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईच्या विशेष न्यायालयात मल्ल्या यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती. 
  • एकापेक्षा अधिक अटक वॉरंट आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अजामीनपात्र अटक वारंट असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम ८२ खाली मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
  • आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नुकतीच विजय मल्ल्या याची मुंबई आणि बेंगळुरू येथील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
  • विजय मल्ल्याला ईडीने भारतात परत येण्यासाठी अनेकदा समन्स पाठवले होते. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच एप्रिलमध्ये मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे.

चीन व दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

  • दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादावरुन निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन व दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस १४ जून रोजी प्रारंभ झाला.
  • दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन येथील राजकीय परिस्थिती तणावग्रस्त झाली आहे. युक्सी या चीनमधील शहरामध्ये ही बैठक होत आहे.
  • आसिआन या दक्षिण आशियामधील १० देशांच्या संघटनेमधील ४ देशांनी दक्षिण चिनी समुद्रामधील चीन दावा करत असलेल्या भागावर आपला अधिकार असल्याचे म्हटले आहे.
  • या वादग्रस्त भागामध्ये चीनकडून तेल व नैसर्गिक वायुसाठी उत्खनन करण्यात येत असल्यासंदर्भात व्हिएतनामने तीव्र निषेध नोंदविला आहे.
  • तसेच चीनच्या जवळजवळ संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावरील दाव्याविरोधात फिलीपीन्सने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली आहे.
  • या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

जगातील १० बुद्धिमान देशांची यादी

  • अमेरिकेतील मिन्नेआपोलिस या शहरातील 'गॅझेट रिव्ह्यू' कंपनीने बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था व काही चाचण्यांच्या आधारे एक सर्व्हे केला असून त्याद्वारे जगातील १० बुद्धिमान देशांची नावे जाहीर केली आहेत.
  • यामध्ये पहिल्या क्रमांकावर हाँगकाँग, दुसऱ्या स्थानी दक्षिण कोरिया व तिसऱ्या क्रमांकावर जपान असून शेवटच्या म्हणजेच १० व्या स्थानावर स्वीडन हा देश आहे. 
जगातील १० बुद्धिमान देश
क्र. देश बुध्यांक
१. हाँगकाँग १०७
२. दक्षिण कोरिया १०६
३. जपान १०५
४. तैवान १०४
५. सिंगापूर १०३
६. नेडरलँडस १०३
७. इटली १०२
८. जर्मनी १०२
९. ऑस्ट्रिया १०१
१०. स्वीडन १०१

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

  • चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमी होत असलेली संख्या यामुळे सरकार चिंतेत असून सरकारने चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन केले आहे. 
  • चीन सध्या देशातील स्पर्म बँकांमधील वीर्याच्या कमतरतेचा सामना करतो आहे. त्यामुळेच चीन सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • हे संकट लक्षात घेऊन तरुणांना आकर्षित करण्यासाठी स्पर्म डोनेट करणाऱ्यास १००० डॉलर्स देण्यापासून ते मोफत आयफोनपर्यंतच्या आकर्षक योजना राबविण्यात येत आहेत.
  • अलीकडेच चीन सरकारने देशातील लोकांना दोन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.

हॅमिल्टनकडून जेतेपद मोहम्मद अली यांना अर्पण

  • फॉर्म्युला-वन शर्यतीमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लुइस हॅमिल्टनने कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत मिळवलेले विजेतेपद दिवंगत महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांना अर्पण केले आहे.
  • हॅमिल्टनने फॉर्म्युला-वन शर्यतीत आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ४५वा विजय मिळवला. सेबॅस्टियन व्हेटेलने या शर्यतीत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र नंतर हॅमिल्टनने त्याला मागे टाकले.
  • त्याने ही शर्यत एक तास, ३१ मिनिटे, ५.२९६ सेकंदांत पूर्ण केली. त्याच्यानंतर पाच सेकंदांनी व्हेटेलने शर्यत पार केली. विल्यम्स संघाच्या व्हालटेरी बोटासने तिसरे स्थान मिळवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा