चालू घडामोडी : १९ जून

पंतप्रधानांच्या हस्ते दुराईअप्पा स्टेडियमचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी संयुक्तपणे जाफना येथील फेरबांधणी केलेल्या दुराईअप्पा स्टेडियमचे उद्घाटन केले.
  • हे उद्घाटन मोदी यांनी नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले, तर सिरीसेना घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित होते. 
  • दुराईअप्पा स्टेडियमच्या फेरबांधणीसाठी भारताने केलेल्या आर्थिक मदतीसाठी सिरीसेना यांनी भारताचे आभार मानले. 
  • जाफनाचे पहिले महापौर दिवंगत अल्फ्रेड थंबीराजा दुराईअप्पा यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी भारताने सात कोटी रुपयांचा निधी पुरविला होता.
  • या स्टेडियमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगासने करण्यात आली. यामध्ये सुमारे आठ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता.

अन्नू राणी व शिवलाल सिंहला सुवर्णपदक

  • बुडापेस्ट ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अन्नू राणी व शिवलाल सिंहने उत्कृष्ट कामगिरी करून भालाफेक प्रकारात अनुक्रमे महिला व पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले. 
  • राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या अन्नू राणीने ५७.२४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या गटात दक्षिण आशियाई स्पर्धेतील विजेती सुमन देवीने ५५.३८ मीटर भाला फेकून रौप्यपदक जिंकले.
  • पुरुषांच्या गटात शिवलाल सिंहने ७६.७४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. राजिंदर सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

युनिव्हर्सिटी ऑफ जिहादला ३० कोटी रुपयांची मदत

  • पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद’ अशी ओळख असलेल्या दारूल उल हक्कानिया या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे.
  • १९४७मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मदरसाचे मुख्य सध्या मौलाना सामी उल-हक आहेत. हे मौलाना पाकिस्तानमधील ४० पेक्षा जास्त संघटनांची एकत्रित संस्था असलेल्या दिफा-इ-पाकिस्तानचेही अध्यक्ष आहेत.
  • दिफा-इ-पाकिस्तानमध्ये जमात उद दवा आणि सिपाह-इ-सहाबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे.
  • या मदरशामध्ये तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर याच्यासहित इतर अनेक अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी शिक्षण घेतले आहे. ओमर याला या मदरसाकडून मानद डॉक्टरेटही देण्यात आली आहे. 
  • तेहरिक-इ-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार या प्रांतामध्ये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा