केंद्रीय मंत्रिमंडळ : विस्तार आणि फेरबदल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदल व दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत १० राज्यांमधील १९ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले तर ५ विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले.
  • राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात या १९ जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि सध्या राज्यमंत्री असलेले प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
 महत्त्वाचे बदल 
  • अरुण जेटली यांच्याकडे माहिती व प्रसारण या जादा खात्याचा कार्यभार होता. ते खाते आता वेंकय्या नायडू यांना देताना, त्यांच्याकडील नगरविकास खाते कायम ठेवण्यात आले आहे.
  • वेंकय्या नायडू  यांचे संसदीय कार्य खाते अनंतकुमार यांना मिळाले आहे. अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते हे खातेही असेल.
  • स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास खाते प्रकाश जावडेकर यांना दिले असून, इराणी या आता वस्त्रोद्योग हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते दिलेले आहे.
  • सदानंद गौडा यांच्याकडून कायदा खाते काढून घेण्यात आले असून, त्यांनाही कमी महत्त्वाचे सांख्यिकी व योजना अमलबजावणी खाते दिले आहे.
  • माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
 या पाच राज्यमंत्र्यांना का काढले? 
  • रामशंकर कथेरिया : संसदेत आणि बाहेर केलेली वादग्रस्त वक्तव्ये
  • निहालचंद : बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप
  • संवरलाल जाट : संसदेतील गैरहजेरी आणि अकार्यक्षमता
  • मोहनभाई कुंडेरिया : योगा कार्यक्रमात लहान मुलांच्या अंगावरून चालत असल्याची चित्रफीत
  • मनसुखभाई वसावा : अकार्यक्षमता

  • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल आणि खातेवाटपानंतर कोणाकडे कुठले खाते आहे, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे :
केंद्रीय मंत्रिमंडळ
नरेंद्र मोदी (पंतप्रधान) सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि अन्य मंत्र्यांकडे देण्यात न आलेली उर्वरित सर्व खाती.
कॅबिनेट मंत्री
राजनाथसिंह गृह
सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार, परदेशातील भारतीय व्यवहार
अरुण जेटली अर्थ, कंपनी कामकाज
एम. व्यंकय्या नायडू नगरविकास, गृहबांधणी आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन, माहिती आणि प्रसारण
नितीन गडकरी रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
मनोहर पर्रीकर संरक्षण
सुरेश प्रभू रेल्वे
डी. व्ही. सदानंद गौडा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
उमा भारती जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
डॉ. नजमा हेपतुल्ला अल्पसंख्याक विकास`
रामविलास पासवान ग्राहक व्यवहार (संरक्षण), अन्न, नागरी पुरवठा
कलराज मिश्र सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग
मेनका गांधी महिला व बालकल्याण
अनंतकुमार हेगडे रसायने आणि खते, संसदीय कामकाज
रविशंकर प्रसाद कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
जगतप्रकाश नड्डा आरोग्य आणि कुटुंबकल्याण
अशोक गजपती राजू नागरी विमान वाहतूक
अनंत गंगाराम गीते अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
हरसिम्रत कौर बादल अन्नप्रक्रिया उद्योग
नरेंद्रसिंह तोमर ग्रामविकास, पंचायती राज, पेयजल आणि स्वच्छता
चौधरी वीरेंद्रसिंह पोलाद
ज्युएल ओराम आदिवासी विकास
राधामोहनसिंह कृषी आणि शेतकरी कल्याण
थावरचंद गेहलोत सामाजिक न्याय आणि सबलीकरण
स्मृती झुबिन इराणी वस्त्रोद्योग
डॉ. हर्ष वर्धन विज्ञान-तंत्रज्ञान, भू-विज्ञान
प्रकाश जावडेकर मनुष्यबळ विकास
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
राव इंद्रजितसिंह नियोजन (स्वतंत्र कार्यभार), नगरविकास, गृहबांधणी आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन
बंडारू दत्तात्रय कामगार आणि रोजगार
राजीवप्रताप रुडी कौशल्य विकास आणि उद्योजकता
विजय गोयल युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
श्रीपाद नाईक आयुष
धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
पीयूष गोयल ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा, खाणी
डॉ. जितेंद्रसिंह ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग
निर्मला सीतारामन वाणिज्य आणि उद्योग
डॉ. महेश शर्मा सांस्कृतिक कार्य, पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)
मनोज सिन्हा दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वे
अनिल माधव दवे पर्यावरण, वन आणि हवामानबदल
राज्यमंत्री
जनरल व्ही. के. सिंह परराष्ट्र व्यवहार
संतोषकुमार गंगवार अर्थ
फग्गनसिंह कुलस्ते आरोग्य आणि कुटुंबकल्याण
मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक विकास, संसदीय कामकाज
एस. एस. अहलुवालिया कृषी आणि शेतकरी कल्याण, संसदीय कामकाज
रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सबलीकरण
डॉ. सुभाष रामराव भामरे संरक्षण
रामकृपाल यादव ग्रामविकास
हरीभाई चौधरी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
गिरिराजसिंह सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
हंसराज अहिर गृह
जी. एम. सिद्धेश्वरा अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
रमेश जिगजिणगी पेयजल आणि स्वच्छता
राजन गोहेन रेल्वे
पुरुषोत्तम रुपाला कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायती राज
एम. जे. अकबर परराष्ट्र व्यवहार
उपेंद्रसिंह कुशवाह मनुष्यबळ विकास
राधाकृष्णन पी रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
किरेन रिजिजू गृह
किशनपाल गुज्जर सामाजिक न्याय आणि सबलीकरण
जसवंतसिंह भाभोर आदिवासी विकास
डॉ. संजीवकुमार बालियां जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
विष्णुदेव साई पोलाद
सुदर्शन भगत कृषी आणि शेतकरी कल्याण
वाय. एस. चौधरी विज्ञान-तंत्रज्ञान, भू-विज्ञान
जयंत सिन्हा नागरी विमान वाहतूक
राज्यवर्धनसिंह राठोड माहिती आणि प्रसारण
बाबुल सुप्रियो बराल नगरविकास, गृहबांधणी, नागरी गरिबी निर्मूलन
साध्वी निरंजन ज्योती अन्नप्रक्रिया उद्योग
विजय सांपला सामाजिक न्याय आणि सबलीकरण
अर्जुनराम मेघवाल अर्थ, कंपनी कामकाज
डॉ. महेंद्रनाथ पांडेय मनुष्यबळ विकास
अजय टमटा वस्त्रोद्योग
कृष्णा राज महिला आणि बालकल्याण
मनसुख मंडाविया रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, रसायने आणि खते
अनुप्रियासिंह पटेल आरोग्य आणि कुटुंबकल्याण
सी. आर. चौधरी ग्राहक व्यवहार (संरक्षण), अन्न आणि नागरी पुरवठा
पी. पी. चौधरी कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान

No comments:

Post a Comment