चालू घडामोडी : १ जुलै

भारत सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा देश

  • सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा देश म्हणून भारताने जगात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
  • जगभरात सर्वत्र रासायनिक अवशेषमुक्त शेतीचे महत्त्व वाढत असताना, भारतानेदेखील या क्षेत्रात आपण मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. 
  • ‘इंटर-फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रिकल्चर मूव्हमेंट’ (आयफोम) या सेंद्रिय शेती क्षेत्रातील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संघटनेने ही माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
  • २०१४पर्यंतच्या आकडेवारीचा आधार घेता सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या यादीत भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • जगात सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांची संख्या (साडेसहा लाख) भारतामध्येच असल्याचे अहवालात म्हटले आहे. युगांडा (१,९०,५५२) आणि मेक्सिको (१,६९,७०३) जगात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • जगातील सेंद्रिय उत्पादकांच्या एकूण संख्येतील बहुतांश म्हणजे ७५ टक्के शेतकरी आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेतील आहेत. 
 अहवालातील काही ठळक बाबी 
  • २०१४पर्यंत जगात सेंद्रिय शेती करणारे एकूण शेतकरी : २३ लाख (१९९९मध्ये २ लाख) 
  • जगातील सेंद्रिय शेतीचे एकूण क्षेत्र : ४३.७ दशलक्ष हेक्टर (१९९९मध्ये ११ दशलक्ष हेक्टर)
  • भारतातील सेंद्रिय शेतीचे एकूण क्षेत्र : ७.२ लाख हेक्टर
  • सेंद्रिय प्रमाणीकरणांतर्गत क्षेत्र आलेल्या किंवा येऊ घातलेल्या देशांची एकूण संख्या : १७२
  • सर्वाधिक सेंद्रिय क्षेत्र असलेला देश : ऑस्ट्रेलिया (१७.२ दशलक्ष हेक्टर)
  • सेंद्रिय अन्न आणि पेये यांची २०१४मधील जागतिक विक्री : ८० अब्ज डॉलर 

भारतीय सौरक्षेत्राला जागतिक बॅंकेची एक अब्ज डॉलरची मदत

  • सौरऊर्जेच्या वापरासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत जागतिक बॅंकेने या क्षेत्राच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.
  • तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली १२१ देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही (आयएसए) बॅंकेने करार करत जागतिक स्तरावर सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.
  • या करारामुळे जागतिक बॅंक ही ‘आयएसए’ची आर्थिक भागीदार बनली आहे. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम हे सध्या भारतात आले आहेत.
  • सौरक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची जागतिक बॅंकेची ही पहिलीच वेळ आहे.

‘बराक ८’ची यशस्वी चाचणी

  • ३० जून रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील संरक्षण तळावरून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘बराक ८’ची चाचणी घेण्यात आली.
  • सुरक्षेसाठी चाचणीच्या आधी ओडिशाच्या चंडीपूर रेंजजवळील ७ गावांमधील ३६०० लोकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. 
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘बराक ८’ ची क्षमता ७० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे. याची लांबी ४ मीटर असून यावर ६० किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते.
  • या क्षेपणास्त्रात ‘मल्टिफंक्शनल सर्व्हेलिअंस‘ ही प्रणाली असून हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही. भारत व इस्राईलने संयुक्तरीत्या या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.

राज्यसभेतील नवनियुक्त ९६ टक्के खासदार कोट्यधीश

  • असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) ने जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार राज्यसभेतील नवनियुक्त ५७ खासदारांपैकी ५५ म्हणजेच ९६ टक्के खासदार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. 
  • राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या मालमत्तेची सरासरी ३५.८४ कोटी रुपयांची आहे.
  • सध्याच्या खासदारांमध्ये २५२ कोटींपेक्षाही जास्त संपत्ती असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत.
  • तर कॉंग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्याजवळ २१२.५३ कोटी व बसपाचे सतीश चंद्र मिश्रा यांच्याजवळ १९३ कोटींची मालमत्ता आहे.
  • राज्यसभेवर ५७ सदस्यांची नव्याने निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे १७, कॉंग्रेसचे ९, समाजवादी पक्षाचे ७, अण्णाद्रमुकचे ४ तर बिजू जनता दलाचे ३ सदस्य निवडून गेले आहेत.
  • यासह संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाजवादी पक्ष व तेलगू देसम पक्षाचे प्रत्येकी दोन खासदार आहेत.
  • अकाली दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना तथा वायएसआर कॉंग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य निवडून गेले आहेत. सध्याच्या राज्यसभा सदस्यांमध्ये एका अपक्ष उमेदवाराचाही समावेश आहे. 
  • एकूण ५५ नव्या कोट्यधीश खासदारांपैकी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार वगळता बाकी १५ राज्यसभा सदस्य कोट्यधीश आहेत.

भारताच्या पहिल्या एकात्मिक संरक्षण दळणवळण यंत्रणेचे उद्घाटन

  • केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताच्या पहिल्या एकात्मिक संरक्षण दळणवळण यंत्रणेचे उद्घाटन केले.
  • यामुळे लष्कर, हवाई दल, नौदल आणि विशेष दले यांच्यात माहितीची तातडीने देवाणघेवाण होऊन निर्णयप्रक्रिया वेगवान होण्यास मदत होणार आहे.
  • अत्यंत सुरक्षित आणि धोरणात्मक असलेल्या संरक्षण दळणवळण यंत्रणेची (डीसीएन) व्याप्ती लडाख आणि ईशान्य भारतापासून ते सर्व बेटांपर्यंत असणार आहे.
  • तीनही दलांमध्ये आपापली दळणवळण यंत्रणा असताना तिघांना जोडणारी ही पहिलीच यंत्रणा आहे.
  • सर्व संरक्षण दलांमध्ये योग्य संपर्क आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने सहाशे कोटी रुपये खर्च करून प्रयत्नपूर्वक ही यंत्रणा तयार केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा