चालू घडामोडी : २ जुलै

‘तेजस’ हवाई दलात दाखल

  • स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ या लढाऊ विमानाची पहिली तुकडी १ जुलै रोजी हवाई दलात दाखल करण्यात आली. या दोन विमानांच्या या तुकडीला ‘फ्लाइंग डॅगर्स’ (४५ स्क्वाड्रन्स) असे नाव देण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ही विमाने तयार केली आहेत.
  • ‘तेजस’च्या या तुकडीचा पहिला तळ बंगळूरमध्येच असणार असून, दोन वर्षांनंतर तो तमिळनाडूतील सुलूर येथे हलविण्यात येणार आहे. 
  • ‘तेजस’ हे विमान ‘मिग’ विमानांची जागा घेणार आहे. आणखी सहा ‘तेजस’ विमानं २०१७च्या अखेरपर्यंत हवाई दलात दाखल होणार आहेत.
  • ‘मिग’ ही मूळची रशियन विमाने आहेत. मात्र सोवियत रशियाच्या विघटनानंतर ‘मिग’ विमानांचे दर्जेदार सुटे भाग आणि तांत्रिक सहकार्य मिळवणे भारतासाठी कठीण झाले. जुन्या ‘मिग’ विमानांचे अपघात वाढले.
  • अखेर सरकारने ‘मिग’ विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने हवाई दलातून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पाकिस्तानच्या जे एफ १७ या मूळच्या चिनी बनावटीच्या विमानाला जोरदार टक्कर देण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे. 
 ‘तेजस’ची वैशिष्ट्ये 
    Tejas
  • वेग : ताशी २२०५ किमी. 
  • वजन : ६५०० किलो 
  • लांबी : १३.२ मीटर 
  • स्वदेशी बनावटीचे प्रमाण : ६५ टक्के 
  • शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता : ४ टन
  • विंग स्पॅन : ८.२ मीटर
 तेजसचा प्रवास 
  • भारतीय हवाई दलातील ‘मिग-२१’ विमानांची जागा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १९८३ साली ‘तेजस’ या स्वदेशी बनावटीच्या विमान प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यावेळी या प्रकल्पासाठी ५६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. 
  • तेजसचे तंत्रज्ञान फ्रेंच बनावटीच्या ‘मिराज २०००’ विमानाशी मिळते जुळते आहे. 
  • तेजसमध्ये इस्त्रायली बनावटीचे एल्टा २०३२ रडार वापरण्यात आले असून, मुख्य इंजिन अमेरिकन आहे.
  • शत्रूच्या विमानावर हवेतच क्षेपणास्त्र हल्ला करण्याची क्षमता असून, जमिनीवरच्या टार्गेटसाठी अत्याधुनिक लेझर यंत्रणा आहे.
  • २३ जून १९९३ साली केंद्र सरकारने तेजसच्या प्रकल्पासाठी आणखी २१८८ कोटी रुपये मंजूर केले. 
  • प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर १९९० साली तेजस पहिले उड्डाण करेल आणि १९९५ साली हवाई दलात तेजसचा समावेश होईल असा कार्यक्रम निश्चित केला होता.
  • ४ जानेवारी २००१ रोजी तेजसने पहिल्यांदा आकाशात भरारी घेतली. ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा ११ वर्ष विलंबाने तेजसने पहिले उड्डाण केले. विंग कमांडर राजीव कोठीयाला हे तेजस चालवणारे पहिले वैमानिक आहेत. 
  • भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या विमानाचे ‘तेजस’ असे नामकरण केले. 
  • १९९८ साली भारताने पोखरण येथे अणूचाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले. त्यामुळे भारताला आवश्यक तंत्रज्ञान मिळू शकले नाही आणि तेजसच्या निर्मितीला आणखी विलंब झाला.
  • तेजसची जवळपास तीन हजार उड्डाणे झाली असून, अद्यापपर्यंत एकही अपघात झालेला नाही. 
  • १० जानेवारी २०११ रोजी तेजसला पहिले क्लिअरन्स ऑपरेशन मिळाले. १ जुलै २०१६ रोजी तेजसचा भारतीय हवाई दलात समावेश झाला. 
  • एकाचवेळी बहुभूमिका पार पडू शकणारे ‘तेजस’ जगातील सर्वात लहान आणि हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. 
  • भारताकडे सध्या रशियन बनावटीचे सुखोई-३० हे अत्याधुनिक लढाऊ विमान असले तरी, तेजसमुळे भारतीय हवाई दलाची मारक क्षमता निश्चित वाढणार आहे.

पर्यटकांच्या संखेत महाराष्ट्र पाचवा

  • भारतीय नागरिकांची देशातल्या देशात भ्रमंती करण्याची आवड वाढत असून २०१५या वर्षात देशांतर्गत पर्यटकांची संख्या १४३२ दशलक्ष असल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • याच्याच जोडीला भारतभ्रमणासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होऊन ती २०१५मध्ये २३.३ दशलक्ष नोंदली गेली.
  • देशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्राचा नववा क्रमांक आहे; परंतु परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्राला दुसरे स्थान आहे.
  • या दोन्ही श्रेणीत तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशाने २०१४ व २०१५ अशी लागोपाठ दोन वर्षे आपापली पहिली व दुसरी स्थाने कायम राखली.
  • परदेशी पर्यटकांनी मध्यंतरी गोव्याबाबत प्रतिकूल भूमिका घेतल्याने गोव्यातील परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली होती. परंतु, आता गोव्याने पुन्हा पहिल्या दहांत प्रवेश केला आहे.
एकूण पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये
क्र. राज्य पर्यटकांची संख्या
१. तमिळनाडू ३३३.५ दशलक्ष
२. उत्तर प्रदेश २०४.९ दशलक्ष
३. आंध्र प्रदेश १२१.६ दशलक्ष
४. कर्नाटक ११९.९ दशलक्ष
५. महाराष्ट्र १०३.४ दशलक्ष
६. तेलंगण ९४.५ दशलक्ष
७. मध्य प्रदेश ७८ दशलक्ष
८. पश्चिम बंगाल ७०.२ दशलक्ष
९. गुजरात ३६.३ दशलक्ष
१०. राजस्थान ३५.२ दशलक्ष

परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये
क्र. राज्य पर्यटकांची संख्या
१. तमिळनाडू ४.६८ दशलक्ष
२. महाराष्ट्र ४.४१ दशलक्ष
३. उत्तर प्रदेश ३.१ दशलक्ष
४. दिल्ली २.३८ दशलक्ष
५. पश्चिम बंगाल १.४९ दशलक्ष
६. राजस्थान १.४८ दशलक्ष
७. केरळ ०.९८ दशलक्ष
८. बिहार ०.९२ दशलक्ष
९. कर्नाटक ०.६४ दशलक्ष
१०. गोवा ०.५४ दशलक्ष

रवी शास्त्री आयसीसीच्या समितीमधून बाहेर

  • रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेटविषयक समितीतील माध्यम प्रतिनिधीपदाचा राजीनामा दिला आहे.
  • विशेष म्हणजे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झालेले अनिल कुंबळे हे ‘आयसीसी’च्या या समितीचेही अध्यक्ष आहेत. 
  • भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री उत्सुक होते.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वेळी प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तीन दिग्गज खेळाडूंची समिती नेमली होती.
  • या समितीने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन कुंबळे यांची निवड केली. मात्र, यावरून शास्त्री प्रचंड नाराज झाले. 
  • निवड समितीतील सदस्य असलेल्या गांगुली यांच्याशी असलेल्या वादांमुळे आपली प्रशिक्षकपदी निवड झाली नसल्याचा आरोप शास्त्री यांनी केला.
  • या वादाच्या पार्श्वभूमीवर कुंबळे अध्यक्ष असलेल्या क्रिकेटविषयक समितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शास्त्री यांनी निवडला.

बांगलादेशमध्येही आता ‘मन की बात’ 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आकाशवाणीच्या ‘मैत्री’ चॅनलद्वारे लवकरच बांगलादेशातही केले जाणार आहे.
  • बांगलादेशी रेडिओ चॅनेल स्थानिक भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करणार आहेत.
  • कार्यक्रमादरम्यान नागरिक मोदींना प्रश्नही विचारू शकणार आहेत. यामुळे बांगलादेशमधील नागरिक आपला संदेश थेट मोदींपर्यंत पोहचू शकणार आहेत.
  • सध्या उर्दू, इंग्रजी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाचा अनुवाद केला जातो. त्यासोबतच आता बंगाली भाषेतही कार्यक्रमाचा अनुवाद केला जाणार आहे.
  • विशेष म्हणजे ‘मैत्री’ वाहिनीमुळे बांगलादेशातील पाकिस्तान आणि चीनच्या रेडिओ चॅनल्सच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणात लगाम बसणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा