चालू घडामोडी : ३ व ४ जुलै

स्विस बँकांमधील भारतीयांच्या संपत्तीत घट

  • स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांकडून ठेवण्यात आलेल्या पैशांत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे.
  • या बँकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या पैशांबद्दल जागतिक पातळीवर सुरु असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या संपत्तीने आजपर्यंतचा निच्चांक गाठला आहे.
  • या बँकांमध्ये भारतीयांकडून ठेवण्यात पैशांत ५९.६४ कोटींची घट झाली आहे. २०१५पर्यंत स्विस बँकांमध्ये भारतीयांची संपत्ती ८ हजार ३९२ कोटी इतकी आहे.
  • परदेशी ग्राहकांनी स्विस बॅंकांत ठेवलेल्या पैशात २०१५अखेर ४ टक्के घट होऊन तो १.४२ ट्रिलियन स्विस फ्रॅंक (९८ लाख कोटी रुपये) झाला आहे.
  • स्वित्झर्लंडने १९९७पासून देशातील बँकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या परदेशी रक्कमेची माहिती जाहीर करण्यास सुरुवात केली होती.
  • त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या पैशांत घट झाली आहे. स्विस बँकांमधील भारतीयांच्या संपत्तीत घट होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
  • स्वित्झर्लंडच्या बँकांमधील भारतीयांच्या ठेवी घसरल्यामुळे या बँकांमधील पैसे ठेवण्याच्या यादीत भारताचे स्थान ७५पर्यंत खाली घसरले आहे. या यादीत ब्रिटन अव्वल स्थानावर कायम आहे.
  • गेल्या वर्षी या यादीत भारताचे स्थान ६१व्या क्रमांकावर होते. २००७मध्ये या यादीत भारत पहिल्या ५० देशांमध्ये होता. तर २००४मध्ये भारत ३४व्या क्रमांकावर होता.
  • ब्रिटनमधील नागरिकांनी स्विस बॅंकांत सर्वाधिक पैसा ठेवला असून, तो ३५० अब्ज स्विस फ्रॅंक आहे. स्विस बॅंकांत असलेल्या परकी पैशाच्या २५ टक्के ही रक्कम आहे. 
  • अमेरिका दुसऱ्या स्थानी असून, तेथील नागरिकांचे १९६ अब्ज स्विस फ्रॅंक स्विस बॅंकांमध्ये आहेत. या बॅंकांमधील परकी पैशाच्या तुलनेत हे १४ टक्के प्रमाण आहे.
  • स्विस बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या संपत्तीबाबत पाकिस्तानी नागरिकांनी भारतीयांना मागे टाकले आहे. या यादीत पाकिस्तान ६९व्या स्थानावर असून, त्यांचे १.५ अब्ज स्विस फ्रॅंक या बॅंकांमध्ये आहेत.
  • या यादीत ब्रिक्समधील रशिया १७व्या, चीन २८व्या, ब्राझील ३७व्या तर दक्षिण आफ्रिका ६०व्या स्थानावर आहे.
  • या यादीतील टॉप टेन देश : ब्रिटन, अमेरिका, वेस्ट इंडीज, जर्मनी, बहामा, फ्रान्स, गुर्नेसे, लक्झेम्बर्ग, हॉंगकॉंग, पनामा.

विश्वनाथन आनंदला डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी

  • चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला आयआयटी कानपूरने ४९व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी दिली. आयआयटी सीनेटच्यावतीने आनंदला या उपाधीने गौरविण्यात आले.

निर्मला शेओरन रिओसाठी पात्र

  • भारताच्या निर्मला शेओरनने हैदराबाद मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात ५१.४८ सेकंदांची वेळ नोंदवून रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
  • रिओचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निर्मलाने कामगिरीत सुधारणा करताना हिटमध्ये नोंदवलेल्या ५२.३२ सेकंदांच्या वेळेहून चांगली कामगिरी केली.
  • तसेच तिने २०१४साली एम. आर. पुवम्मा यांनी नोंदवलेल्या ५१.७३ सेकंदांचा विक्रमही मोडला.
  • रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवणारी निर्मला २४वी अ‍ॅथलिट आहे. रिओत जागा निश्चित करण्यासाठी ५२.२० सेकंदांची पात्रता वेळ ठरवण्यात आली होती.

नोबेल विजेते लेखक एली विसेल यांचे निधन

  • दुसऱ्या जागतिक युद्धात करण्यात आलेल्या ज्यू धर्मियांच्या सामूहिक हत्याकांडातून बचावलेले व शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवलेले लेखक एली विसेल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
  • रोमानियामध्ये जन्मलेल्या एली यांच्या ऑश्चवित्झ येथील छळछावणीतील अनुभवांचे जिवंत वर्णन असलेल्या ‘नाइट’ या शोधनिबंधाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
  • एली यांची आई व छोट्या बहिणीचा नाझींनी गॅस चेंबरमध्ये केलेल्या ज्यू धर्मियांच्या हत्याकांडात मृत्यू झाला, तर वडील उपासमारीने मृत्युमुखी पडले.
  • अमेरिकी सैनिकांनी नाझींच्या कचाट्यातून सुटका केल्यानंतर एली यांची फ्रान्समध्ये राहणाऱ्या मोठ्या बहिणीशी गाठ पडली व तेथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
  • १९८६ मध्ये त्यांना शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

केजरीवाल यांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना अटक

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्यासह ५ जणांना सीबीआयने ४ जुलै रोजी अटक केली.
  • कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर ५० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
  • सीबीआयने काही दिवसांपूर्वीच या ५ अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. केजरीवाल यांचे सचिव कुमार यांच्यावर गेल्या पाच वर्षात अनेक खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवल्याचा आरोप होता.
  • राजेंद्र कुमार केजरीवाल यांच्या टीममधील एक विश्वासू सहकारी आहेत. १९८९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांची फेब्रुवारी महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

चीनमध्ये जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण

  • जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण चीनने तयार केली आहे. ‘फाईव्ह- हंड्रेड- मीटर अर्पेचर स्फेरिकल टेलिस्कोप-फास्ट’ असे तिचे नाव आहे.
  • गुईझोवूच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील पहाड कापून तिला जागा करण्यात आली आहे.
  • चायनीज अकादमी ऑफ सायन्सने दुर्बिणीची उभारणी केली आहे. ही दुर्बीण तयार व्हायला पाच वर्षे लागली असून, सप्टेंबरपासून ती काम करू लागेल.
  • ३० फुटबॉलच्या मैदानांएवढा तिचा आकार आहे. तसेच या दुर्बिणीच्या उभारणीला १८० दशलक्ष डॉलर खर्च आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा