चालू घडामोडी : ५ जुलै

बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट नामकरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
  • मुंबई बरोबरच कलकत्ता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • १९९५ साली बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले. पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नाही. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे अशी शिवसेनेची मागणी होती.
  • महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले.
  • ही उच्च न्यायालये १८६० मध्ये स्थापन झाली असल्याने १८६१ च्या कायद्यात नावे बदलण्याची तरतूद नाही. त्यामुळे यासाठी ‘द हायकोर्ट अल्टरेशन ऑफ नेम्स बिल २०१६’ मांडण्यात येणार आहे. 

सरकारच्या निर्गुंतवणुकीकरिता सल्लागाराची नियुक्ती

  • निर्गुंतवणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड पब्लिक अॅसेट मॅनेजमेन्ट’ (दिपम) या खात्याने केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या भविष्यातील निर्गुंतवणुकीकरिता एका अनुभवी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.
  • असा सल्लागार ६५ वर्षांहून कमी वयाचा नसेल व त्याला सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा व शेअर बाजारांतील विक्री व्यवहारांचा दहा वर्षांहून अधिक अनुभव असावा अशी अपेक्षा आहे.
  • यापूर्वी केंद्र सरकारने सरकारी उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम तब्बल १२ वर्षांपूर्वी अमलात आणला होता.
  • केंद्र सरकारने २०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात आधीच्या निर्गुंतवणूक खात्याचे नाव ‘दिपम’ असे बदलले. सरकार चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे एकूण ५६,५०० कोटी रुपये उभारू इच्छित आहे.

‘गुगल इंडिया’ कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कंपनी

  • ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘गुगल इंडिया’ने अग्रस्थान पटकावले आहे.
  • गुगल इंडिया’ ही भारतातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कंपनी ठरली असून, अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • भारतामध्ये नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या कंपन्यांची यादी ‘इकॉनॉमिक टाइम्स’तर्फे दर वर्षी जाहीर करण्यात येते. यंदाचे हे सर्वेक्षणाचे नववे वर्ष आहे.
  • २०१५मध्ये ‘गुगल इंडिया’ या यादीत दुसऱ्या स्थानी होती. या वर्षी कंपनीने एका स्थानाने प्रगती केली आहे.
  • दुसऱ्या स्थानावर ‘अमेरिकन एक्स्प्रेस’ ही अमेरिकेची क्रेडिट कार्ड कंपनी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीने दोन स्थानांनी झेप घेतली आहे.
  • उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस या भारतीय कंपनीने तिसरे स्थान पटकावले असून, मागील वर्षीपेक्षा या कंपनीने तब्बल २४ स्थानांनी झेप घेतली आहे. 
  • या सर्वेक्षणामध्ये ७९१ कंपन्यांनी सहभाग घेतला होता आणि याअंतर्गत तब्बल १.५५ लाख कर्मचाऱ्यांची मते विचारात घेण्यात आली. भारतात अशा प्रकारे केले जाणारे हे सर्वांत मोठे सर्वेक्षण आहे.
  • संस्थेवरील विश्वास, कर्मचाऱ्यांची मैत्री, कंपनीचे कर्मचारीकेंद्रित धोरण याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
  • त्याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यावरून कर्मचाऱ्यांचे समाधान आदींबाबत निरीक्षणे समोर आली आहेत. 
या यादीतील सर्वोत्तम दहा कंपन्या
१. गुगल इंडिया २. अमेरिकन एक्स्प्रेस इंडिया
३. उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस ४. टेलिपरफॉर्मन्स इंडिया
५. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ६. मॅरियट हॉटेल्स इंडिया
७. सॅप लॅब्ज इंडिया ८. ओबेरॉय समूह
९. लेमन ट्री हॉटेल्स १०. इंट्युट इंडिया प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सेंटर

लिओनेल मेस्सीला २१ महिन्यांची शिक्षा

  • जगातील सर्वोत्तम फुटबॉलपूट म्हणून पाच वेळा गौरवण्यात आलेल्या बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला कर चुकवेगिरी प्रकरणात स्पेनमधील बार्सिलोना न्यायालयाने २१ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
  • काही दिवसांपूर्वीच फुटबॉलमधून निवृत्ती घेणाऱ्या अर्जेंटिनाच्या या माजी खेळाडूसह त्याचे वडील जॉर्ज यांना देखील न्यायालयाने २१ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
  • या शिक्षेच्या विरोधात दोघांनाही स्पेनमधील सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. 
  • स्पेनमधील कायद्यानुसार दोन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यास ती नजरकैदेत राहून भोगता येते. त्यामुळे मेस्सी आणि त्याच्या वडिलांना तुरुंगात जावे लागण्याची शक्यता कमीच आहे.
  • न्यायालयाने २१ महिन्यांच्या शिक्षेसह मेस्सीला २ मिलियन यूरो तर वडिल जॉर्ज यांना १.५ मिलियन यूरो इतका दंड ठोठावला आहे.
  • मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
  • २००७-०९मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप होता.

हॉकी जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानी

  • लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • ‘एफआयएच’ (इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन)च्या जागतिक रँकिंगमध्ये भारतीय संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 
  • या यादीत विश्व विजेता आणि चॅम्पियन्स स्पर्धेतील विजेत्या ऑस्टेलिया संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. क्रमवारीत नेदरलँड, जर्मनी आणि इंग्लंड हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. 
  • महिलांच्या क्रमवारीत नेदरलँड पहिल्या स्थानावर आहे. तर चॅम्पियन्स चषक विजेता अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
  • ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहेत. क्रमवारीत भारतीय महिला संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नसून तो १३व्या स्थानावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा