चालू घडामोडी : १ ऑगस्ट

प्रो-कबड्डी लीग २०१६

  • हैदराबाद येथील गचीबॉली क्रीडासंकुलात झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पाटना पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करत प्रो-कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे जेतेपद मिळवले.
  • प्रो-कबड्डीमधील पटनाचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले आहे.
  • पाटनाकडून १६ गुणांची कमाई करणारा प्रदीप नरवाल या विजेतेपदाचा शिल्पकार ठरला.
 महिलांमध्ये स्टॉर्म क्वीन्स विजयी 
  • पहिल्या प्रो कबड्डी महिला चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टॉर्म क्वीन्स संघाने मोक्याच्यावेळी बाजी मारत फायर बर्डस संघाला २४-२३ असे नमवून विजेतेपद पटकावले.
  • अष्टपैलू कामगिरी करणारी साक्षी कुमारी (चढायांचे ६ आणि पकडींचे २ गुण) स्टॉर्म क्वीन्सच्या विजयाची शिल्पकार ठरली.

भारताची युवा अ‍ॅथलीट पुजा कुमारी कालवश

  • भारताची युवा अ‍ॅथलीट पुजा कुमारी हीचा भोपाळ येथील साई सेंटर जवळ असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
  • मत्स्योत्पालनासाठी बनवलेल्या या तलावातील माशांसोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या पुजाचा पाय घसरला आणि ती तलावात बुडाली.
  • स्टिपलचेस या प्रकारातील धावपटू असलेली २० वर्षीय पुजा आपल्या दोन सहकारी खेळाडूंसोबत सराव करून परतत असताना ही दुर्घटना घडली.
  • उत्तराखंडची असलेली पुजा कुमारी गेल्या तीन वर्षांपासून साईमध्ये स्टिपलचेसचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी २००० मीटर मध्ये तीने रौप्य पदकही पटकावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा