चालू घडामोडी : १६ ऑगस्ट

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. मंजुळा चेल्लुर

 • मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला १० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यावर या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली.
 • न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१व्या मुख्य न्यायाधीश असतील. त्या २४ ऑगस्टपासून पदभार स्वीकारतील.
 • मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत. त्यांच्यापूर्वी १९९४मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते.
 • न्या. चेल्लुर यांचा जन्म १९५५मध्ये कर्नाटकमधील बेल्लरी गावात झाला. त्यांनी १९७७मध्ये कायद्यात पदवी घेतली.
 • १९८८पासून त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे वकिली केली.
 • २००० मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
 • तेथून २०१४मध्ये त्यांची बदली कोलकाता उच्च न्यायालयात करण्यात आली. बेल्लरीमधील त्या पहिल्या महिला वकील आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या.

बिहार विधानसभेची जीएसटीला मंजुरी

 • आसामपाठोपाठ आता बिहार विधानसभेने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयकास सार्वमताने मंजुरी दिली आहे.
 • जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी बिहार विधानसभेत एकदिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते.
 • राज्यातील सत्ताधारी पक्ष जदयू, आरजेडी आणि काँग्रेसने विधेयकास पाठिंबा दिला. परंतु मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला तीव्र विरोध करत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 • जीएसटी विधेयक राज्यासाठी तसेच केंद्रासाठी फायदेशीर असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
 • जीएसटीचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर बिहारला अंदाजे आठ ते नऊ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 • आतापर्यंत दोन विधानसभांनी या विधेयकास मंजुरी दिली आहे. एकुण २९ पैकी किमान १५ राज्यांनी या विधेयकास मंजुरी देणे गरजेचे आहे.

विकास क्रिशनचे आव्हान संपुष्टात

 • रिओ ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताचा बॉक्सर विकास क्रिशनला उझबेकिस्तानचा बॉक्सर मेलिकुझिव बेक्तेमीर याने ३-० असे सहज पराभूत केले.
 • या पराभवामुळे शिवा थापा, मनोज कुमार यांच्यानंतर आता विकासचे रिओ २०१६मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
 • २००८ बिजींग ऑलिंपिकमध्ये विजेंदरसिंगने भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते तर, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये मेरी कोमने ब्राँझपदक मिळविले होते.

ललिता बाबर पराभूत

 • ललिता बाबरला ऑलिंपिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील ३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. 
 • ऑलिंपिक ऍथलेटिक्समधील धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी भारताची केवळ दुसरी महिला ठरलेल्या ललितास प्राथमिक शर्यतीतील वेळ अंतिम फेरीत देता आली नाही.
 • तिने प्राथमिक शर्यतीत ९ मिनिटे १९.७६ सेकंद वेळ दिली, तर अंतिम फेरीत ९ मिनिटे २२.७४ सेकंद लागले.
 • बहारीनच्या रुथ जेबट हिने ८ मिनिटे ५९.७५ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या हाविन जेपकेमोई हिने रौप्य पदक जिंकले. 
 • बीजिंग येथे गतवर्षी जागतिक स्पर्धेत ललिताला आठवे स्थान मिळाले होते. त्या वेळी तिने ९ मिनिटे २७.८६ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.

ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह

 • नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिले आहे.
 • त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत १९ ऑगस्टला आहे.
 • २५ जून व ५ जुलै  रोजी झालेल्या दोन्ही चाचण्यांमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. मात्र, नाडाच्या शिस्तपालन समितीने नरसिंगला निर्दोष ठरवले होते
 • नाडाने दिलेली क्लिन चीट वाडाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नरसिंग यादववर असलेली ४ वर्षांची बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 वाडा काय करू शकते? 
 • वाडाकडून ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंगची चाचणी घेतली जाऊ शकते. या चाचणीत तो दोषी आढळला तर तो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.
 • वाडाने जर असे केले नाही व नरसिंगने जर पदक पटकावले, तर नियमानुसार त्याची चाचणी होईल. यात तो दोषी आढळला तर त्याचे पदक काढून घेतले जाईल.

अँडी मरेला कारकिर्दीतील दुसरे सुवर्णपदक

 • इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
 • रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत सुवर्णपदका जिंकले.
 • यापूर्वी मरेने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
 • कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून दिले.
 मिश्र दुहेरीमध्ये व्हीनस पराभूत 
 • ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमध्ये पाच सुवर्णपदके पटकावण्याचे अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • अंतिम फेरीत अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्स आणि जॅक सॉक यांनी व्हीनस आणि तिचा सहकारी राजीव राम यांना ७-६ (७-३), १-६, १०-७ असे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.
 • व्हीनसने २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर बहीण सेरेनाबरोबर २०००, २००८ आणि २०१२ या तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
 महिला दुहेरीमध्ये हिंगिस पराभूत 
 • महिलांच्या टेनिस दुहेरीमध्ये मार्टिना हिंगिसलाही सुवर्णपदक पटकावण्यात अपयश आले.
 • महिलांच्या दुहेरीमध्ये एलेना व्हॅसनिना आणि एकातेरिना माकारोव्हा यांनी हिंगिस आणि तिची सहकारी तिमीआ बॅस्किन्सझ्की यांना ६-४, ६-४ असे सहजपणे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.
 पोटरे रिको देशाला पहिले सुवर्णपदक 
 • मोनिका प्युगने टेनिस महिला एकेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा ६-४, ४-६, ६-१ असा पराभव करून पोटरे रिको देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
 • प्युग जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर आहे, मात्र क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम विजेत्या कर्बरचा तिच्यापुढे निभाव लागला नाही.
 • प्युगने उपांत्यपूर्व फेरीत फ्रेंच ग्रँड स्लॅम विजेत्या गार्बिन मुगुरुझाला नमवले हाते. 
 • कोणत्याही खेळात कॅरेबियन बेटांना पदक जिंकू देणारी प्युग ही पहिली खेळाडू ठरली आहे.
 • प्युगने हे सुवर्णपदक मिळवून देण्यापूर्वी पोटरे रिकोच्या खात्यावर दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह आठ ऑलिम्पिक पदके जमा होती. सहा पदके त्यांना बॉक्सिंगमध्ये मिळालेली आहेत.

No comments:

Post a Comment