चालू घडामोडी : २७ ऑगस्ट

एनपीसीआयच्या यूपीआय प्रणालीला आरबीआयची मंजुरी

  • नॅशनल पेमेंटस्‌ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंटस्‌ इंटरफेस (यूपीआय) प्रणालीला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.
  • यूपीआय ही खातेक्रमांकाशिवाय मोबाईल क्रमांकावर आधारित बॅंकिंगची सुविधा देणारी प्रणाली आहे.
  • यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळून अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.
  • यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे पाठवणे आणि स्वीकारणे यासारखे व्यवहार क्षणार्धात पूर्ण करता येणार आहेत.
  • गुगल प्ले स्टोअरवर यूपीआय-एनेबल्ड मोबाइल ऍप पुरवणाऱ्या बॅंकांच्या ग्राहकांना यूपीआयचा वापर करून बॅंकिंग व्यवहार करता येतील.
  • यूपीआयद्वारे एका वेळी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्स्फर करता येते व ही सुविधा अव्याहतपणे (२४*७) उपलब्ध असते.
  • सध्या १९ बॅंकांनी ही सुविधा देऊ केली आहे. नजीकच्या भविष्यात उर्वरित बॅंकाही ही सेवा उपलब्ध करून देतील. 
  • ‘एनपीसीआय’चे एमडी व सीइओ : ए. पी. होटा

ख्रिस्तियानो रोनाल्डोला युईएफए बेस्ट प्लेअर पुरस्कार

  • पोर्तुगालचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपचा २०१६ या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
  • रोनाल्डोने रिअल माद्रिदमधील त्याचा सहकारी गॅरेथ बॅले व अ‍ॅटेलिटिको माद्रिदचा खेळाडू अन्तोनी ग्रिझमन यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळवला.
  • चॅम्पियन्स लीगच्या येणाऱ्या सत्रातील ड्रॉच्या घोषणेनंतर त्याला युईएफए बेस्ट प्लेअरचा पुरस्कार घोषीत करण्यात आला.
  • रोनाल्डोच्या शानदार खेळामुळे रियल माद्रिदने २०१५-१६मध्ये चॅम्पियन्स लीग किताब पटकावला. त्याच्याच नेतृत्वात पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कप जिंकला आहे.
  • रोनाल्डोने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. रोनाल्डोने याआधी २०१४मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. २०१५मध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्राईकर लियोनेल मेस्सीने मिळवला.
  • महिलांच्या गटात हा पुरस्कार नॉर्वेची अदा हेगरबर्गला मिळाला.

पृथ्वीसदृश प्रॉक्झिमा-बी या ग्रहाचा शोध

  • पृथ्वीपासून जवळपास चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या पृथ्वीसारख्याच दुसऱ्या ग्रहाचा शोध संशोधकांनी लावला आहे.
  • हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून, प्रॉक्झिमा-बी असे त्याला नाव देण्यात आले आहे.
  • या ग्रहाची आकारासहित बहुतेक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत.
  • या ग्रहावरील वातावरणाचे अस्तित्व व सजीवांचा अधिवास याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे. 
  • प्रॉक्झिमा-बी हा ग्रह प्रॉक्झिमा सेन्शॉरी या लाल लघुताऱ्याच्या शेजारीच आहे. 
  • ब्रिटिश संशोधकांच्या पुढाकाराने युरोपियन शास्त्रज्ञांनी हे संशोधनपर लिखाण केले आहे. 
  • या लिखाणासाठी संशोधकांनी १६ वर्षांपासून माहिती संकलन केले. चिलीमधील युरोपियन साऊदर्न ऑब्जर्व्हेटरी टेलेस्कोपच्या साह्याने संशोधकांनी या ग्रहाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.
 प्रॉक्झिमा बीची वैशिष्ट्ये 
  • प्रॉक्झिमा-बीचे वस्तुमान पृथ्वीच्या वजनापेक्षा १.३ पटीने जास्त 
  • स्वतःभोवती एक फेरी मारण्यास ११ दिवस लागतात 
  • या ग्रहावर अतिउष्णता किंवा अतिथंडी नाही 
  • वातावरण किंवा पाण्याचे अस्तित्व आढळण्याची शक्यता 

सतबीरसिंग कदियान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा

  • भारतीय लोकदलाचे नेते आणि हरियाना विधानसभेचे माजी अध्यक्ष सतबीरसिंग कदियान यांना इफ्को भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला.
  • केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्रकुमार मिश्रा यांनी ही शिक्षा सुनावली.
  • कदियान यांच्याव्यतिरिक्त युको बॅंकेचे माजी सहायक व्यवस्थापक विनायक नारायण देवस्थळी, अनिलकुमार मल्होत्रा, युको बॅंकेचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक सुनील गोरवरा यांनाही न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
  • तसेच ८४ वर्षीय करुणापती पांडे यांच्या वयाचा विचार करीत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. 
  • मुख्य आरोपी असलेले कदियान हे लोकनियुक्त प्रतिनिधी होते. त्याचप्रमाणे ते विधानसभेचे अध्यक्षही होते. कदियान हे इफ्कोचेही अध्यक्ष होते.

No comments:

Post a Comment