चालू घडामोडी : १ ऑक्टोबर

सर्जिकल स्ट्राईकसाठी कार्टोसॅटचा उपयोग

  • भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईसाठी भारतीय लष्कराने ‘इस्रो’च्या कार्टोसॅट मालिकेतील ‘२सी’ या उपग्रहाची मदत घेतली.
  • या कारवाईत ‘आकाशातील नेत्र’ मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा लष्कराला खूपच फायदा झाला.
  • एखाद्या मोठ्या ‘ऑपरेशन’साठी कार्टोसॅट उपग्रहाची मदत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • ४ तास चालेल्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील सात दहशतवादी तळ उद्धवस्त करुन ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
 कार्टोसॅट 
  • कार्टोसॅट २, २ ए, २ बी आणि २ सी हे भारताचे रिमोट सेन्सिंग उपग्रह आहेत. २००५साली या मालिकेतील पहिला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला.
  • २००७ मध्ये कार्टोसॅट २ए उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्टोसॅट २ए शेजारच्या देशातील क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती देतो.
  • कार्टोसॅट २सी हा उपग्रह या वर्षी २२ जून २०१६ला अवकाशात सोडण्यात आला. या उपग्रहाकडून गरजेनुसार विशेष जागेची छायाचित्रे मिळू शकतात.
  • कार्टोसॅटचा वापर फक्त छायाचित्रांपुरताच मर्यादीत नाही तर, हा उपग्रह विशेष संवेदनशील लक्ष्यांचे अवकाशातून चित्रीकरण करु शकतो. 
  • यामुळे भारताच्या लष्करी टेहळणीला अतिशय मोठा फायदा होत असून, ०.६५ मीटर दर्जाची छायाचित्रे याद्वारे मिळत आहेत.
  • कार्टोसॅट २सी मुळे भारतीय लष्कराच्या टेहळणी आणि प्रतिकारक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. 

सिंधुदुर्गला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

  • स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत.
  • दिल्लीत आज झालेल्या इंडोसॅन (इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स) या स्वच्छता परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारतासाठी कटिबद्धता दर्शविणाऱ्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या. 
  • ‘इंडोसॅन’मध्ये ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांनीही अन्य एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या. 
  • या वेळी स्वच्छता मोहिमेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ संस्था व संघटनांना गौरविण्यात आले. 
 पुरस्कार यादी 
  • घनकचरा व्यवस्थापनात देशभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे महापालिका आणि स्वच्छ सहकार समाज यांना गौरविण्यात आले.
  • तर किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील सर्वांत स्वच्छ शहर या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरविण्यात आले.
  • रानी की वाव या गुजरातमधील पर्यटन स्थळाला सर्वांत स्वच्छ सांस्कृतिक वारसा स्थळ पुरस्कार देण्यात आला.
  • तर अधिक लोकसंख्येची सर्वाधिक स्वच्छ शहरे या श्रेणीत चंडीगड आणि म्हैसूर या शहरांनी पुरस्कार पटकावला.
  • सर्वांत स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून गंगटोक (मेघालय) या शहराला, सर्वाधिक रेल्वे स्थानक म्हणून सुरत रेल्वे स्थानकालाही यावेळी गौरविण्यात आले.

अरूंधती भट्टाचार्य यांना एसबीआय अध्यक्षपदी मुदतवाढ

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • एसबीआयच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत.
  • यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही.
  • ६ ऑक्टोबर २०१६ रोजी भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र आता ६ ऑक्टोबर २०१७पर्यंत त्या एसबीआयच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतील.
  • जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याची शक्यता आहे.

आयडीएस योजनेमुळे ६५,२५० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड

  • केंद्र सरकारच्या प्राप्ती जाहीर योजनेंतर्गत (आयडीएस) तब्बल ६५,२५० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला आहे.
  • एकूण ६४,२७५ लोकांनी हा पैसा उघड केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने प्राप्ती जाहीर योजना १ जूनला सुरु केली होती. ही योजना ३० सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री संपली.
  • या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत काळा पैसा उघड करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत.
  • तसेच त्यांना आपल्या उत्पन्नावर एकूण ४५ टक्के अधिभार भरावा लागला आहे. ही रक्कम सप्टेंबर २०१७पर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • यातून मिळणाऱ्या कर उत्पन्नामुळे केंद्राला अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यास मदत होणार आहे.
  • या योजेनेंतर्गत हैदराबाद शहरातून सर्वाधिक १३,००० कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर करण्यात आले.
  • त्याखालोखाल मुंबईत ८,५०० कोटी, दिल्ली ६,००० कोटी, कोलकातामध्ये ४,००० कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर झाले.

प्रतापराव पवार एमआरयूसीच्या संचालकपदी

  • ‘सकाळ’ वृत्तपत्राचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच देशातील वृत्तपत्रांच्या इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या शिखर संघटनेच्या कार्यकारिणीवरही पवार यांची फेरनिवड झाली आहे. 
  • एमआरयूसी गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे.
  • इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्वासार्ह सर्वेक्षण एमआरयूसीच्या वतीने केले जाते. 
  • वृत्तपत्रांचे वाचक, त्यांचे आर्थिक गट, बदलत्या अपेक्षा, सवयी, बदलते तंत्रज्ञान यांबद्दल सातत्याने सर्वेक्षण करून प्रकाशक तसेच जाहिरातदारांना योग्य माहिती एमआरयूसीकडून मिळत असते.
  • माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी एमआरयूसीच्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासांचा फायदा होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा