चालू घडामोडी : ७ नोव्हेंबर

अमेरिकन अध्यक्षपदासाठी ८ नोव्हेंबर रोजी मतदान

  • अमेरिकन अध्यक्षपदासाठी ८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ९ नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
  • डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.
  • ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १२ कोटी अमेरिकन नागरिक मतदान करतील.
 अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका 
  • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका या नियमितपणे येत असतात. मतदानाची तारीखही ठरलेली असते.
  • दर ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यातील पहिला मंगळवार (नियमात म्हंटल्याप्रमाणे) हा मतदानाचा दिवस. या वर्षी तो ८ नोव्हेंबर.
  • निवडणुकांनंतर येणाऱ्या नवीन वर्षांतील २० जानेवारीस नव्या सरकारचे सत्ताग्रहण होते. आधी अध्यक्ष आणि दुपारी उपाध्यक्ष.
  • हे सर्व ठरलेले आहे. यात काहीही बदल नाही. फक्त २० जानेवारीला रविवार आल्यास सत्ताग्रण २१ जानेवारी रोजी होते.
  • अमेरिकेत प्रत्येक राज्याला निर्धारित मते निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याला म्हणतात इलेक्टोरल कॉलेज.
  • राज्यांना निर्धारित करण्यात आलेल्या मतांची बेरीज ही अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सेनेट यांच्या एकूण सदस्यसंख्येइतकी आहे.
  • अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज (४३५) आणि सेनेट (१००)  यांची एकूण सदस्यसंख्या ५३५ आहे.
  • याशिवाय अधिक दोन मते राजधानी वॉशिंग्टन डीसीसाठी आणि एक मत अमेरिकेतील सर्वात कमी लोकसंख्येचा वायोमिंगसाठी असते. (एकूण ५३८)
  • अध्यक्षीय उमेदवाराला विजयासाठी किमान २७० मतांची आवश्यकता असते.
  • लोकांनी केलेल्या मतदानाबरोबरच उमेदवाराला विजयी होण्यासाठी इलेक्टोरल कॉलेजमधील २७० मतेही महत्त्वाची असतात.

सीबीडीटीच्या अध्यक्षपदी सुशील चंद्र 

  • आयआयटी पदवीधर असलेले सुशील चंद्र यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी: सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
  • ते १९८०च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. २०१५पासुन ते प्रत्यक्ष कर मंडळाच्या चौकशी विभागाचे सदस्य आहेत.
  • मे महिन्यापर्यंतचा त्यांचा कार्यकाल आहे. त्यांनी राणी सिंग नायर यांची जागा घेतली आहे.
  • प्राप्तिकर खात्यात त्यांनी अनेक पदांवर काम केले. मुख्य आयुक्त, प्राप्तिकर महासंचालक, प्राप्तिकर आयुक्त, ही पदे त्यांनी भूषवली आहेत.
  • करदात्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. महसूल वाढवणे, करपाया विस्तृत करणे, डिजिटल कर प्रशासन राबवणे ही त्यांची उद्दिष्टे आहेत.
  • सध्या प्रत्यक्ष कर मंडळाकडे अपिलाची लाखो प्रकरणे पडून आहेत, ती निकाली काढणे हे प्रमुख आव्हान असून या प्रकरणातील एकूण रक्कम ५७०० कोटींची आहे.
  • देशाची अर्थव्यवस्था आता निर्णायक टप्प्यावर असताना अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.

अतुल्य भारत अभियानासाठी पंतप्रधान मोदींची निवड

  • विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत (इनक्रेडिबल इंडिया) अभियानाचा जगभर प्रचार व प्रसार घडवण्यासाठी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा निवडला आहे.
  • अभिनेता आमिर खान याला ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरपदावरून हटवल्यापासून हे पद रिक्त होते.
  • लवकरच या प्रचार व प्रसार अभियानासाठी एजन्सीचीही निवड करण्यात येईल. हे अभियान दिड ते दोन महिने जगभर चालेल.
  • अडीच वर्षात पंतप्रधान मोदी ज्या देशात गेले, तिथल्या पर्यटकांची संख्या भारतात वाढली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा अत्यंत विचारपूर्वक निवडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा