चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये

  • राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे.
  • या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित २ विधेयके व विधान परिषदेतील ६ प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून, ४ नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
  • तसेच या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे.
  • विधानसभा अध्यक्ष: हरिभाऊ बागडे
  • विधानसभा विरोधी पक्षनेते: राधाकृष्ण विखे पाटील
  • विधान परिषद सभापती: रामराजे नाईक निंबाळकर
  • विधान परिषद उपसभापती: माणिकराव ठाकरे
  • विधान परिषद विरोधी पक्षनेते: धनंजय मुंडे 

सीआरपीएफकडून नक्षलविरोधी मोहिमेसाठी महिलांची तुकडी तैनात

  • झारखंडमधील नक्षलविरोधी मोहिमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) पहिल्यांदाच महिलांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
  • १७ ऑक्टोबरला महिला बटालियन क्रमांक १३३ या तुकडीचा सीआरपीएफमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • रांचीमधील खूंती भागात नक्षलग्रस्त जंगलात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
  • झारखंडमधील नक्षली घुसखोरी थांबविण्यासाठी ही तुकडी काम करणार असून, यासाठी त्यांना सीआरपीएफच्या अकादमीत प्रशिक्षणही दिले गेले आहे.
  • सीआरपीएफचे पोलिस महासंचालक: संजय ए. लाठकर

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर पाच वर्षांची बंदी

  • वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे.
  • इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.
  • बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) नाईकच्या एनजीओला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.
  • आयआरएफवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर या संस्थेचे कार्यालय आणि देशभरातील संस्थेचे कामकाज बंद करावे लागणार आहे..
  • झाकीर नाईक याच्या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी त्याच्या संस्थेकडून होणाऱ्या सर्व अवैध कृत्यांचा तपास करण्यात आला. 
  • पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक चॅनेलचा झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे.
  • झाकीरची संस्था पीस टीव्हीसाठी आक्षेपार्ह कार्यक्रमांची निर्मिती करते. त्यापैकी बरेच कार्यक्रम हे भारतात तयार केले जातात, असेही आढळून आले आहे.
  • बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेले दहशतवादी हे नाईकच्या भाषणामुळे प्रभावित झाले होते, असा आरोप झाला होता.
  • त्यानंतर नाईक यांच्या पीस टीव्हीवर कारवाई करत या वाहिनीचे प्रक्षेपण बांगलादेशसह भारतातही रोखण्यात आले होते.
  • झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेशी संबंधित इतरांवर मुंबईसह सिंधुदुर्ग आणि केरळमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लिंगनिदानसंबंधी माहिती हटविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  • लिंगनिदानसंबंधी माहिती आणि जाहिराती ३६ तासांत हटवण्यात याव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुगल, याहूसारख्या सर्च इंजिन्सला दिले आहेत.
  • तसेच अशा प्रकारच्या वेबसाइटवर देखरेखीसाठी एका नोडल एजन्सीची नियुक्ती करावी, असे आदेश केंद्र सरकारलाही दिले आहेत.
  • लिंगनिदानसंबंधीची माहिती अथवा जाहिरात केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या एजन्सीमार्फत संबंधित सर्च इंजिन साइटला कळवण्यात येईल.
  • यानंतर त्या-त्या सर्च इंजिनने ३६ तासांच्या आत ही माहिती हटवावी, तसेच संबंधित एजन्सीला याबाबत कळवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय विकास महामंडळ संचालकपदी सतीश मराठे

  • कृषी मंत्रालयाने सतीश मराठे यांची राष्ट्रीय विकास महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • १ फेब्रुवारी १९५० रोजी मुंबईत जन्मलेल्या मराठे यांनी वाणिज्य आणि विधि शाखांची पदवी मिळवली आहे.
  • मुंबईच्या पोदार महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात भाग घेणे सुरू केले.
  • त्यांना राज्यातील सहकार आणि बँकिंग क्षेत्रात अनेक वर्षे कामाचा अनुभव आहे.
  • बँकिंग क्षेत्रातील विविध संघटनांमध्येही विविध पदे भूषवताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. बॅकिंग तसेच अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
  • १९७९मध्ये स्थापन झालेल्या ‘सहकार भारती’मध्ये ते सुरुवातीपासून कार्यरत आहेत.
  • सहकार भारती ही सहकार क्षेत्रातील आज देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा