चालू घडामोडी : ७ डिसेंबर

जगदिश सिंग केहर भारताचे ४४वे सरन्यायाधीश

  • न्यायमूर्ती जगदिश सिंग केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • केहर हे भारताचे ४४वे सरन्यायाधीश असतील. तसेच भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत.
  • विद्यामान सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर ३ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून केहर यांचे नाव सुचविले होते.
  • ४ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. २७ ऑगस्ट २०१७पर्यंत ते हे पद भूषवतील.
  • २८ ऑगस्ट १९५२ रोजी जन्मलेल्या केहर यांनी १९७४मध्ये चंदिगडच्या सरकारी कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पदवी घेतली.
  • १९७७मध्ये त्यांनी पंजाब युनिवर्सिटीतून एल.एल.बी. पूर्ण केले. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांनी एल.एल.एम.चे शिक्षण घेतले.
  • पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट, उत्तराखंड हायकोर्ट तसेच कर्नाटक हायकोर्टात त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.
  • १३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती मिळाली. काही काळ ते पंजाबचे अतिरिक्त महाधिवक्ता होते.
  • अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीचा निर्णय अवैध ठरवणारा निकाल देणाऱ्या खंडपीठाचे ते प्रमुख न्यायाधीश होते.
  • न्यायिक आयोगाची वादग्रस्त तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्दबातल ठरवली त्याचेही ते प्रमुख होते.
  • न्यायाधीशांची नेमणूक ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे, त्यात राजकीय नियंत्रणे असता कामा नयेत असे त्यांनी म्हटले होते.

फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांचा राजीनामा

  • फ्रान्समध्ये २०१७मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उतरण्यासाठीफ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • सोशलिस्ट पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून मॅन्युअल वॉल्स हे उभे राहणार आहेत.
  • गेल्या अडीच वर्षांपासून पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वॉल्स यांनी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली होती.
  • फ्रान्सचे विद्यमान राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी वॉल्स यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदासाठी बर्नार्ड केजेनूव यांचे नाव सुचविले आहे.

अमेरिकेकडून पाकला ९० कोटी डॉलरची मदत

  • अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने पाकिस्तानला ९० कोटी डॉलरची आर्थिक व अन्य साहाय्यासाठी मदत करणारे विधेयक मंजूर केले आहे.
  • ‘हक्कानी नेटवर्क’ या दहशतवादी गटाविरोधात पाकिस्तान करत असलेल्या कारवाईवर ही मदत अवलंबून असणार आहे.
  • प्रतिनिधिगृहात २०१७साठीचे अमेरिकी राष्ट्रीय संरक्षण अधिकार विधेयक संमत झाले. यात १.१ अब्ज डॉलरची भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. यातील ९० कोटी डॉलर भरपाई पाकिस्तानला मिळणार आहे.
  • पाकिस्तान हक्कानी नेटवर्कविरोधात करीत असलेली कारवाई समाधानकारक असल्यास अमेरिकी संरक्षण मंत्रालय या मदतीला मंजुरी देणार आहे.

पहिले पाकिस्तानी नोबेल विजेते डॉ. सलाम यांचा सन्मान

  • पाकिस्तानचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अब्दुस सलाम यांचा सन्मान करीत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काईदे आझम केंद्रीय विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागास त्यांचे नाव दिले आहे.
  • अब्दुस सलाम यांना १९७९मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टिव्हन वाइनबर्ग यांच्यासह संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते.
  • देवकण शोधण्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला होता आणि हा शोध शंभर वर्षांतील सर्वांत मोठे यश मानले जात होते.
  • परंतु गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान या शास्त्रज्ञाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत होते कारण ते अहमदी समाजातील होते.
  • पाकिस्तानच्या कायद्यानुसार अहमदी नागरिकांना स्वत:ला मुसलमान म्हणण्याचा अधिकार नाही.
  • सलाम हे केवळ पहिले पाकिस्तानी नाही तर नोबेल जिंकणारे ते पहिले मुस्लिम होते.
  • पाकिस्तानातील कट्टरपंथीयाच्या दबावामुळे नोबेलविजेते असूनही आपल्या कार्यकाळात त्यांना विद्यापीठात अध्यापनाचे कार्यदेखील करू दिले नाही.
  • १९८४मध्ये पाकिस्तानने एक कायदा करून स्वत:ला मुस्लिम म्हणविणाऱ्या अहमदी व्यक्तीला तुरुंगवासाची तरतूद केली. त्यामुळे अब्दुस यांचा शोध आयुष्यभर पाकिस्तानात दुर्लक्षित राहिला. 
  • पाकिस्तानातील रबाव शहरात अब्दुस सलाम यांना दफन केलेले आहे. या शहरात अहमदी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. 
  • त्यांच्या कबरीवर नोबेल जिंकणारे पहिले मुसलमान असा उल्लेख करण्यात आला होता; परंतु अधिकाऱ्यांनी मुसलमान हा शब्द खोडून काढला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा