चालू घडामोडी : १६ डिसेंबर

लकी ग्राहक आणि डिजि-धन व्यापार योजना

 • निश्चलनीकरणांनतर डिजिटल किंवा कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना ‘निती’ आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.
 • यानुसार ‘लकी ग्राहक योजना’ आणि ‘डिजि-धन व्यापार योजना’ नावाने दोन योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एकूण ३४० कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
 • या योजनेचा गरीब, मध्यमवर्गीय ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा, हा वर्ग डिजिटल क्रांतीचा भाग बनावा हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
 • ‘द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
 • २५ डिसेंबरपासून (नाताळ) पुढील १०० दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत या योजना राबवली जाणार आहेत.
 • या योजनेतील भव्यतम सोडत १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी काढण्यात येईल.
 • या योजनांचा भर सामान्य ग्राहक आणि लघु व मध्यम व्यापारी यांच्यावर असेल आणि त्यांना डिजिटल व्यवहारांसाठी प्रेरित केले जाईल.
 • निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत
 दररोजचे आणि साप्ताहिक पुरस्कार 
 • लकी ग्राहक योजनेअंतर्गत २५ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ या काळात दररोज १५,००० ग्राहकांना प्रत्येकी १००० रुपयांची कॅशबॅक बक्षिसे.
 • याशियावाय दर आठवडय़ाला ७००० ग्राहकांना १ लाख, १० हजार आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे.
 • डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दर आठवडय़ाला ७००० व्यापाऱ्यांना ५० हजार, ५००० आणि २५०० रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.
 • १४ एप्रिल २०१७ रोजी विजेत्या ग्राहकाला १ कोटी, दुसऱ्या क्रमांकाला ५० लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल.
 • तर व्यापाऱ्यांना ५० लाख, २५ लाख आणि ५ लाख रुपये किंमतीची एकूण तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.
 योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता 
 • ५० ते ३००० रुपयांपर्यंतचे डिजिटल व्यवहार त्यासाठी पात्र असतील.
 • यूपीआय, यूएसएसडी, आधार कार्डाशी संलग्न डिजिटल पेमेंट यंत्रणा, रुपे कार्ड यांच्या माध्यमातून केलेले कॅशलेस व्यवहार पात्र असतील.
 • मात्र खासगी क्रेडिट कार्ड आणि खासगी कंपन्यांनी दिलेली ई-वॉलेट्स यांच्या माध्यमातून केलेले व्यवहार योजनेत पात्र ठरणार नाहीत.
 • ग्राहक व व्यापाऱ्यांच्या डिजिटल व्यवहार आयडींमधून लकी ड्रॉ काढून विजेते ठरवले जातील.

महामार्गांवरील दारूच्या दुकानांवर बंदी

 • देशातील अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूच्या सर्व दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
 • मात्र दुकान मालकांना मुभा देत जोपर्यंत परवाना आहे तोपर्यंत दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
 • या दुकानांच्या परवान्यांचे ३१ मार्च २०१७नंतर नूतनीकरण करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले.
 • तसेच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानांच्या बोर्डांवरही प्रतिबंध आणले आहेत.
 • दारुची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत असं न्यायालयाने सांगितले आहे.

बिल इंग्लिश न्यूझीलंडचे ३९वे पंतप्रधान

 • उपपंतप्रधानपद तसेच तीन वेळा अर्थखाते सांभाळलेल्या बिल इंग्लिश यांनी १२ डिसेंबर रोजी न्यूझीलंडचे ३९वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
 • काहीसे पुराणमतवादी अशी त्यांची ओळख असली तरी अनुभवातून नवे स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
 • १९८०पासून नॅशनल पार्टीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आता ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत.
 • वाणिज्य व साहित्यातील ते पदवीधर आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेती करत होते.
 • १९९०साली ते पहिल्यांदा संसदेवर निवडले गेले. त्यानंतर त्यांच्याकडे उपपंतप्रधान तसेच अर्थखात्याची धुरा आली.
 • जॉन की यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लिश यांची नॅशनल पार्टीच्या पक्षनेतेपदी व नंतर पंतप्रधानपदी निवड झाली.

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे निधन

 • नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे मेरिलँड येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
 • शिलिंग यांनी हार्वर्ड तसेच मेरिलँड विद्यापीठात प्राध्यापकी केली होती. शिलिंग यांना २००५मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते.
 • स्पर्धात्मक परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या गणितीय गेम थिअरीचा त्यांनी प्रभावी वापर केला होता.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ

 • अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात ०.२५ टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हचा व्याज दर आता ०.२५ टक्क्यांवरून ०.५० टक्के झाला आहे.
 • यामुळे जगभरातील शेअर बाजार आणि सोन्या-चांदीचे बाजार घसरले आहेत. अमेरिकी डॉलर मजबूत होऊन अन्य देशांचे चलन घसरले आहेत.
 • अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असल्यामुळे व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

डेव्हिड फ्रीडमन इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत

 • अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेव्हिड फ्रीडमन यांची इस्राईलमधील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
 • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान फ्रीडमन हे ट्रम्प यांचे अमेरिका-इस्राईल संबंधांसदर्भातील सल्लागार होते.
 • अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिका-इस्राईल संबंध तणावग्रस्त झाले होते.
 • मात्र इस्राईलचे आक्रमक पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

आयटीएफचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार

 • एकेरीमध्ये अँडी मरे आणि दुहेरीमध्ये जेमी मरे यांची आयटीएफचे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • एकाच वर्षात पुरुष विभागात एकेरी आणि दुहेरीत दोन भावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
 • अँडी मरे याने या मोसमात विंबल्डनसह एकूण नऊ विजेतीपदे मिळविली. त्याचबरोबर ऑलिंपिकचे दुसरे सुवर्णपदकही पटकावले आहे.
 • महिला विभागात एकेरीत अँजेलिक किर्बर सर्वोत्कृष्ट ठरली. स्टेफी ग्राफ (१९९६)नंतर प्रथमच जर्मनीची खेळाडू या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
 • दुहेरीत जेमी मरे आणि ब्रुनो सोआरेस, तर महिलांमध्ये कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्तिना म्लाडेनोविच यांनी हा पुरस्कार मिळविला.

1 टिप्पणी: