चालू घडामोडी : ३१ जानेवारी


मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त दत्तात्रेय पडसळगीकर

 • मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त दत्तात्रेय पडसळगीकर यांनी ३१ जानेवारीपासून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
 • १९८२च्या आयपीएस तुकडीतील कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी असलेले पडसळगीकर ‘मिस्टर क्लीन’ या नावानेही ओळखले जातात.
 • केंद्रीय गुप्तचर विभागात १७ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेले पडसळगीकर माजी पोलिस आयुक्त अहमद जावेद यांची जागा घेतील.
 • नव्वदच्या दशकात मुंबई पोलिस दलात उपायुक्त म्हणून काम केलेले पडसळगीकर नंतरच्या काळात गुप्तचर विभागात उपसंचालक पदावर रुजू झाले. पुढे ते गुप्तचर विभागात सहसंचालक पदावर पोहचले.
 • त्यानंतर तीन वर्षे ते वॉशिंग्टन येथे प्रतिनियुक्तीवर होते. याच काळात अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी झालेल्या प्रयत्नांत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 • त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक (१९९८), राष्ट्रपतींचे शौर्यपदक (२००६) देऊन गौरविण्यात आले आहे.

जोकोविच अजिंक्य

  Novak Djokovic wins Australian open 2016
 • जागतिक रँकिंगमध्ये क्रमांक एकचा खेळाडू असलेल्या जोकोविचने फायनलमध्ये ब्रिटनच्या दुसऱ्या सीडेड विजय मिळवून सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली.
 • नोवाक जोकोविचने अँडी मरेचा ६-१, ७-५, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने यापूर्वी २००८, २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे.
 • जोकोविचचे हे ११ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. त्यात सहा ऑस्ट्रेलियन ओपन, तीन विम्बल्डन आणि दोन यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
 • जोकोविचने या जेतेपदासह ऑस्ट्रेलियन रॉय इर्मसन यांच्या सहा ऑस्ट्रेलियन जेतेपदांशी बरोबरी केली. हा विक्रम गेली ४९ वर्षे कुणीच मोडलेला नाही.
 • जोकोविचने ११वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावताना स्वीडनचा महान टेनिसपटू ब्योन बोर्ग आणि ऑस्ट्रेलियाच्या रोड लेव्हरच्या विक्रमाची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियन ओपनचे मानकरी
पुरुष एकेरी नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी अँजलिक कर्बर
पुरुष दुहेरी जॅमी मरे-ब्रुनो सॉरेस
महिला दुहेरी मार्टिना हिंगिस-सानिया मिर्झा
मिश्र दुहेरी एलिना व्हेसनिना-ब्रुनो सॉरेस

भारताची ऐतिहासिक कामगिरी

 • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-२० सामनाही जिंकून प्रथमच त्यांना त्यांच्याच मायभूमीत ‘व्हाइटवॉश’ देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. 
 • ही टी-२० मालिका भारताने ३-० अशी जिंकली. विराट कोहली या मालिकेचा मालिकावीर ठरला.
 • या टी-२० मालिकेतील निर्विवाद वर्चस्वाबरोबर भारताने टी-२० आयसीसी क्रमवारीतही १२० गुणांसह अव्वलस्थान पटकावले. 
 • जागतिक क्रिकेटला सुरवात झाल्यापासून ऑस्ट्रेलियाला आपल्या मायभूमीत कधीही ‘व्हाइटवॉश’ला सामोरे जावे लागले नव्हते. पण, महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय संघाने हा १४० वर्षांचा इतिहास बदलला.

२०१६-१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र

 • महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची नवी दिल्ली येथे घोषणा केली.
 • आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे व त्यातून रोजगारनिर्मितीसाठी मोठा वाव असलेल्या पर्यटन व्यवसाय व उद्योगाला गतिमान करणे हा हेतू त्यामागे आहे.

‘मन की बात’ लवकरच मोबाइलवर

 • देशातील कोट्यवधी जनतेसाठी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर सुरू केलेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम यापुढे मोबाइलवरही ऐकता येणार आहे. ८१९०८८१९०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देताच मोदींची ‘मन की बात’ मोबाइलवरही ऐकता येईल. 
 • पंतप्रधान मोदी यांनी ३१ डिसेंबर रोजी १६व्या ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. स्टार्ट-अप, पीक विमा योजना, सौर ऊर्जेशी संबंधित विविध योजनांविषयी मोदी यांनी यावेळी माहिती दिली.
 • तसेच त्यांनी ‘मन की बात’ मोबाइलवर येणार असल्याची माहिती दिली. सध्या हा कार्यक्रम हिंदीत असला तरी लवकरच प्रादेशिक भाषांमध्येही त्याचे प्रसारण केले जाईल.

सीरियात आत्मघाती बॉम्बस्फोट

 • सीरियातील दमास्कस प्रांतातल्या सय्यदा जैनब या शिया मुस्लिमांच्या मशिदीत दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केले. या हल्ल्यात ४५ जण ठार आणि ११० नागरिक जखमी झाले आहेत.
 • सीरिया सरकार आणि विरोधक यांच्यात यूएनच्या मध्यस्थीने चर्चा सुरू होण्याआधीच ही घटना घडली. याआधी २०१५ च्या फेब्रुवारीतही या मशिदीवर हल्ला झाला होता.
 • लागोपाठ झालेल्या या हल्ल्यांमुळे शिया मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र असलेल्या मशिदीच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले.
 • मोहम्मद पैगंबराच्या नातीची कबर असल्यामुळे शिया मुस्लिमांसाठी या मशिदीचे महत्त्व खूप जास्त होते. सीरिया सरकारने मशिदीच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळेच शियापंथीय दहशतवादी संघटना आणि इराण सरकारचा बशर-अल-असद यांच्या सरकारला पाठिंबा मिळत आहे.
 • सीरियाचे अध्यक्ष : बशर-अल-असद

चालू घडामोडी : ३० जानेवारी


झिका विषाणूला रोखण्यासाठी तांत्रिक गटाची स्थापना

 • झिका विषाणूचा परदेशात प्रसार सुरू असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्याचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये यावर देखरेख करण्यासाठी एका तांत्रिक गटाची स्थापना केली आहे. झिका विषाणूचा फैलाव झाल्याच्या स्थितीवर हा गट लक्ष ठेवेल तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी करेल.
 • काही देशात झिका विषाणू फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोग्य मंत्रालयाचे आणि एम्सचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
 • जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक असून वेगाने पसरत आहे, शिवाय तो भारतासारख्या देशावर परिणाम करू शकतो.
 झिका विषाणू 
 • ताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • या विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे. 
 • प्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते.
लक्षणे
 • या रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात.
प्रसार व तीव्रता
 • १९४७मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती. १९६०मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला. काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले.
 • २०१४ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडून हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह २३ देशांमध्ये विषाणू पसरला आहे 
 • या विषाणूमुळे आतापर्यंत ५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
उपाय
 • या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
 • अमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक
 • या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठक बोलाविली आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.

महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक स्टम्पिंगचा विक्रम

 • टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
 • याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक बनला आहे. लंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा याचा १३९ स्टम्पिंगचा विक्रम त्याने मोडित काढला. धोनीने जडेजाच्या चेंडूवर फॉल्कनरला यष्टिचित करीत हा मान मिळविला.

अमृता शेरगिल यांचा १०३वा जन्मदिन

  Three Girls by Amrita Sher Gil
 • अमृता शेरगिल या भारतातील विसाव्या शतकातील प्रसिद्ध महिला चित्रकार होत्या. देशातील कलेवरील बंधने झुगारून स्वतःला भावणारी, समाजाचे वास्तव चित्रण करणारी चित्रे त्यांनी चितारली.
 • शेरगिल यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे ३० जानेवारी १९१३ मध्ये झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील उमरावसिंग शेरगिल हे भारतीय तर आई अँटोनी गोट्‌समन ही हंगेरियन होती.
 • कलेचे शिक्षण त्यांनी पॅरिसमध्ये घेतले. पूर्व युरोप व दक्षिण आशियाई चित्रकलेचा त्यांच्यावर प्रभाव होता. चित्रकार म्हणून त्यांनी कामाला पॅरिसमधून सुरवात केली. परंपरेला छेद देणारी चित्रे काढण्याकडे त्यांचा कल होता.
 • भारतात आल्यानंतर त्यांनी आपले कुटुंब व मित्रपरिवातील सदस्यांची अनेक चित्रे काढली. भारतीय महिलांची चित्रे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या चित्रांमधून महिलांच्या सामाजिक स्थितीचेही दर्शन घडते. यात ‘तीन लडकियॉं’ हे त्यांचे चित्र विशेष गाजले.
 • वयाच्या केवळ २९ व्या वर्षी १९४१ मध्ये आजारामुळे त्यांचे निधन झाले. चित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द अल्प ठरली. त्यांनी या काळात १७४ चित्रे काढली. त्यातील ९५ चित्रे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जतन करण्यात आली आहेत. 
 • शेरगिल यांचे आयुष्य व चित्रकलेतील संस्मरणीय कारकीर्द पाहून त्या भारताच्या ‘फ्रिडा काहोल’ असल्याचे गुगलने म्हटले आहे. फ्रिडा काहोल या मेक्सिकोतील विसाव्या शतकातील महिला चित्रकार होत्या. त्यांची अनेक व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत.

अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

 • जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अँजेलिकचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
 • केर्बरने अंतिम सामन्यात सेरेनावर ६-४, ३-६, ६-४ अशी मात केली. ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविणारी अँजेलिक कर्बर जर्मनीची दुसरीच खेळाडू ठरली. यापूर्वी स्टेफी ग्राफने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले होते. 
 • सध्या जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावरील अँजेलिकने या जेतेपदामुळे दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • ऑस्ट्रेलियन ओपनमधील ७वे आणि एकूण २२वे ग्रॅंड स्लॅम जेतेपद मिळविण्याचे सेरेनाचे लक्ष्य होते. हे विजेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती. 

जनरल के व्ही कृष्णराव यांचे निधन

 • निवृत्त लष्कर प्रमुख जनरल के व्ही कृष्णराव यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
 • जनरल के व्ही कृष्णराव यांची १९८१ साली १४वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारतीय लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार जुलै १९८३ पर्यंत पाहिला. तसेच, ते चिफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षही होते.
 • काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असतानाच्या काळातच त्यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. तसेच १९७१च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 • त्यांनी बजावलेल्या अतुलनीय लष्करी सेवेबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवही करण्यात आला होता.

फेसबुकवर हत्यारांच्या विक्रीस बंदी

 • ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोकांनी परस्परांना बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेत नसल्याचे कारण सांगत फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
 • अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सना आवाहन केले होते, की त्यांनी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हत्यारांच्या व्यवहारांना आळा घालावा. 
 • याआधी फेसबुकने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मारिजुआना, बेकायदेशीर ड्रग्ज विकण्यास बंदी घातलीच होती, त्यामध्ये आता हत्यारांची भर पडली आहे.

चालू घडामोडी : २९ जानेवारी


सानिया-मार्टिना अजिंक्य

 • भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 • सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
 • जेतेपदासह सानिया-मार्टिना जोडीने सलग ३६ लढतीत अपराजित राहण्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या लढती जिंकताना या जोडीने सलग आठ जेतेपदांवर नाव कोरले आहे. 
 • चालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रॅंडस्लॅम आहे. तर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सानियाचे दुसरे जेतेपद आहे. २००९ म
 • ध्ये सानियाने महेश भूपतीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले होते.

सायबर सुरक्षेसंदर्भातील सामंजस्य करारांचा आढावा

 • सायबर सुरक्षेबाबत भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सीईआरटी-इन आणि मलेशिया, सिंगापूर आणि जपानमधल्या संबंधित संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.
 • या सामंजस्य करारांमुळे भारत आणि संबंधित देश यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भातल्या घटनांचा तपास, अशा घटना रोखणे याबाबत ज्ञान आणि अनुभवांच्या आदान-प्रदानाला चालना मिळून सहकार्य अधिक दृढ व्हायला मदत  होईल.
 • सायबर सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबतच्या तीन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याचा तपशील याप्रमाणे-
 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात २३ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेसंदर्भात सीईआरटी-इन आणि सायबर सिक्युरिटी मलेशिया यांच्यात सामंजस्य करार झाला.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात २४ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सीईआरटी-इन आणि सिंगापूर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सायबर सुरक्षा एजन्सी सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार झाला.
 3. सीईआरटी-इन आणि जपान कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यात ७ डिसेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सामंजस्य करार झाला. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान २२ डिसेंबर २०१५ला पूर्ण झाले.

गुजरातचे वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक माघारी

 • गुजरात विधानसभेने पारित केलेले वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अतिरिक्त माहितीची पूर्तता करण्याची सूचना करत परत पाठवले आहे. राष्ट्रपतींनी हे विधेयक माघारी पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे.
 • ‘गुजरात कण्ट्रोल ऑफ टेररिझम अ‍ॅण्ड ऑर्गनाइझ्ड क्राइम विधेयक २०१५’ या नावाने हे विधेयक गुजरात विधानसभेत एप्रिल २०१५मध्ये मंजूर करण्यात आले होते.
 • हे विधेयक यापूर्वी गुजरात विधानसभेने दोनदा मंजूर करून राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कठोर तरतुदी असल्याने दोन्ही वेळेस तत्कालीन राष्ट्रपतींनी हे विधेयक फेटाळले होते.
 • तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००४मध्ये पहिल्यांदा हे विधेयक परत पाठवले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीदेखील हे विधेयक राज्य सरकारला परत पाठवले होते.
 • संबंधितांचे दूरध्वनी ‘टॅप’ करून न्यायालयात त्याचा वापर पुराव्यादाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्याची वादग्रस्त तरतूद या विधेयकामध्ये आहे.
 • तसेच पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात सादर करता येऊ शकेल तसेच आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तपासाचा सध्याचा कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवसांवर वाढविण्याच्या तरतुदीही या विधेयकात आहेत.

ई-तिकिटांचा काळा बाजार बंद होणार

 • रेल्वे प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासंदर्भातील नियमांमध्ये रेल्वे खात्याने (आयआरसीटीसी) बदल केले आहेत. 
 • ऑनलाईन तिकिट बुक करताना एका व्यक्तीचे लॉग-इन वापरून एका दिवसात दोनवेळा व एका महिन्यात फक्त सहावेळाच तिकिटे बुक करता येणार आहेत. सध्या एका युजरला महिनाभरात १० तिकिटे बुक करता येतात.
 • रेल्वेकडून १५ फेब्रुवारीपासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने काही प्रवाशांना अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे.
 • या नव्या नियमानुसार तत्काळ बुकिंगमध्ये एका व्यक्तीला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत फक्त दोन तिकीटे घेता येतील.

एनसीसी संचालनात महाराष्ट्र तिसरा

 • गेल्या २५ वर्षांपैकी १७ वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राला एनसीसी संचालनात यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • पंजाब, चंदिगड, हरियाणा हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला पंतप्रधान बॅनरचा तर कर्नाटक, गोवा या संयुक्त संचालनालयाला उपविजेतेपदाचा मान मिळाला आहे.
 • दिल्लीतील छावणी भागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व वितरण करण्यात आले.

विन्सन मॅसिफ सर करणारी पहिली आयपीएस : अपर्णा कुमार

 • उत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार हिने अंटार्क्टिकातील सर्वांत उंच शिखर माऊंट विन्सन मॅसिफ सर करुन विक्रम केला आहे. या शिखरावर तिरंगा फडकावणारी ती पहिली प्रशासकीय अधिकारी ठरली आहे.
 • ५ जानेवारी रोजी वेगवेगळ्या देशातील १० सदस्याच्या टीमसोबत ही मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यात अपर्णाचा समावेश होता. तिने १७ जानेवारी रोजी हा विक्रम आपल्या नावावर केला.
 • आता जगभरातील ७ आव्हानात्मक शिखरांपैकी ५ शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोहिमेतही ती सहभागी होणार आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले या शिखरांचाही समावेश यात आहे.
 • लखनौच्या पोलिस डेलिकॉम विभागात अर्चना डीआयजी आहे. २००२ च्या बॅचची ती आयपीएस अधिकारी आहे.
 • गिर्यारोहणात अनेक विक्रम आपल्या नावावर केल्याने मार्च २०१५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ देऊन अपर्णाला गौरविले होते. प्रजासत्ताक दिनाला तिला स्पेशल डीजीपी रिकमेंडेशन डिस्कही प्रदान करण्यात आली.

धोनीच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

 • एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याप्रकरणी धोनीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला आणि त्याच्यावर बजावण्यात आलेल्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
 • महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात ८ जानेवारीला अनंतपूरमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
 • एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते वाय. श्यामसुंदर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका धोनीवर ठेवण्यात आला.

भारताच्या महिला क्रिकेट संघाचा विक्रम

 • भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका विजयाचा इतिहास घडवला. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. 
 • मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सने पराभूत केले.
 • पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी १० षटकांत ६६ धावांचे आव्हान होते. भारताच्या सलामी जोडीने हे आव्हान अवघ्या ९.१ षटकांत पूर्ण केले.

अयोनिका पॉलचा रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित

 • राष्ट्रकुल पदकप्राप्त मुंबईकर अयोनिका पॉलने आशियाई ऑलिम्पिक नेमबाजी पात्रता स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदकासह रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.
 • २३ वर्षीय आयोनिकाने २०५.९ गुणांची नोंद केली. इराणच्या नारमेह खेदामती हिने सुवर्ण पदक मिळविले. तिचेही २०५.९ गुण झाले. त्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला. त्यामध्ये आयोनिकाने ९.९ गुण नोंदविले, तर खेदामती हिने १०.१ गुणांची नोंद केली.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती अकरावी भारतीय नेमबाज आहे.

इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६

 • अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त करून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका समूहाने त्यांच्या प्रचारासाठी एक राजकीय कृती समिती स्थापन केली आहे.
 • आयोगाकडे ‘इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६’ची नोंदणी राजकीय कृती समिती म्हणून करण्यात आली आहे. अमेरिकेचे पुढील अध्यक्ष ट्रम्प हेच व्हावेत यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचा पाठिंबा मिळविण्याचा या गटाचा उद्देश आहे.
 • अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणे, जागतिक पातळीवर अमेरिकेला योग्य पद्धतीने आणणे, दहशतवादाचा नि:पात करणे हे ट्रम्प यांचे कार्यक्रम उत्तम आहेत असे या समूहाला वाटत आहे.
 • सेटन हॉल विद्यापीठातील प्राध्यापक ए. डी. अमर हे या समूहाचे अध्यक्ष आहेत, तर न्यूयॉर्कमधील अॅटर्नी आनंद अहुजा हे उपाध्यक्ष आहेत.

नथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन

 • ‘नथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन’ असे या पुस्तकाचे नाव असून ते अनुप अशोक सरदेसाई यांनी लिहिले आहे. 
 • त्याचे प्रकाशन गांधी पुण्यतिथी म्हणजेच ३० जानेवारीला मडगावच्या रवींद्र भवन येथे भाजप नेते दामोदर नाईक यांच्या हस्ते होणार आहे.

चालू घडामोडी : २८ जानेवारी


पहिल्या वीस स्मार्ट सिटींची यादी जाहीर

  Smart Cities
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या ९७ शहरांच्या प्रस्तावांच्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांची यादी केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली आहे.
 • या विजेत्या शहरात मध्य प्रदेशातल्या तीन; महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी दोन तर  ओदिशा, केरळ, दिल्ली, आसाम आणि पंजाबमधल्या प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे.
 • या यादीत भुवनेश्वरने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. तर सोलापूर नवव्या क्रमांकावर आहे.
 • २०१६-१७ या वित्तीय वर्षात आणखी ४० स्मार्ट सिटींची निवड होणार असून त्यानंतरच्या २०१७-१८ या वित्तीय वर्षात उर्वरित शहरांची निवड होईल.
 • या शहरांना पहिल्या दोन वर्षांत दोनशे कोटी तर पुढील तीन वर्षांत शंभर कोटी रुपये विकास कामांसाठी दिले जाणार आहेत.
 • देशात शंभर स्मार्ट सिटींची निर्मिती करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने दिले होते. पण जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश राज्यांनी एक-एक शहराचे नाव न दिल्यामुळे प्रस्तावित स्मार्ट सिटींची संख्या ९८ झाली आहे.
पहिल्या यादीतील शहरे
क्र. शहर राज्ये
भुवनेश्वर ओदिशा
पुणे महाराष्ट्र
जयपूर राजस्थान
सूरत गुजरात
कोची केरळ
अहमदाबाद गुजरात
जबलपूर मध्य प्रदेश
विशाखापट्टणम आंध्र प्रदेश
सोलापूर महाराष्ट्र
१० दावणगिरी कर्नाटक
११ इंदोर मध्य प्रदेश
१२ नवी दिल्ली म्युनसिपल कॉन्सिल दिल्ली
१३ कोइम्बतूर तामिळनाडू
१४ काकीनाडा आंध्र प्रदेश
१५ बेळगावी कर्नाटक
१६ उदयपूर राजस्थान
१७ गुवाहाटी आसाम
१८ चेन्नई तामिळनाडू
१९ लुधियाना पंजाब
२० भोपाळ मध्य प्रदेश

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६

 • माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीच्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ २०१६’चे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
 • ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल आणि मिफ्फचे ब्रँड ॲम्बॅसिडर जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन झाले.
 नरेश बेदी यांना व्ही. शांताराम जीवन गौरव 
 • मिफ्फ २०१६च्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस आणि राज्यवर्धन राठोड यांनी वन्यजीव चित्रपटनिर्माते, नरेश बेदी यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
 • सन्मानचिन्ह, शाल आणि पाच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि फिल्म्स डिव्हिजनचे माजी प्रमुख व्ही. शांताराम यांच्या स्मरणार्थ हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो.
 • अग्रगण्य वन्यजीव माहितीपट निर्मात्यापैकी एक मानले जाणारे नरेश बेदी, बेदी बंधुपैकी ज्येष्ठ बंधू असून, वाईल्डस्क्रीन रेड पांडा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई आहेत.
 • पुण्यातल्या एफ टी आय आय ची पदवी प्राप्त केलेल्या बेदी यांचे माहितीपट नॅशनल जिओग्राफीक, डिस्कव्हरी, बीबीसी, चॅनेल ४ या वाहिन्यांवर दाखवले गेले आहेत. वन्यजीवनातल्या अनेक दुर्मिळ क्षणांचे चित्रीकरण केल्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
 मिफ्फ २०१६ संबंधी अधिक माहिती 
 • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनने आयोजित केलेल्या मिफ्फ २०१६ या द्वैवार्षिक महोत्सवाला महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य लाभले आहे.
 • या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत ३० चित्रपट दाखविले जाणार आहेत. त्यात भारतातल्या १२ चित्रपटांचा समावेश आहे. तर, सुवर्ण शंख पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्पर्धेत २७ चित्रपट आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ३८५ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

‘डब्ल्यूईएफ’च्या विशेष कार्यदलात रघुराम राजन

 • इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी यांच्यासह भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह एक विशेष कार्यदलात सामील झाले आहेत. जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ)ने जगभरातील वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी या कार्यदलाची स्थापना केली आहे.
 • या कार्यदलात वित्तीय क्षेत्रातील काही बडय़ा नाममुद्रांचे प्रमुखही आहेत. बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनिहान आणि एचएसबीसीचे अध्यक्ष डग्लस फ्लिंट यांचाही समावेश आहे.
 • जागतिक आर्थिक मंचाकडून स्थापित हे कार्यदल तंत्रज्ञानात्मक नावीन्यता व त्यांची वित्तीय स्थिरता आणि वाढीच्या दृष्टीने भूमिका, देशोदेशींची नियामक व्यवस्था आणि पतधोरणांचा कल आणि मुख्यत: वित्तीय सेवा क्षेत्राची विश्वासार्हता या मुद्दय़ांबाबत अभ्यास करेल.


अरिंदम सेनगुप्ता यांचे निधन


 • टाइम्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक अरिंदम सेनगुप्ता यांचे २८ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. गेले अनेक दिवस ते कॅन्सरशी झुंज देत होते.
 • सेनगुप्ता १९८८ ते १९९० या काळात टाइम्स ग्रुपमध्ये कार्यरत होते. १९९१ मध्ये ते पुन्हा ग्रुपमध्ये सहभागी झाले. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या समन्वय संपादक या पदावर काही काळ काम केल्यानंतर सेनगुप्ता यांनी वर्तमान पत्राच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले. पुढे मार्च २००४ मध्ये ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत झाले.
 • टाइम्स ग्रुपमधील आपल्या संस्मरणीय कारकिर्दी दरम्यान सेनगुप्ता यांनी राजकारण, आंतरराष्ट्रीय मुद्दे, चित्रपट आणि संगीताबरोबर इतर अनेक विषयांवर केलेले लिखाण गाजले.


टीबॉक्समध्ये रतन टाटांची वैयक्तिक गुंतवणूक


 • चहा व्यवसायातील नवउद्यमी टीबॉक्समध्ये रतन टाटा यांनी आपली नवी वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
 • २०१२ ची स्थापना असलेली टीबॉक्स ही कंपनी भारतातील दार्जिलिंग, आसाम, निलगिरी तसेच नेपाळमधील चहा जगभरात निर्यात करते. कंपनीद्वारे विविध ९३ देशांमध्ये चहाची पोच होते.
 • रतन टाटा यांनी यापूर्वी स्नॅपडील, कार्याह, उर्बन लॅडर, ब्ल्युस्टोन, कारदेखो, सबसे टेक्नॉलॉजिज, शिओमी, ओला आदी नवउद्यमी कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
 • कलारी कॅपिटल, जंगल व्हेंचर्ससारख्या ई-कॉमर्समधील कंपन्यांच्या संचालक मंडळावर रतन टाटा हे सल्लागार म्हणूनही आहेत.
 • टीबॉक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी : कौशल दुगर


मोहित कम्बोज पुन्हा ‘आयबीजेए’चे अध्यक्ष


 • सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)’मध्ये सर्व घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व मिळविण्याच्या दृष्टीने अलीकडेच झालेल्या निवडणुकीत २० सदस्यीय कार्यकारी मंडळाने माजी राष्ट्रीय अध्यक्ष मोहित कम्बोज यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली.
 • डिसेंबर २०१५मध्ये सराफाव्यतिरिक्त सोन्याचे व्यापारी, हिरे व्यापार, दळणवळण, बिगरबँकिंग वित्तीय संस्था, आभूषणांचे निर्माते असे या व्यवसायाशी निगडित अन्य घटक आणि या क्षेत्रात कार्यरत विविध मंडळांचे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी आयबीजेएचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तत्पश्चात २०१६ ते २०२१ सालच्या कार्यकारी मंडळासाठी निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली.

हीना सिधू व क्यान चेनाईचा रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित

 • भारताची दिग्गज नेमबाजपटू हीना सिधूने दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला.
 • रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारी ती नववी नेमबाजपटू ठरली आहे. हीनाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवताना ११९.४ गुणांची कमाई केली.
 • ट्रॅप नेमबाज क्यान चेनाईने देखील आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेद्वारे रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा क्यान दहावा नेमबाज ठरला आहे.


वेमुला आत्महत्या प्रकरणासाठी न्यायिक आयोगाची स्थापना


 • हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोककुमार रूपनवाल यांच्या नेतृत्वाखालील एक सदस्यीय न्यायिक आयोगाकडे सोपविली आहे.
 • निवृत्त न्यायाधीश रूपनवाल हे घटनाक्रमाचा, स्थितीचा आढावा घेतील आणि वस्तुस्थिती जाणून घेतील. या आयोगाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
 • मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सत्यशोधन समितीने याआधीच आपला अहवाल सरकारला सादर केला आहे.

इंद्रजीत सिंह रेयत यांची कारागृहातून सुटका

 • एअर इंडिया कनिष्कमध्ये १९८५मध्ये झालेल्या स्फोटातील एकमेव दोषी इंद्रजीत सिंह रेयत हे कारागृहाबाहेर आले आहेत.
 • या विमानस्फोटात सर्व ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे हे विमान माँट्रियल (कॅनडा) येथून लंडनमार्गे भारताकडे जात होते.
 • या स्फोटाप्रकरणी रिपुदमन सिंह मलिक आणि अजायबसिंह बागरी यांच्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी २०१० मध्ये इंद्रजीतसिंह रेयत यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
 • रेयत हे पंजाबहून कामासाठी कॅनडात आले होते. त्यांनी डायनामाईट, डिटोनेटर्स आणि बॅटरी खरेदी केल्या होत्या. त्यांच्या मदतीने विमानात स्फोट घडवून आणण्यात आले होते.


अमेरिकेत 'जिका' या विषाणूचे थैमान


 • एडिस डासांद्वारे फैलावणाऱ्या 'जिका' या विषाणूने कॅरेबियनसह उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत थैमान घातले आहे. कॅरेबियन, तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील २१ देशांत या विषाणूचा प्रसार झाला आहे.
 • उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील सर्व देशांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
 • 'जिका' विषाणूची लागण झालेल्या रुग्णामध्ये ताप, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या विषाणूची लागण झालेल्या गर्भवती महिला सामान्य आकारापेक्षा लहान डोके असलेल्या बाळांना जन्म देत असल्याचे समोर आले आहे.
 • या पार्श्वभूमीवर अल साल्वाडोर या देशाने २०१८पर्यंत महिलांनी गर्भवती राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत. कोलंबिया, जमैका, होंडुरास या देशांनीही महिलांनी काही महिन्यांपर्यंत गर्भवती राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
 • ब्राझिलमध्ये आतापर्यंत सुमारे दहा लाख जणांना या 'जिका' विषाणूची लागण झाली आहे. येथे ३८९३ बालकांमध्ये मायक्रोसेफॅली हा विकार आढळला आहे. या रोगामुळे चेतासंस्थेच्या वाढीत बाधा उत्पन्न होऊन बालकाच्या डोक्याचा आकार लहान राहतो. याचा विपरीत परिणाम मेंदूच्या विकासावर होतो. 
 • जगात 'जिका' विषाणूची लागण किती जणांना झाली आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु त्याविरोधात तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदी न्या. संजय मिश्रा

 • १६ डिसेंबर २०१५ला दिलेला स्वत:चा आदेश मागे घेत सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मिश्रा यांना उत्तर प्रदेशचे नवे लोकायुक्त नेमले.
 पार्श्वभूमी 
 • गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून एका असाधारण आदेशाद्वारे न्या. वीरेंद्र सिंग यांची उत्तर प्रदेशचे लोकायुक्त म्हणून नेमणूक केली होती.
 • मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या समितीने या पदासाठी सहमतीने एक नाव सुचवण्याच्या आपल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
 • मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. वीरेंद्र सिंग यांच्या नावाबाबत आक्षेप घेतल्याची बाब सर्वोच्च न्यायालयापासून लपवून राज्य सरकारने न्यायालयाची फसवणूक केली असल्याचे उत्तर प्रदेशातील एक नागरिक सच्चिदानंद गुप्ता यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर न्यायालयाने या नेमणुकीला स्थगिती दिली होती.

चालू घडामोडी : २७ जानेवारी


भारताच्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सुधारणा नाही

  Transparency International
 • ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांकाच्या अहवालानुसार भारतातील भ्रष्टाचारात २०१४सालापासून काहीही फरक पडला नसल्याचे आढळून आले आहे.
 • २०१४मध्ये भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक (करप्शन परसेप्शन इंडेक्स (सीपीआय)) ३८ इतका होता व भारत ८५व्या क्रमांकावर होता. २०१५मध्ये भारताच्या क्रमांकामध्ये सुधारणा होऊन तो ७६व्या स्थानावर पोचला आहे. परंतु सीपीआय मात्र ३८च राहिला आहे.
 • देशातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारला आणखी बरेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
 • पाकिस्तान हा सार्क राष्ट्रांमधील असा एकमेव देश आहे ज्याच्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सुधारणा झाली आहे.
 ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल 
 • विविध देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार मोजण्याचा काम ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही संस्था करते. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशाला १०० गुण दिले जातात.
 • मागील वर्षी १७६ देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण तपासण्यात आले होते. तर यंदा केवळ १६८ देशांचाच अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे भारताचा क्रमांक ८५वरून ७६वर गेला आहे.
 • २००१४प्रमाणे २०१५मध्येही जगभरात डेन्मार्कमध्ये (सीपीआय ९१) सर्वात कमी भ्रष्टाचार होत असल्याचे आढळून आले आहे. त्या खालोखाल स्वीडन आणि फिनलॅंडचा समावेश आहे.
 • तर सोमालिया (सीपीआय ८)  देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असून त्याखालोखाल उत्तर कोरिया व अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो.
 • कमी भ्रष्टाचारी देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, सत्तेत असलेल्या लोकांचा प्रामाणिकपणा आणि निरपेक्ष तसेच स्वायत्त न्यायव्यवस्था ही भ्रष्टाचार कमी असण्यामागची कारणे असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने नमूद केले आहे.

भारताशेजारील देशांची स्थिती
देश क्रमांक सीपीआय
भूतान २७ ६५
चीन ८३ ३७
पाकिस्तान ११७ ३०
नेपाळ १३० २७
बांगलादेश १३९ २५
म्यानमार १४७ २२
अफगाणिस्तान १६६ ११

डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे निधन

 • साहित्यकृतींचा नव्याने वेध घेत, अभिजात रसिकतेची साक्ष पटविणारे ज्येष्ठ समीक्षक दत्तात्रेय भिकाजी ऊर्फ डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे २७ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
 • मराठी साहित्यातील समीक्षेचा मानदंड असणारे ‘दभि’ हे सौंदर्यवादी, सैद्धांतिक समीक्षेसाठी ओळखले जात.
 ‘दभिं’चा अल्पपरिचय 
 • पूर्ण नाव : दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
 • जन्म : २५ जुलै १९३४ (नागपूर) 
 • शिक्षण व कार्य : नागपूर विद्यापीठात पीएच.डी. 
 • विदर्भ साहित्य संघातर्फे साहित्य वाचस्पती पदवी (डी.लिट.समकक्ष पदवी)
 • नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश 
 • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग
 • नागपूरचे विकास विद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले विद्यालय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापन केले
 मान-सन्मान 
 • महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार 
 • नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक 
 • अध्यक्ष, ८३वे मराठी साहित्य संमेलन २०१० (पुणे) 
 • न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्युनच उत्कृष्ट कथा पुरस्कार 
 • महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 
 • ‘स्वरूप व समीक्षा’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार 
 • पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार 
 • ‘अंतरिक्ष फिरलो पण‘ ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार. 

प्रकाशित साहित्य
अंतरिक्ष फिरलो पण.. अन्यनता मर्ढेकरांची अपार्थिवाचा यात्री
स्वरूप व समीक्षा, चौदावे रत्न जीएंची महाकथा मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
देवदास आणि कोसला जुने दिवे अपार्थिवाचे चांदणे
ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती नवे दिवे महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
मराठी वाङ्‌मयाचा इतिहास दुसरी परंपरा समीक्षेची चित्रलिपी
पहिली परंपरा द्विदल हिमवंतीची सरोवरे
पार्थिवतेचे उदयास्त पस्तुरी पोएट बोरकर

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती : बिल गेट्स

  Bill Gates
 • वेल्थ-एक्स कंपनीने नव्याने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. गेट्स यांच्याकडे ८७.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५.९ लाख कोटी इतकी संपत्ती आहे.
 • यादीत इंडीटेक्स फॅशन ग्रुपचे अमाचिओ ओर्टेगा दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ४.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. ब्रेकशिरे हथवेचे वॉरेन बफेट ४.१ लाख कोटी संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. 
 • रिलायन्य उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांना भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती म्हणून यादीत २७व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. अंबानींशिवाय अजीम प्रेमजी व दिलीप संघवी या भारतीय उद्योजकांनाही टॉप-५० मध्ये स्थान मिळाले आहे.
 • या यादीतील टॉप-५० मध्ये २९ व्यक्ती अमेरिकेच्या आहेत.

या यादीतील टॉप-१० व्यक्ती
क्रमांक नाव संपत्ती (हजार कोटी रु.) कंपनी
बिल गेट्स ५९० मायक्रोसॉफ्ट
अमाचिओ ओर्टेगा ४५० इंडीटेक्स फॅशन ग्रुप
वॉरेन बफेट ४१० ब्रेकशिरे हथवे
जॅफ बेजॉन ३८० अमेजन
डेव्हिड कोच ३२० कोच इंडस्ट्रीज
चार्ल्स कोच ३१० कोच इंडस्ट्रीज
लॅरी एलिसन ३०० ओरेकल कार्पोरेशन
मार्क झुकरबर्ग २९० फेसबुक
मायकल ब्लूमबर्ग २८० ब्लूमबर्ग ग्रुप
१० इनग्वार कम्पर्ड २६० रिटेल कंपनी IKEA
२७ मुकेश अंबानी १६९ रिलाइन्स समूह
४३ अजीम प्रेमजी ११२ विप्रो
४४ दिलीप संघवी १११ सन फार्मा

१९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वकप २०१६

 • स्थान व कालावधी : बांगलादेशमध्ये २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान
 • एकूण संघ : १६ (गट ४) [सुरक्षांच्या कारणांमुळे ऑस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.]
 • एकूण सामने : ४८ (७ मैदानांवर)
 • भारत ‘ड’ गटात असून या गटातील इतर सदस्य : आयर्लंड, नेपाल, न्यूझीलंड
 • भारतीय संघाचा कर्णधार : ईशान किशन
 • भारतीय संघाचा प्रशिक्षक : राहुल द्रविड
 • भारताने यापूर्वी २०००. २००८ व २०१२ अशा तीन वेळा १९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वकप जिंकला आहे.

पाकिस्तानात ४ लाख पॉर्न साइट्स ब्लॉक

 • या पॉर्न साइट्सच्या माध्यमातून अश्लील साहित्याचा फैलाव होत असल्याने त्याचा युवा पीढीवर दुष्परिणाम होत आहे, असा ठपका ठेऊन पाकिस्तानात ४ लाख पॉर्न साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. 
 • पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने अशा साइट्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दूरसंचार प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.
 • डोमेन स्तरावर या साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. दूरसंचार प्राधिकरणाने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.
 • भारतातही अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती मात्र, ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली होती.

एस. मोहम्मद युनूसला शौर्य पदक

 • चेन्नईतील पुरात अडकलेल्या तब्बल २१०० जणांना वाचवणाऱ्या २६ वर्षीय एस. मोहम्मद युनूस या वीराला तामिळनाडू सरकारने ‘अण्णा मेडल फॉर गॅलन्ट्री’ या पुरस्कारानं सन्मानित केले आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झालेल्या कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • १७ नोव्हेंबरला मुसळधार पावसामुळे चेन्नईवर पुराचे संकट कोसळले होते. त्यावेळी युनूसने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सहकाऱ्यांच्या मदतीनं १५०० जणांचे प्राण वाचवले होते. जवळपास ३०० घरांमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली होती. 
 • त्यानंतर २ डिसेंबरलाही चेन्नई पाण्याखाली गेली होती. त्यावेळी ६०० जणांना त्यानं वाचवलं होते. उरापक्कम येथे गरोदर महिला आणि तिच्या पतीचे प्राण वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केलं होते.

स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू डेन्मार्कमध्ये होणार जप्त

 • सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे. यानुसार स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (१३४० युरो, १००० पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.
 • गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये २१,००० स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे.
 • डेन्मार्कच्या संसदेत ८१ विरुद्ध २७ अशा मतांनी यास मंजूरी मिळाली. या कायद्यानुसार साखरपुड्याची अंगठी, चित्रे, सजावटीच्या वस्तू, बक्षीस-पदके स्थलांतरितांना आपल्या जवळ बाळगता येणार आहेत. मात्र घड्याळ, मोबाइल, कॉम्प्यूटर्स जप्त केले जाऊ शकतात.
 • स्वित्झर्लंडने याआधीच स्थलांतरितांकडून पैसे काढून घेतलेले आहेत. ११२ स्थलांतरितांकडून २,१०,००० स्वीस फ्रँक्स त्यांनी गोळा केलेले आहेत तर नेदरलँडसने प्रतीव्यक्ती ५,८९५ युरो व प्रती कुटुंब ११,७९० युरो खर्चापोटी वसूल केलेले आहेत.
 जर्मनीने दिले रोजगार 
 • सीरियन स्थलांतरित गेल्या दोन वर्षात सर्वाधिक संख्येने जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. त्यांना तात्पुरते रोजगार देण्याची सोय जर्मनीने केली आहे.
 • यानुसार मध्यपूर्वेत अडकलेल्या सीरियन तसेच जॉर्डनच्या नागरिकांनाही रोजगार उपलब्ध  होणार आहेत पाच लाख रोजगारांसाठी २०० दशलक्ष युरोंची तरतूद जर्मनी करणार असून प्रतीमहिना ३०० युरो प्रत्येकास मिळतील अशी योजना यामध्ये करण्यात येत आहे.

चालू घडामोडी : २६ जानेवारी


विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा २०१५भारताचा ६७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day Stunt
 • भारताचा ६७वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळाली.
 • यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 • ६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. राजपथावरील संचलन प्रजासत्ताक दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.
 यावर्षीच्या परेडमधील खास बाबी 
 • पहिल्यांदा विदेशी आर्मी
  • १९५०पासून राजपथावर परेड होत आहे. मात्र, ६६ वर्षात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये विदेशी आर्मीने सहभाग घेतला.
  • फ्रांसचे अध्यक्ष ओलांद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फ्रेंच आर्मीच्या ३५व्या इन्फ्रेंट्री रेजीमेंटचे १३० जवानांनी परेडमध्ये सहभाग घेतला.
  • यापूर्वी, फ्रान्सने २००९मध्ये भारताला सन्मानित करत आपल्या परेडमध्ये इंडियन आर्मीच्या मराठा लाइट इन्फ्रेंट्रीला संधी दिली होती.
 • २६ वर्षांनतर श्वानपथकाचा समावेश 
  • २६ वर्षांनतर लष्कराचे श्वानपथक परेडमध्ये सहभागी झाले. या पथकात १२०० श्वान असून त्यापैकी ३६ श्वानांची निवड करण्यात परेडसाठी करण्यात आली होती.
  • यात लेब्राडोर, बेल्जियन शेफर्ड्स, जर्मन शेफर्ड्स जातीच्या श्वानांचा समावेश आहे. 
 • महिला डेअरडेव्हिल्सचे स्टंट
  • यंदा पहिल्यांदा १२० महिला डेयरडेव्हिल्सची तुकडी परेडमध्ये झाली. यात सीआरपीएफ व आरएएफच्या तीन बटालियनची निवड करण्यात आली.
 • पहिल्यांदा निवडणूक आयोगाचा चित्ररथ
  • यावेळी परेडमध्ये एकूण २३ चित्ररथ आहेत. यात १६ राज्यांच्या तर ७ केंद्र सरकारच्या असतील. यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाचा चित्ररथ परेडमध्ये सहभागी झाला.

कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र

 • काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर करण्यात आले. लष्करी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
 • महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले.
 • १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना याआधी सेना पदकाने गौरविण्यात आले आहे.

भारताच्या स्टील उत्पादनात वाढ

 • जगातील अनेक देशांमध्ये स्टीलच्या उत्पादनात घट झाली असताना चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या आघाडीच्या स्टील उत्पादक देशांच्या तुलनेत भारताच्या स्टील उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
 • वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचे २०१४ मधील स्टील उत्पादन ८.७३ कोटी टन होते. हे उत्पादन २०१५ मध्ये वाढले आणि ८.९६ कोटी टन एवढ्यावर जाऊन पोहोचले. 
 • स्टील पायाभूत विकासाकरिता लागणारा एक महत्त्वाचा धातू आहे. ही बाब लक्षात घेऊन स्टीलच्या उत्पादनाकडे बघितल्यास देशाच्या विकासाचा वेग वाढला आहे, असे म्हणता येईल.
 • जगाचा विचार केल्यास २०१५ मध्ये स्टीलचे उत्पादन १६२ कोटी २८ लाख टन एवढेच होते. स्टीलच्या उत्पादनात २००९ नंतर आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मंदी आहे.
 • या मंदीच्या काळातही विकासाचा वेग वाढल्यामुळे भारताच्या स्टीलच्या उत्पादन आणि विक्रीत वाढ दिसत आहे. २००९ मध्ये जगाचे स्टीलचे उत्पादन १२३.८८ कोटी टन एवढ्यावर पोहोचले होते आणि २००८ मध्ये स्टीलच्या उत्पादनाने १३४.३४ कोटी टन एवढी मजल मारली होती.

भारत-फ्रान्स राफेल जेट खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

 • भारत-फ्रान्स यांच्यातील राफेल जेट विमाने खरेदीच्या आंतर सरकारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. असे असले तरी या कराराला अंतिम स्वरूप देता आलेले नाही. यात काही आर्थिक बाबींच्या अडचणी असून त्या दोन दिवसांत दूर केल्या जातील.
 • ओलांद व पंतप्रधान मोदी यांनी एकूण चौदा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशांत ३६ रफाल विमानांच्या खरेदीचा करार झाला असून त्याची घोषणा एप्रिलमध्ये मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यातच करण्यात आली होती.
 • साठ हजार कोटी रुपये किमतीची ही विमाने असून फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ वाटाघाटी करीत आहे. संरक्षण सहकार्याशिवाय दोन नेत्यांनी दहशतवादाच्या मुकाबल्यावर भर दिला आहे.

खालिदा झिया यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला

 • बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्यावर ढाका येथील न्यायालयात देशद्रोहाची फिर्याद दाखल करण्यात आली.
 • १९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धातील हुतात्म्यांबाबत अवमानकारक विधाने केल्याने गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 
 • संक्षिप्त सुनावणीनंतर दंडाधिकाऱ्यांनी झिया यांना ३ मार्च रोजी न्यायालयापुढे हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 
 • २१ डिसेंबर २०१५ला खालिदा झिया यांनी एका कार्यक्रमात बांगलादेश मुक्ती युद्धात नेमके किती लोक हुतात्मे झाले याबाबत शंका व्यक्त केली होती. झिया यांचा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी हा पक्ष मूलतत्त्ववादी जमाते इस्लामीचा मित्र पक्ष असून त्यांचा बांगलादेशच्या स्वातंत्र्यास विरोध होता.

गुजरातमध्ये सापडले डायनोसॉरचे जीवाश्म

 • गुजरातमध्ये जर्मन पुरातत्त्व वैज्ञानिकांसह दोन भारतीयांनी केलेल्या उत्खननात डायनोसॉरचे जीवाश्म सापडले आहेत. 
 • कच्छ जिल्ह्यात कासदुनगर टेकडय़ांच्या परिसरात हे उत्खनन करण्यात आले असून तेथे सापडलेले जीवाश्म १६ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत.
 • गुजरातमध्ये आणखी १५० भूगर्भीय स्थळे शोधण्यात आली आहेत. जेथे आणखी जीवाश्म सापडू शकतात किंबहुना तेथे प्राचीन अवशेषही मिळण्याची शक्यता आहे.

द. आफ्रिकेच्या गुलाम बोदीवर २० वर्षांची बंदी

 • सामनानिश्चितीची कबुली देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गुलाम बोदीवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने २० वर्षांची बंदी घातली आहे.
 • दक्षिण आफ्रिकेतील रॅम स्लॅम स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेदरम्यान लढतींचे निकाल निश्चित केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत बोदी दोषी असल्याचे स्पष्ट झाले.
 • बोदीवरील बंदी तात्काळ लागू झाली असून, त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक लढतीत सहभागी होता येणार नाही. मात्र या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी आयोजित अभ्यास शिबिरात सहभागी होणे बोदीसाठी अनिवार्य असेल.
 • ३७ वर्षीय भारतीय वंशाच्या बोदीने दोन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० लढतीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले असून, २०१२ मध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. गुजरातमधील हथुरान हे बोदीचे जन्मस्थान आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी योगा गुरू बिक्रम चौधरींना दंड

 • भारतीय वंशाचे अमेरिकी गुरू बिक्रम चौधरी यांना न्यायालयाने महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली आहे.
 • चौधरींसाठी काम करताना, लैंगिक भेदभाव, चुकीच्या पद्धतीने काम काढून घेणे आणि लैंगिक छळ या गोष्टींना सामोरे जावे लागल्याचा आरोप मिनाक्षी जफा बोडेन यांनी केला होता.
 • चौधरींवर एका विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोपही केला होता. यासह चौधरींविरोधात असलेल्या अन्य मुलींच्या तक्रारीची चौकशीही मिनाक्षी करत होत्या.
 • १९७१ मध्ये कॅलिफोर्नियाला गेल्यानंतर बिक्रम चौधरींनी योगाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं. त्यांच्या पद्धतीमध्ये १०४ अंश सेल्सियस एवढं तापमान असलेल्या खोलीत ९० मिनिटांमध्ये योगाचे २६ प्रकार करण्यात येतात. या चौधरींविरोधात लैंगिक अत्याचारासी संबंधित आणखी प्रकरणेही सुरू आहेत.

चालू घडामोडी : २५ जानेवारी


मोहननाथ गोस्वामी यांना अशोकचक्र

  Lance-Naik-Mohan-Nath-Goswami
 • काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना हुतात्मा झालेले लष्कराचे कमांडो लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांना शांततेच्या काळात सर्वोच्च मानला जाणारा अशोकचक्र सन्मान जाहीर करण्यात आला.
 • तसेच मोहनसिंह व शिपाई जगदीश चांद (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र सन्मान तर मेजर अनुरागकुमार, नाईक सतीशकुमार (मरणोत्तर), शिपाई धर्माराम यांना (मरणोत्तर) शौर्य पुरस्कार जाहीर झाला.
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांना ३६५ शौर्य आणि अन्य पदके जाहीर करण्यात आली. त्यात १ अशोकचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ शौर्यचक्रे, ४८ सेना पदके, ४ नौसेना पदके, २ वायुसेना पदके, २९ परमविशिष्ट सेवा पदके, ५ उत्तम युद्धसेवा पदके आणि ४९ अतिविशिष्ट सेवापदकांसह अन्य पदकांचा समावेश आहे.
 • उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हापुरदा येथे २ सप्टेंबर २०१५ रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लान्स नाईक गोस्वामी यांच्याबरोबरचे दोन कमांडो जखमी झाले होते.
 • गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी होऊनही लान्स नाईक गोस्वामी यांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. मात्र, गंभीर जखमांमुळे लान्स नाईक गोस्वामी यांनाही प्राण गमवावे लागले.
 • असामान्य शौर्याची लष्कराची परंपरा त्यांनी बलिदानातून सिद्ध केल्याचे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे. दहा दिवसांत दोन मोहिमांत सहभागी झालेल्या लान्स नाईक गोस्वामी यांनी दहा दहशतवाद्यांना ठार करून आपल्या असामान्य शौर्याचा प्रत्यय दिल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

जैतापूरमध्ये दोनऐवजी सहा अणुभट्ट्या

 • जैतापूर येथील भारत-फ्रान्स संयुक्त अणुवीजनिर्मिती प्रकल्पात आता फ्रान्सकडून दोनऐवजी सहा अणुभट्ट्या विकत घेण्यात येणार असून, त्यासंदर्भातील सुधारित समझोता करार करण्यात आला आहे. यापूर्वी भारत दोन अणुभट्ट्या विकत घेणार होता.
 • उभय देशांदरम्यान या प्रकल्पाबाबत चर्चा होऊन २०१६ म्हणजेच या वर्षअखेरीपर्यंत तो पूर्ण करून २०१७मध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरवात करण्याचेही ठरविण्यात आले आहे. 
 • उभय देशांमध्ये चंडीगडमध्ये १६ तर नवी दिल्ली येथे १४ अशा मिळून तीस करारांवर सह्या करण्यात आल्या आहेत.
 • जैतापूरच्या संदर्भात फ्रान्सची ‘इडीएफ’ ही विद्युतनिर्मिती कंपनी आणि भारताच्या अणुवीज महामंडळादरम्यान करार करण्यात येऊन जैतापूर येथे सहा ‘युरोपियन प्रेशराइज्ड रिऍक्टर्स’ (इपीआर) उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
 भारत-फ्रांस चर्चेतील महत्त्वाच्या बाबी 
 • १९९८मध्ये प्रस्थापित करण्यात आलेली सामरिक भागीदारी वाढवणे
 • दहशतवादविरोधी सहकार्य आणि अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा
 • ३६ रफाल लढाऊ विमानांच्या खरेदीचा इंटरगव्हर्नमेंटल अॅग्रीमेंट (आयजीए)
 • जैतापूर प्रकल्प, तसेच आणखी अणुप्रकल्पांवर चर्चा
 • हवामान बदलांसंदर्भात संशोधन करणाऱ्या उपग्रहाच्या प्रक्षेपणात सहकार्य
 • जागतिक सौर युती आणि अपारंपरिक ऊर्जेसंदर्भातील करार
 • स्मार्ट सिटी, रेल्वे ट्रॅक यांसारख्या विषयांवरही चर्चा
 • करचुकवेगिरी रोखण्यासाठी माहितीचे आदानप्रदान मजबूत

सुधारित अनूसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा

 • अनूसुचित जाती (एससी) आणि जमातींवरील (एसटी) अत्याचारांच्या विरोधात किंवा अशा वर्गांतील व्यक्तींच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल असे वर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या सुधारित कायद्याची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) दुरुस्ती कायदा २०१५ हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) कायदा १९८९ चे स्थान घेईल.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यात (ऍट्रॉसिटीज ॲक्ट) दुरुस्ती करण्यात आली असून, यामुळे ‘एससी’, ‘एसटीं’वरील सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराच्या विरोधातही आता कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.
 • अनुसूचित जाती आणि जमातीमधील व्यक्तींचे मुंडन करणे किंवा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोचविल असे वर्तन आता सुधारित कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहे.
 • त्याचबरोबर या वर्गांतील महिलांचे कपडे फाडणे, घर किंवा गाव सोडण्यास भाग पाडणे, अश्लील हावभाव करणे, मत देण्यास किंवा न देण्यासाठी दबाव टाकणे अशा अनेक गोष्टी सुधारित कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहेत.

भारताचे व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र

 • चीन आणि दक्षिण चिनी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता दक्षिण व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र उभारणार आहे. या सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि इमॅजिंग सेंटरद्वारे भारताला छायाचित्रे मिळण्यास मदत होणार आहे.
 • भारत आणि व्हिएतनामचे गेल्या अनेक वर्षांपासून चीनसोबत सीमारेषेवरून वाद सुरू आहेत. दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या कुरापती वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • या सॅटेलाइट स्टेशनच्या मदतीने व्हिएतनामला चीन आणि दक्षिण चीन महासागर परिसरावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. तर भारताला स्वतःचा विस्तार व क्षमता वाढवता येणार आहे.
 • हो ची मिन्ह या शहरात हे केंद्र उभारण्यासाठी ‘इस्रो’ निधी देणार असून, या प्रकल्पाची एकूण किंमत २.३ कोटी डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 • सध्या भारताची उपग्रह केंद्रे अंदमान आणि निकोबार बेटांवर, ब्रुनेई, बिआक आणि मॉरिशसमध्ये आहेत. व्हिएतनाममधील केंद्रामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांना फायदा होणार आहे.
 इतर करार 
 • भारताकडून हनोईला पेट्रोलिंग बोटी खरेदी आणि सुरक्षेसाठी दहा कोटी डॉलर्सचे कर्ज.
 • हनोईकडून भारताला व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात तेल खाणी शोधण्यासाठी परवानगी. 
 • भारतीय उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे व्हिएतनामला पाहता येणार, तसेच याबाबतचे प्रशिक्षणही दिले जाणार.

अरुणाचल प्रदेशात अखेर राष्ट्रपती राजवट

 • अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अखेर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अरुणाचलमधील राजकीय अशांतता पाहता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी या केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले.
 • अरुणाचल प्रदेश विधानसभेतील काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपच्या ११ आणि दोन अपक्ष आमदारांशी हातमिळवणी केल्यामुळे १६ डिसेंबर २०१५ला राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता.
 • त्यावेळी अविश्वास ठरावाच्या लढाईतही मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. विधानसभा भंग न करता जुळवाजुळव करून सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
 • या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे.

'द स्पोर्टस हिरोज'

 • कसोटीपटू आणि मुंबईचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज नीलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'द स्पोर्टस हिरोज' या भारतातल्या प्रख्यात खेळाडूंनी गायलेल्या राष्ट्रगीताच्या व्हिडीओ अल्बमचे उदघाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले. 
 • नीलेश कुलकर्णी, त्याची पत्नी रसिका यांनी खेळाडूंचा सहभाग असलेल्या राष्ट्रगीताची ही संकल्पना प्रत्यक्षात आली. 
 • यामध्ये सचिन तेंडूलकरसह, माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज गगन नारंग, टेनिसपटू महेश भूपती व सानिया मिर्झा, माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि कुस्तीपटू सुशीलकुमार यांचा सहभाग आहे.
 • हा व्हिडीओ अभिजित पानसरे यांनी दिग्दर्शित केला असून संगीत राम संपत यांचे आहे.

भारताने पहिला अंध टी-२० आशिया कप जिंकला

 • भारताच्या अंध क्रिकेट संघाने पाकिस्तानला ४१ धावांनी पराभूत करत टी-२० आशिया कप जिंकला आहे.
 • पहिल्यांदाच आशिया कप खेळलेल्या भारतीय अंध संघाने पाकिस्तानच्या अंध संघाचा पराभव केला आहे.
 • प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत २०९ धावा केल्या. २१० धावांचे आव्हान पेलताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १६९ धावांवर गारद झाला.

 • शेतकऱ्यांसाठी उभे आयुष्य लढा देणारे नेते दिवंगत शरद जोशी यांच्या कुटुंबियांसह सुप्रसिद्ध तमिळ लेखक बी जयमोहन आणि पत्रकार विरेंद्र कपूर यांनी २५ जानेवारी रोजी जाहीर झालेले पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

पद्म पुरस्कार २०१६

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे.
 • यावर्षी ११२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले आहेत. यामध्ये १० पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
 • पुरस्कार विजेत्यांमधे १९ महिलांचा समावेश आहे, तर ४ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातून यंदा १६ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात एक पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि दहा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी
क्र. नाव क्षेत्र राज्य
सुश्री यामिनी कृष्णमूर्ति कला-शास्त्रीय नृत्य दिल्ली
श्री रजनीकांत कला-सिनेमा तामिळनाडू
श्रीमती गिरिजा देवी कला-शास्त्रीय गायन पश्चिम बंगाल
श्री रामोजी राव साहित्य व पत्रकारिता आंध्र प्रदेश
डॉ विश्वनाथन शांता मेडिसिन-ऑनकोलॉजी तामिळनाडू
श्री श्री रविशंकर इतर-अध्यात्म कर्नाटक
श्री जगमोहन समाज सेवा दिल्ली
डॉ वासुदेव कलकुंते आत्रे विज्ञान कर्नाटक
श्री अविनाश दीक्षित (विदेशी) साहित्य व शिक्षण अमेरिका
१० स्वर्गीय श्री धीरूभाई अंबानी (मरणोत्तर) व्यापार व उद्योग महाराष्ट्र

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी
क्र. नाव क्षेत्र राज्य
श्री अनुपम खेर कला-सिनेमा महाराष्ट्र
श्री उदित नारायण झा कला-पार्श्व गायन महाराष्ट्र
श्री राम वी सुतार कला-मूर्तिकला उत्तर प्रदेश
श्री हिसनाम कन्हाईलाल कला-थियेटर मणिपुर
श्री विनोद राय सिविल सेवा केरळ
डॉ यार्लगद्द लक्ष्मी प्रसाद साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश
प्रोफेसर एन एस रामानुज ततआचार्य साहित्य व शिक्षण महाराष्ट्र
डॉ बरजिंदर सिंह हमदर्द साहित्य व पत्रकारिता पंजाब
प्रोफेसर डी नागेश्वर रेड्डी मेडिसिन-गैस्ट्रोइंट्रोलाजी तेलंगणा
१० स्वामी तेजोमायानंद इतर-अध्यात्म महाराष्ट्र
११ श्री हाफिज कंट्रैक्टर इतर-कृषि महाराष्ट्र
१२ श्री रवीन्द्र चंद्र भार्गव समाज सेवा उत्तर प्रदेश
१३ डॉ वेंकट रामाराव अल्ला विज्ञान व इंजीनियरिंग आंध्र प्रदेश
१४ साइना नेहवाल खेल-बैडमिंटन तेलंगणा
१५ सानिया मिर्जा खेल-टेनिस तेलंगणा
१६ इंदु जैन व्यापार व उद्योग दिल्ली
१७ स्वर्गीय स्वामी दयानंद सरस्वती (मरणोत्तर) इतर-अध्यात्म उत्तराखंड
१८ श्री रॉबर्ट ब्लैकविल (विदेशी) समाज सेवा अमेरिका
१९ श्री पलोनजी शपूरजी मिस्त्री (एनआरआय/पीआयओ) व्यापार व उद्योग आयरलँड