चालू घडामोडी : १ मार्च

प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन

  • भाषेचा दर्जा कधीही घसरू न देता नर्मविनोदी भाषेत समाजातील प्रवृत्तींवर बोट ठेवून रसिकांना हसविणारे विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांचे वयाच्या ८७व्या वर्षी अहमदाबादमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.
  • त्यांच्या लेखनावर आधारित 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कौटुंबिक विनोदी मालिका लोकप्रिय ठरली. फार थोड्या वेळातच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने अनेकांची पसंती मिळवली.
  • तारक मेहता यांना २०१५मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले.
  • ‘दुनिया ना उंधा चश्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखनशैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. त्यांची ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली.
  • १९७१पासून चित्रलेखा गुजराती साप्ताहिकातून त्यांचे लोकप्रिय सदर प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
  • तारक मेहता यांनी दैनंदिन जीवनातील बऱ्याच प्रसंगांवर आणि महत्त्वाच्या घटनांवर त्यांच्या लेखणीद्वारे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहत एक नवा पायंडा पाडला होता.
  • तारक मेहता यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जी त्यांच्या कुटुंबियांतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत जितू रायचा सुवर्णवेध

  • भारताचा नेमबाज जितू राय याने दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ५० मी एअर पिस्तुलमध्ये २३०.१ गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • सुवर्णपदक पटकावताना जितूने २३०.१ गुणांसह विश्वविक्रमाचीही नोंद केली. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
  • याच स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंग याने विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच २२६.९ गुणांसह दुसरे स्थान पटकावत रौप्यपदक जिंकले. इराणचा वाहिद गोल्खांदन २०८ गुणांसह कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
  • जितू रायचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले आहे. जितू रायने यापूर्वी १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.
  • विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या मिश्र दुहेरीत देखील जितू रायने महिला नेमबाज हिना सिंधू हिच्यासोबत सुवर्णपदक पटकावले आहे.

स्वदेशी बनावटीच्या इंटरसेप्टरची यशस्वी चाचणी

  • शत्रूने सोडलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता असलेल्या संपूर्णपणे देशी बनावटीच्या स्वनातित (सुपरसोनिक) लक्ष्यभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची भारताने १ मार्च रोजी यशस्वी चाचणी घेतली. 
  • देशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे. भारताने एका महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
  • बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही ही कमी उंचीवरील चाचणी घेण्यात आली. 
  • चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (ITR) प्रक्षेपक केंद्रामधून पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवी लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली.
  • हे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे असून, ते अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज आहे.
  • यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी आंतरखंडीय क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाहून ५० किमी उंचीवर यशस्वीरीत्या नष्ट करण्यात आले होते.

पहिल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी स्वाधीन क्षत्रिय

  • राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी १ मार्च रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ घेतली. या आयुक्तपदाचा कालावधी ५ वर्षांचा असणार आहे.
  • राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम एल टहलियानी यांनी क्षत्रिय यांना शपथ दिली.
  • शपथविधी सोहळ्यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय युवा फुटबॉल संघाचे माटोस प्रशिक्षक

  • अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने पोर्तुगालच्या लुईस नोर्टन डी माटोस यांची भारतीय युवा (१७ वर्षांखालील) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
  • खेळाडूंनी केलेल्या आंदोलनानंतर आधीचे प्रशिक्षक निकोलाय अ‍ॅडम यांनी वादग्रस्त परिस्थितीत राजीनामा दिला होता. त्यामुळे आता प्रशिक्षकपदी माटोस यांची नियुक्ती झाली आहे.

पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या निगार अहमद कालवश

  • पाकिस्तानी महिलांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ‘औरत फाऊंडेशन’च्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका निगार अहमद यांचे २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
  • १९४५मध्ये जन्मलेल्या निगार यांनी अर्थशास्त्र या विषयात पंजाब विद्यापीठातून एमए पूर्ण केले आणि उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले.
  • उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतल्यानंतर त्यांनी १६ वर्षे इस्लामाबादच्या कायदेआझम विद्यापीठात विद्यादानाचे कार्य केले.
  • पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीत त्यांनी विमेन्स अ‍ॅक्शन फोरमच्या माध्यमातून झिया यांच्या महिलांविषयीच्या धोरणांचा विरोध केला.
  • या काळात त्यांना समाजातील विविध समस्या जवळून पाहता आल्या. त्यातूनच मग १९८६ला त्यांनी लाहोर येथे औरत फाउंडेशनची स्थापना केली.
  • महिलांसह एकूण समाजाचा विकास हे या संस्थेचे ध्येय होते. त्यासाठी देशभरात लहान लहान गटांच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम फाऊंडेशनने हाती घेतले.
  • निगार यांनी पाकिस्तानी समाजातील ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी, त्यांची परिस्थिती, त्यांचे आरोग्य प्रश्न समजून घेत त्यांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय बाळगले.
  • राजकारणात महिलांची संख्या वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानच्या संसदेत महिला सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
  • १९९१मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विकास निधीच्याही त्या सल्लागार होत्या.
  • त्यांच्या या कार्याची दाखल घेत २०१०मध्ये त्यांना मोहतरमा फातिमा जीना कारकीर्द गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती बेकायदेशीर

  • मोटार वाहन कायदा व नियमांत कोणताही बदल न करता केवळ एका परिपत्रकाद्वारे रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा महाराष्ट्र सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केला आहे.
  • परवान्यासाठी मराठी भाषा समजणे बंधनकारक करायचे असल्यास सरकारला आधी कायद्यात व नियमांत सुधारणा करावी लागेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • याप्रकरणात राज्य सरकारने कायदेशीर कार्यवाही न करता केवळ परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली आहे. राज्य सरकारने योग्य मार्गाने स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करावे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • आतापर्यंत मराठी सक्तीच्या अटीमुळे अपात्र ठरलेले चालक आता परवान्यासाठी अर्ज करू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
  • उच्च न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करत केवळ कॉल सेंटर पुरेसे नसून तक्रार निवारण केंद्राचीही आवश्यकता असल्याचे नमूद केले.

लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजप नेत्या अटकेत

  • पश्चिम बंगालमध्ये सीआयडीने लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपच्या नेत्या जुही चौधरी यांना भारत-नेपाळ सीमेनजीक बतासिया भागातून अटक केली आहे.
  • यापूर्वी पोलिसांनी याप्रकरणी विमला शिशु गृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांना १८ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
  • पोलीस चौकशीत चंदना चक्रवर्तीने जुही चौधरी यांनी तस्करी प्रकरण मिटवण्यासाठी भाजपचे मोठे नेते कैलास विजयवर्गीय आणि रूपा गांगुलींशी चर्चा केल्याचे सांगितले.
  • सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत विमला शिशु गृहाच्या मुख्य दत्तक अधिकारी सोनाली मोंडल, अध्यक्षा चंदना चक्रवर्ती आणि त्यांचे भाऊ मानस भौमिक यांना अटक केलो आहे.
  • या तिघांवर १ ते १४ वयोगटाच्या १७ मुलांना विदेशात विकल्याचा आरोप आहे. ही सर्व प्रक्रिया त्यांनी कायदेशीरपणे केली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा : विजया रहाटकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा