चालू घडामोडी : १२ मार्च

मनोहर पर्रीकर तिसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी

  • मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे.
  • पर्रीकर १४ मार्च रोजी तिसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी सरंक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शपथ घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत सभागृहात त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
  • भाजप इतर पक्षाच्या व अपक्ष आमदारांशी हातमिळवणी करून सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील होते. त्यावर स्थानिक पक्षांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास तयारी दर्शवली.
  • त्यामुळे पर्रीकर यांनी २१ आमदारांच्या पाठिंब्यासह सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
  • गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी ३, तसेच २ अपक्ष यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.
  • २०१४च्या अखेरीस मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत मनोहर पर्रीकर यांची संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  
  • पर्रीकर यांनी २००० ते २००५ आणि २०१२ ते २०१४ या काळात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

राजस्थानामध्ये अभ्यासक्रमात गीता आणि वेद यांचा समावेश

  • राजस्थान विद्यापीठाने कॉमर्स शाखेतील अभ्यासक्रमातील बँकींग आणि फायनान्स या दोन्ही विषयांऐवजी आता गीता आणि वेद यांचा समावेश केला आहे.
  • त्याशिवाय भगवान कृष्ण, महावीर, महात्मा गांधी, गीताचे प्राथमिकता आणि योगा आदी विषयांचे ज्ञान दिले जाणार आहेत.
  • उच्च शिक्षणाचे भारतीयकरण करणे तसेच भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय महाकाव्य, धार्मिक व्यक्ति आणि भारतीय दर्शन शास्त्र माहित व्हावे हा या निर्णयामागचा हेतू आहे.
  • विद्यार्थ्यांना ही माहिती देऊन जगाला मॅनेजमेंटची नवी ओळख करून देणे ही त्यामागची भूमिका आहे.
  • तसेच अभ्यासक्रमातून पब्लिक अँड बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनलाही हटविण्यात आले आहे. त्याऐवजी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधींचे दर्शन शास्त्र, रामायण व गीतेचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाचे अॅटर्नी प्रीत भरारा बडतर्फ

  • भ्रष्टाचाराविरोधातील खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारे भारतीय वंशाचे अमेरिकेतील अॅटर्नी प्रीत भरारा यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
  • ओबामा यांच्या प्रशासनात नियुक्त झालेल्या सर्व ४६ अॅटर्नींनी राजीनामे द्यावे असे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिली होते. मात्र, भरारा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता.
  • प्रशासनात एकसूत्रता यावी म्हणून ओबामा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या अॅटर्नींना काढून टाकावे अशी सूचना महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी केली होती.
  • २०१३मध्ये देवयानी खोब्रागडे प्रकरणामध्ये निर्माण झालेल्या वादात प्रीत भरारा चर्चेमध्ये आले होते.

पाकिस्तान दिनाच्या संचलनामध्ये चीन व तुर्कस्तानचा सहभाग

  • पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद शहरामध्ये पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या ‘पाकिस्तान दिना’साठीच्या संचलनामध्ये प्रथमच चीन व तुर्कस्तान या देशांचे सैन्यदलही सहभागी होणार आहे.
  • २३ मार्च १९४० रोजी लाहोर येथील अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा स्पष्ट ठराव मांडण्यात आला होता. हा दिवस पाकिस्तान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
  • या दिवशी पाकिस्तानच्या सैन्यदलातर्फे संचलन करण्यात येते. मात्र गेली काही वर्षे सैन्याच्या उठावाच्या भीतीमुळे हे संचलन रद्द करण्यात आले होते. परंतु २०१५पासून पुन्हा एकदा हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा