चालू घडामोडी : ११ एप्रिल

देशातील प्रमुख उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदी महिला

  • मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नुकतीच इंदिरा बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.
  • त्यामुळे देशात पहिल्यांदाच मुंबई, मद्रास, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती पदांवर महिलांची नियुक्ती झाली आहे. या चारही न्यायालयांची स्थापना ब्रिटीशांच्या काळात झाली होती.
  • मद्रास उच्च न्यायालयात एकूण ६ महिला न्यायाधीश तर ५३ पुरूष न्यायाधीश आहेत.
  • तर मुंबई उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी ६१ पुरूष न्यायाधीशांसह ११ महिला न्यायाधीश आहेत.
  • दिल्ली उच्च न्यायालयात सध्या एकूण ९ महिला न्यायाधीश कार्यरत असून येथील पुरूष न्यायाधीशांची संख्या ३५ इतकी आहे.
  • देशातील २४ उच्च न्यायालयांच्या ६३२ न्यायाधीशांमध्ये महिलांची संख्या ६८ इतकी आहे.
  • तर सर्वोच्च न्यायालयाच्या २८ न्यायमूर्तींमध्ये केवळ आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.
  • उच्च न्यायालये व महिला मुख्य न्यायमूर्ती
    • मुंबई: मंजुला चेल्लूर
    • मद्रास: इंदिरा बॅनर्जी
    • कोलकाता: निशिता निर्मल
    • दिल्ली: जी. रोहिणी

पत्रकार दावित इसाक यांना युनेस्कोचा मानाचा पुरस्कार

  • गेली अनेक वर्षे कोणत्याही चौकशीविना कैदेत असलेले लढवय्या पत्रकार दावित इसाक यांना ‘युनेस्को: गुलिर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हा पुरस्कार कोलंबियन पत्रकार गुलिर्मो कॅनो इसाझा यांच्या स्मृत्यर्थ १९९७पासून देण्यात येत आहे. हा पुरस्कार २५००० डॉलर्सचा असून कोलंबियातील कॅनो फाउंडेशन व फिनलंडचे हेलसिंगिन सनोमत फाउंडेशन तर्फे तो देण्यात येतो.
  • इसाक यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९६४ रोजी एरिट्रिया देशात झाला. ते १९८७मध्ये स्वीडनला गेले व तेथील नागरिक बनले.
  • इसाक हे नुसते पत्रकार नाहीत, तर ते नाटककार व लेखकही आहेत. ‘सेतित’ या स्वतंत्र वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला.
  • एरिट्रिया स्वतंत्र झाल्यानंतर ते परत मायदेशी आले. परंतु २००१मध्ये हुकूमशाही एरिट्रियन सरकारने त्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले.
  • त्यांचे नागरिकत्व स्वीडिश व एरिट्रियन असे दुहेरी असल्याने त्यांच्या सुटकेसाठी स्वीडनने शांततामय राजनयाचे प्रयत्न केले.
  • १९ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांना डॉक्टरांची भेट घेण्यासाठी दोन दिवसांसाठी तुरुंगातून सोडण्यात आले, पण नंतर परत त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
  • इसाक असमारा येथील कारशेली तुरुंगात असावेत असे सांगितले जाते. त्यांचा ठावठिकाणा कुणाला माहीत नाही. अनेकदा त्यांच्या मृत्यूची बातमीही पसरवण्यात आली आहे.
  • दर आठवडय़ाला रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, द नॅशनल प्रेस क्लब व स्वीडनचा दूतावास इसाक यांच्या सुटकेची मागणी करतात.
  • २,०९,९००हून अधिक स्वाक्षऱ्यांची मोहीमदेखील यासाठी राबविण्यात आली. २७ मार्च २००९रोजी स्वीडनच्या ५ वृत्तपत्रांनी त्यांच्या सुटकेची मागणी पहिल्या पानावर केली.
  • तुरुंगात असतानाच, त्यांना २००९ मध्ये ‘पेन’ लेखक-संघटनेच्या स्वीडन शाखेने कर्ट-तुकोलस्की स्मृती-पुरस्कार दिला. २०१०मध्ये नॉर्वे या देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

फ्लिपकार्टकडून इबे इंडियाचे अधिग्रहण

  • देशातील सर्वात जुनी व पहिली इ-कॉमर्स कंपनी इबे इंडियाची मायक्रोसॉफ्ट, टेनसेंटसह फ्लिपकार्टने १.४ अब्ज डॉलरना खरेदी करण्याचे ठरविले आहे.
  • भारताच्या इ कॉमर्स क्षेत्रातील इबे इंडिया ही देशातील मोठी कंपनी आहे. मात्र फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडिलच्या स्पर्धेत ती गेल्या काही वर्षांमध्ये मागे पडली आहे.
  • कंपनीने  ईबेसोबत विशेष धोरणात्मक करार केला आहे. याअंतर्गत ईबे फ्लिपकार्टमधील इक्विटी हिस्सेदारीसाठी रोख पैसे मोजणार आहे.
  • तसेच ईबे आपल्या भारतीय व्यवसायाची फ्लिपकार्टला विक्री करणार आहे. या व्यवहारानंतरदेखील ईबे.इनचे कामकाज स्वतंत्रपणे सुरु राहणार आहे.
  • २०१६मध्ये फ्लिपकार्टमध्ये रूजू झालेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्त्वाखाली हा व्यवहार यशस्वी झाला आहे.
  • ईबेसोबत भागीदारीमुळे फ्लिपकार्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्ताराची संधी उपलब्ध होणार आहे.
  • याशिवाय, कंपनीच्या ग्राहकांना ईबेच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांची वैविध्य उपलब्ध होईल आणि ईबेच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवरील विक्रेत्यांची विशेष भारतीय उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.
  • फ्लिपकार्टने यापूर्वी तयार वस्त्र प्रावरणा क्षेत्रातील इ कॉमर्स कंपन्या ‘मिंत्रा’ व ‘जबाँग’ची खरेदी केली आहे. तसेच पेमेंट अ‍ॅप ‘फोनपे’ही फ्लिपकार्टच्या ताब्यात आहे.
  • फ्लिपकार्टचे संस्थापक: सचिन बन्सल आणि बिनी बन्सल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा