चालू घडामोडी : १५ एप्रिल

भिम अ‍ॅप शिकवा व पैसे कमवा योजना

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भिम अ‍ॅप शिकवा व पैसे कमवा’ ही योजना जाहीर केली.
  • १४ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
  • यावेळी कोराडी येथील तीन नव्या वीजनिर्मिती युनिटचे लोकार्पण, भिम आधार अ‍ॅपच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले.
  • यावेळी मोदी यांनी ‘डिजिटल इकॉनॉमी’चे जोरदार समर्थन करताना, डिजिधन योजनेअंतर्गत लकी ग्राहकांना पुरस्कारही प्रदान केले.
  • यावेळी शुभारंभ व भूमिपूजन झालेल्या इतर योजना 
    • कोराडी वीज प्रकल्पातील तीन नव्या युनिटचे राष्ट्रार्पण
    • ट्रिपल आयटी नागपूरचे भूमिपूजन
    • आयआयएम नागपूरचे भूमिपूजन
    • एम्स नागपूरच्या भवनाचे भूमिपूजन
    • प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन
    • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन
    • भिम आधार अ‍ॅपचा शुभारंभ
    • डिजिधन योजनेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण
 ‘भिम अ‍ॅप शिकवा व पैसे कमवा’ योजना 
  • या योजनेंतर्गत भिम अ‍ॅपमध्ये ‘रेफरल’ असा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • तो वापरून तुम्ही जर एखाद्याला भिम अ‍ॅप शिकवले व त्याने त्याचा वापर करीत तीन व्यवहार केले, तर त्या प्रत्येक व्यक्तीमागे तुमच्या खात्यात दहा रुपये जमा होतील.
  • एका दिवसात तुम्ही २० लोकांना या अ‍ॅपशी जोडले तर तुम्हाला २०० रुपये मिळतील. १४ एप्रिल ते १४ ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू राहील.
  • याशिवाय एखाद्या व्यापाऱ्याने दुकानात भिम अ‍ॅपवरून व्यवहार केले तर त्यालाही ठराविक व्यवहारांनंतर २५ रुपये मिळतील.

पंकज अडवाणीला आशियाई बिलियर्डस स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताचा सोळावेळा विश्वविजेता ठरलेला बिलियर्डसपटू पंकज अडवाणीने सातव्यांदा आशियाई बिलियर्डस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने भारताच्याच सौरव कोठारीवर ६-३ अशी मात केली.
  • अंतिम लढतीच्या पहिल्या सत्रामध्ये कोठारीने ३-१ अशी आघाडी घेतली होती. परंतु पंकज अडवाणीने पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • अडवाणी आता २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई स्नूकर स्पर्धेत सहभागी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा