चालू घडामोडी : १ एप्रिल

मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयकाला मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन कायदा २०१६च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. लवकरच हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर जाणार आहे.
  • भारतातील मोटार वाहन प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्यास हे विधेयक उपयुक्त ठरणार आहे.
  • या विधेयकात अपघात मोबदल्यात वाढ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडात केलेली वाढ असे काही महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.
  • रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी भारतात होणाऱ्या ५ लाख अपघातात दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत.
 नवीन मोटार वाहन कायद्यातील सुधारणा 
  • वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढविणे, वाहनांची नोंदणी यांसारखी महत्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार.
  • वाहतुकीचे नियम मोडल्यास आकारल्या जाणाऱ्या कमीतकमी दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ती १०० रुपये होती.
  • दुचाकीवर बसलेल्या चार वर्षांवरील लहान मुलांसाठी हेल्मेट सक्ती.
  • दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, सिग्नल मोडणे यासाठी १ हजार रुपयांचा दंड तसेच ३ महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द.
  • हिट अँड रन केसमध्ये मिळणारा अपघात मोबदला २५ हजारांवरून २ लाख रुपये करण्यात आला आहे.
  • हिट अँड रन प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाख रुपयांची रक्कम देण्याची तरतूद.
  • अल्पवयीन मुलांनी जर मोटार वाहन कायदे मोडले तर त्यांच्या पालकांना याबाबत दोषी ठरविण्यात येणार आहे.
  • अशा पालकांना ३ वर्षे तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्यात येईल.
  • वाहन चालविताना वाहनाचा विमा उतरविण्यात आला नसल्यास २ हजार दंड अथवा ३ महिन्यांची कैद अशा शिक्षेची तरतूद.
  • विनापरवाना गाडी चालविताना आढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार. पूर्वी ही रक्कम ५०० रुपये होती.
  • दारु पिऊन वाहन चालविताना आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड.
  • मद्यधूंद वाहनचालकामुळे बळी केल्यास त्याच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच त्याला १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  • वाहन परवाना तसेच वाहन नोंदणीला ‘आधार’शी जोडणार.
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना सापडल्यास ५ हजार रुपयांचा दंड.
  • पोलिसांना गाडीची आणि चालकाची कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार.
  • मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास २० हजार रुपये दंड.
  • मर्यादेबाहेर प्रवासी घेतल्यास प्रतिप्रवासी १ हजार रुपये दंड.

हरियाणा सरकारची आपकी बेटी, हमारी बेटी योजना

  • जर एखाद्या परिवारामध्ये तिसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास संबंधित कुटुंबाला २१ हजार रुपयांची मदत हरियाणा सरकारकडून देण्यात येणार आहे.
  • ‘आपकी बेटी, हमारी बेटी’ या योजनेअंतर्गत सर्व धर्म, जात आणि उत्पन्न गटातील लोकांना ही मदत करण्यात येणार आहे.
  • हे अनुदान २४ ऑगस्ट २०१५नंतर जन्मलेल्या मुलींसाठी देण्यात येणार आहे. जर कुटुंबामध्ये अगोदरच दोन मुले असतील आणि जरी तिसरी मुलगी जन्माला आली तरी हे अनुदान देण्यात येणार आहे.
  • राज्यातील लिंग गुणोत्तरात वाढ करणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • यापूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांमध्ये पहिली मुलगी जन्माला आल्यास हे अनुदान देण्यात येत असे.
  • हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर

विख्यात नाटककार पद्मश्री अरुण शर्मा यांचे निधन

  • आसामी भाषेतील विख्यात नाटककार आणि कादंबरीकार पद्मश्री अरुण शर्मा यांचे २९ मार्च रोजी निधन झाले.
  • दिब्रुगढ येथे १९३५मध्ये जन्मलेल्या अरुण यांचे वडील तिलकचंद्र शर्मा हे ‘द टाइम्स ऑफ आसाम’ या वृत्तपत्राचे संपादक होते.
  • अरुण यांचे शालेय शिक्षण तेजपूरमध्ये झाले. नंतर ते गुवाहाटी येथील कॉटन महाविद्यालयातून बीए झाले.  त्यानंतर त्यांनी वर्षभर ‘आसाम ट्रिब्यून’ येथे पत्रकारिता केली.
  • यानंतर त्यांनी ‘जिंती’, ‘परशराम’, ‘पुरुष’, ‘कुकुरेनिचा मुह’ ही काही नाटके लिहिली. ‘श्री निबारन भट्टाचार्य’ हे त्यांचे नाटक आसामी रंगभूमीवर लोकप्रिय ठरले.
  • बाल दिनानिमित्त त्यांनी लिहिलेले ‘द सेल्फिश प्रिन्स’ हे बालनाटय़ तर बीबीसी नभोवाणीवरूनही प्रसारित झाले होते.
  • ‘बुरुंजीपथ’ या पुस्तकाद्वारे आणीबाणीच्या काळ्याकुट्ट पर्वाचा त्यांनी उपरोधिक शैलीत समाचार घेतला.
  • नाटय़क्षेत्रात त्यांचे नाव गाजू लागल्यावर त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरीची संधी मिळाली. या काळात त्यांनी ४०हून अधिक नभोनाटय़े लिहिली.
  • त्यांच्या ‘आसिरबादर रंग’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. आसामच्या तत्कालीन ग्रामीण जीवनाचे चित्र त्यांनी या कादंबरीत मांडले.
  • आसामी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तसेच पद्मश्री किताबही मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा