इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स (ईव्हीएम)

  • उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स (ईव्हीएम)मधील घोटाळ्याचा विषय ऐरणीवर आला आहे.
  • भाजपने मतदान यंत्रात फेरफार करून, काहीतरी तांत्रिक गडबड करून निवडणूक जिंकल्याचा आरोप मायावती, अरविंद केजरीवाल या विरोधकांनी केला आहे.
  • हाच मुद्दा महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालांनंतरही चर्चिला गेला होता. परंतु, हे सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.
  • या पार्श्वभूमीवर, ईव्हीएम मशीनबाबत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाची माहिती आम्ही देत आहोत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा

  • पूर्वी पारंपारिक मतदान पध्दतीत वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका आणि मतपेट्यांच्या जागी आलेले एक साधे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे ईव्हीएम  (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स) होय.
ईव्हीएमची निर्मिती
  • केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडूनच या यंत्राची निर्मिती केली जाते आणि त्यांच्याकडून हे यंत्र भारतीय निवडणूक आयोग घेते.
ईव्हीएमचे फायदे
  • अवैध आणि शंकास्पद मते टाळता येतात. बऱ्याच प्रकरणात अशी मते वाद आणि निवडणूक याचिकांना कारणीभूत ठरतात.
  • मतमोजणी प्रक्रिया अधिक जलद होते.
  • कागदांचा वापर मोठया प्रमावर कमी झाल्यामुळे वृक्ष संवर्धन होत आहे त्यामुळे ही प्रक्रिया पर्यावरण अनुकूल होत आहे.
  • छपाईचा खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
भारतात ईव्हीएमचा प्रवास
  • १९८२मध्ये केरळमधील परुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रांवर प्रथमच ईव्हीएम वापरण्यात आले.
  • त्यानंतर १९९८मध्ये १६ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ईव्हीएम वापरण्यात आले.
  • १९९९च्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये ईव्हीएम वापरले गेले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला.
  • आतापर्यंत १०७ विधानसभांच्या निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’चा वापर करण्यात आला आहे.
भारतीय ईव्हीएमची वैशिष्टये
  • हे एक साधे आणि सरळ यंत्र असून निवडणूक कर्मचारी आणि मतदार अगदी सहज ते वापरू शकतात. तसेच हे यंत्र हाताळण्यासाठी सोपे असते आणि कुठल्याही वातावरणात ते वापरता येऊ शकते.
  • कुठल्याही नेटवर्कशी जोडणी नसणारे हे एकमेव यंत्र आहे, त्यामुळे याच्या कार्यान्वयनात तसेच निकालातही कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.
  • देशातील बऱ्याच ठिकाणच्या अनियमित वीजपुरवठयामुळे या यंत्रात बॅटरीवर चालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • ईव्हीएम सुरू करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने प्रा. एस संपथ, प्रा. पीव्ही इंदिरेसर आणि डॉ. सी राव कसारबडा यांच्या तांत्रिक समितीचा सल्ला घेतला होता.
  • या समितीने या यंत्राच्या सर्व तांत्रिक बाजू सूक्ष्मपणे तपासल्या आणि एकमताने निवडणुकीत हे यंत्र वापरण्याची शिफारस केली.
  • याशिवाय ईव्हीएमला मान्यता देण्यापूर्वी निवडणूक आयोगाने सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर याबाबत चर्चा केली होती. तसेच त्यांना याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले होते.
  • ईव्हीएममध्ये कमाल ३८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर सामान्यपणे १४००हून कमी मतदारांची संख्या असते.
  • तसेच ईव्हीएममध्ये कमाल ६४ उमेदवारांची यादी समाविष्ट करता येते. उमेदवारांची संख्या ६४हून अधिक असल्यास मतपत्रिकांच्या पारंपारिक पध्दतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.
ईव्हीएममध्ये अनाधिकृत बदल अशक्य
  • ईव्हीएममध्ये कुठलेही अनधिकृत बदल करता येणार नाही अशी व्यवस्था बनवण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते.
  • ईव्हीएममध्ये वापरण्यात आलेल्या मायक्रो प्रोसेसर चिपच्या प्रोगामिंगचे रुपांतर चिपमध्ये केले जाते. यात बदल करता येत नाही अथवा त्याची नक्कलही करता येत नाही.
  • मतदान सुरू होण्याआधी ईव्हीएमची चाचणी होते. मशीनशी काही छेडछाड केली असल्यास ते त्याचवेळी उघड होऊ शकते आणि ते मशीन बाद केले जाते.
  • मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक अधिकारी सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या पोलिंग एजंटना ईव्हीएमची चाचणी करायला सांगतात. 
  • यानंतर सर्व पोलिंग एजंट निवडणूक अधिकाऱ्याला मशीनमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे प्रमाणपत्र देतात. त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरू होते.
  • खबरदारीचा अतिरिक्त उपाय म्हणून ही यंत्रे उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सीलबंद केली जातात आणि केंद्रीय पोलिस दलाच्या निगराणीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात.
  • निवडणूकीपूर्वी आणि निवडणूकीनंतर ही यंत्रे ठेवण्याच्या जागी प्रवेश करण्यासाठी कडक प्रक्रियेतून जावे लागते.
  • निवडणूक आयोगाने या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी ही पध्दती तयार केली आहे.
  • याव्यतिरिक्त अधिक खबरदारीचा उपाय ईव्हीएमसाठी दोन पातळयांवरील सुसुत्रीकरण पध्दत निवडणूकीत वापरण्यात येत आहे.
  • ठराविक मतदान केंद्रात कुठले ईव्हीएम वापरले जाणार आहे याची माहिती अगोदरच कुणाला कळू नये यासाठी ही पध्दत वापरण्यात आली आहे.
भारतातील ईव्हीएम जगातील सर्वोत्तम दर्जाचे
  • काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका संस्थेच्या पाहणीत भारतातील ईव्हीएम हे जगातील सर्वोत्तम दर्जाचे मतदान यंत्र असल्याचे समोर आले आहे.
  • भारतात सध्या वापरात असलेल्या ईव्हीएम मशिन्स या दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशनच्या आहेत. या मशिन्समध्ये सांकेतिक स्वरूपात माहिती साठविण्याचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे.
  • जगातील काही मोजकेच देश ईव्हीएम मशिन्सचा वापर करतात. तर जगातील काही देश मतदानासाठी रिमोट इंटनरनेट व्होटिंग प्रणालाची वापर करतात.
  • मात्र, रिमोट इंटरनेट व्होटिंग प्रणालीत मतदान यंत्रातील माहिती हॅक होण्याचा किंवा त्यामध्ये बदल होण्याचा मोठा धोका आहे.
  • मात्र, भारतातील ईव्हीएम मशिन्स इंटरनेटला जोडलेली नसल्यामुळे या मशिन्स हॅक होण्याचा कोणताही धोका नाही. परिणामी ही मतदान प्रणाली जगातील एक आदर्श प्रणाली मानली जाते.
ईव्हीएम वापरणारे देश
  • भारत, ब्राझील, नॉर्वे, जर्मनी, व्हेनेझुएला, कॅनडा, बेल्जियम, रुमानिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, आयर्लंड, युरोपीय राष्ट्रे आणि फ्रान्स.
  • २०१३मध्ये नामिबियाने भारताकडून १७०० ईव्हीएम खरेदी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा