चालू घडामोडी : ९ जून

एआयएफएफकडून फुटबॉलपटूंचा गौरव

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) भारतीय फुटबॉलपटूंचा पहिल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कार केला. 
  • यावेळी एझॉल एफसीला आय-लीगचे ऐतिहासिक जेतेपद पटकावून देणाऱ्या मुंबईच्या खलिद जमील यांना २०१६-१७ या वर्षांतील सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • तर आघाडीचा खेळाडू व मोहन बगान संघाचा फॉरवर्ड जेजे लालपेखलुआ याला २०१६ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • मिझोरामच्या या खेळाडूने ४८ सामन्यांत भारताने प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर १८ गोल्स आहेत.
  • महिलांमध्ये हा मान सस्मिता मलिकने पटकावला. ओरिसाच्या या खेळाडूच्या नावावर ३५ सामन्यांत ३२ गोल्स आहेत.
  • २०१० ते २०१६ या कालावधीत झालेल्या चारही सॅफ महिला अजिंक्यपद विजेत्या भारतीय संघात तिचा सहभाग होता.
  • गेल्या वर्षी ९३ सामन्यांत ५३ गोल करणाऱ्या सुनील छेत्रीला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 पुरस्कार विजेते 
  • सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (पुरुष): जेरी लालरीझुंआला (डीएसके शिवाजीयन्स)
  • गोलरक्षक : देबाजित मझुमदर (मोहन बगान)
  • जर्नेल सिंग सर्वोत्तम बचावपटू : अनास एडाथोडिका (मोहन बगान)
  • मध्यरक्षक : अल्फ्रेड केमाह जरयान (एझॉल एफसी)
  • सर्वाधिक गोल : अ‍ॅसेर पिएरीक डिपांडा डिका (शिलाँग लाजाँग एफसी)
  • सय्यद अब्दुल रहिम पुरस्कार (सर्वोत्तम प्रशिक्षक) : खलीद जमील (एझॉल एफसी)
  • आय-लीगमधील नायक : सुनील छेत्री (बेंगळूरु एफसी)
  • उदयोन्मुख खेळाडू (महिला) : संजू
  • उदयोन्मुख खेळाडू (पुरुष) : रोवलिन बोर्गेस
  • सर्वोत्तम खेळाडू (महिला) : सस्मिता मलिक
  • सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) : जेजे लाल्पेखलुआ

टाटा मोटर्सच्या सीईओ पदावर सतीश बोरवणकर

  • टाटा मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर सतीश बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • रवींद्र पिशारोदी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी अधिकारीपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागी बोरवणकर यांची नियुक्ती झाली.
  • येत्या महिन्यातच निवृत्त होणारे कंपनीचे विद्यमान कार्यकारी संचालक बोरवणकर यांना टाटा समूहाने दोन वर्षांची मुदतवाढही दिली आहे.
  • मार्च २०१७ अखेर नोंदविलेल्या १४८ कोटी रुपयांच्या तोटय़ातून कंपनीला बाहेर काढण्याची जबाबदारीच बोरवणकर यांच्यावर असेल.
  • बोरवणकरांच्या रूपात टाटा मोटर्सला पुन्हा एकदा बिगर पारशी नेतृत्व लाभले आहे.
  • कानपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे यांत्रिकी अभियांत्रिकी पदवीधर बोरवणकर यांच्या टाटा मोटर्समधील कारकीर्दीला १९७४ मध्ये सुरूवात झाली.
  • टाटा मोटर्सच्या संचालक मंडळात ते जून २०१२मध्ये गुणवत्ता विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झाले.
  • टाटा मोटर्समधील अनेक हरित प्रकल्पांची उभारणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

एससीओ परिषदेसाठी मोदी कझाकस्तानमध्ये

  • भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबयेव यांच्यात अस्थाना येथे चर्चा झाली.
  • शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे कझाकस्तानची राजधानी अस्थाना येथे आगमन झाले आहे. या परिषदेमध्ये पाकिस्तानही सहभागी झाला आहे. 
  • शांधाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन दहशतवादाशी लढ्यासाठी भारताशी सहकार्य करेल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा