चालू घडामोडी : २० जून

अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अॅम्बेसिडर

  • जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रचार व प्रसारासाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.
  • जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची निवड करण्यात आली होती.
  • येत्या १ जुलैपासून देशभरात जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल.
  • त्याआधी लोकांपर्यंत जीएसटीबद्दल माहिती, त्याचे फायदे पोहचविण्यासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.
  • यासाठी ‘जीएसटी - एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असे कॅप्शन असलेलेला व्हिडिओ ट्विटरवर प्रसिध्द करण्यात आला आहे.

भारत संयुक्त राष्ट्राच्या टीआयआर कन्वेंशनमध्ये सहभागी

  • व्यापार विस्तार करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या टीआयआर कन्वेंशनमध्ये सहभागी झाला आहे. या कन्वेंशनमध्ये सहभागी होणारा भारत ७१वा देश आहे.
  • या करारामुळे भारताला व्यापारी विस्तार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारताला स्वत:ला व्यापाराचे केंद्र म्हणून विकसित करता येईल.
  • भारताचे अनेक कनेक्टिविटी प्रकल्प विविध देशांच्या वाहतूक आणि कस्टम व्यवस्थेशी अनुरुप नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. 
  • पण टीआयआर लागू झाल्यानंतर भारताला या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे पैसा आणि वेळेची बचत होईल.
  • टीआयआरमध्ये सहभागी झाल्याने भारताला विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर कर न भरता व्यापारी मालाची ने-आण करता येईल.
  • भारताचा टीआयआरमध्ये सहभाग हा दक्षिण आशियातील परिवहन, व्यापार आणि विकासाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
  • टीआयआरमुळे भारताला म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ बरोबर व्यापाराची जटिल प्रक्रिया अधिक सोपी होईल.  
  • भारताला यामुळे यूरेशियापर्यंत व्यापार करता येईल. टीआयआरमध्ये भारताच्या सहभागी होण्याचे व्यापारावर दूरगामी परिणाम होतील.
  • चीनच्या महत्वकांक्षी 'वन बेल्ट वन रोड' धोरणाला भारताने एकप्रकारे उत्तर दिले आहे. टीआयआर हे चीनच्या ओबीओआर धोरणाला पर्याय आहे.

एफ-१६ लढाऊ विमानांचे भारतात उत्पादन होणार

  • जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.
  • यासाठी ‘एफ-१६’ विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये ‘पॅरिस एअर शो’मध्ये अधिकृत करार झाला आहे.
  • या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीचा ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन करणारा टेक्सास (अमेरिका) येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे.
  • भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.
  • वायूदलाच्या ताफ्यातील सोव्हिएतकालीन विमाने सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर असून, भारताला नवीन लढाऊ विमान खरेदी करण्याची गरज भासत आहे.
  • परंतु मोदी सरकारने लष्करी साहित्याची परदेशातून तयार स्वरूपात खरेदी न करता त्यांचे उत्पादन भारतात करण्याची अट उत्पादकांना घातली.
  • देशाची गरज भागावी व त्याचसोबत नवे तंत्रज्ञान देशात येऊन स्थानिक उद्योगांचा बळकटी मिळावी हा यामागचा उद्देश होता.
  • ‘मेक-इन-इंडिया’ योजनेत विदेशी उत्पादकाने भारतात उत्पादन करताना एखाद्या भारतीय कंपनीस भागीदार म्हणून सोबत घेणे अपेक्षित आहे.
  • यानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीचे स्वत:चे हित जपत टाटा कंपनीला सोबत घेऊन आता हा करार केला आहे.
  • जगभरातील हवाई दलांमध्ये ‘एफ-१६’ ही पसंतीची लढाऊ विमाने असून, सध्या २६ देशांच्या हवाई दलांमध्ये अशी ३,२०० विमाने वापरात आहेत.
  • भारतीय हवाई दलाला अशाच प्रकारे देशात उत्पादित केलेली ‘ग्रिप्पेन’ लढाऊ विमाने पुरविण्याची तयारी स्वीडनच्या ‘साब’ कंपनीनेही दर्शविली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी अद्याप कोणी भारतीय भागीदार निवडलेला नाही. 

रामनाथ कोविंद यांचा बिहार राज्यपालपदाचा राजीनामा

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.
  • कोविंद २३ जून रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
  • कोविंद यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

अ‍ॅनाबेल मेहता यांना ब्रिटनचा ‘एमबीई’ सन्मान

  • गेली ४० वर्षे समाजसेवा केलेल्या अ‍ॅनाबेल मेहता यांना ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ म्हणजे ‘एमबीई’ हा सन्मान जाहीर झाला आहे.
  • त्या ब्रिटिश नागरिक आहेत. लंडन येथे या वर्षी त्यांना बकिंगहॅम पॅलेस येथे हा सन्मान प्रदान केला जाईल.
  • मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील गरीब, गरजू लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अ‍ॅनाबेल यांची सचिन तेंडुलकरच्या सासू अशीही एक ओळख आहे. 
  • अ‍ॅनाबेल यांनी मुंबईत ‘अपनालय’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजातील लोकांसाठी मोठे काम केले आहे.
  • अ‍ॅनाबेल यांनी  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी ‘समाज प्रशासन’ या विषयात पदवी घेतली आहे.
  • ब्रिटनमध्येही त्या ब्रायटन येथे मुलांसाठी बालगृह चालवत होत्या. साऊथ लंडन कौन्सिलमध्येही त्यांनी काम केले.
  • मुंबईत त्यांच्या कामाची सुरुवात झोपडपट्टीतील गरीब मुलांच्या शिक्षण व आरोग्य तपासणीसाठी एका केंद्राच्या स्थापनेतून झाली.
  • देवनार कचरा डेपोच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीत त्यांनी अपनालयाच्या माध्यमातून २५ वर्षे काम केले.
  • ‘गिव्ह इंडिया’ या ऑनलाइन डोनेशन संस्थेच्या मंडळावरही अ‍ॅनाबेल मेहता यांनी मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील वंचितांसाठी दिलेले योगदान अजोड आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा