चालू घडामोडी : ७ जुलै

दहशतवादाविरोधात मोदींची दशसूत्री

  • जर्मनीतील जी-२० परिषदेत दहशतवाद रोखण्यासाठी सर्व देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दशसूत्री मांडली आहे.
  • जगातले काही देश दहशतवाद्यांना राजकीय हेतू साधण्यासाठी आश्रय देत आहेत, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीकाही केली आहे.
 मोदींची दशसूत्री 
  • दहशतवाद ही जगापुढची मोठी समस्या आहे, दहशतवादाला पाठिंबा देण्याऱ्या देशाच्या अधिकाऱ्यांवर जी-२० परिषदेत बंदी घालणे.
  • संशयित दहशतवाद्यांच्या यादीचे जी-२०च्या देशांमध्ये देवाणघेवाण होणे आवश्यक आणि जे दहशतवादी जाहीर झाले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी ठोस योजना करणे.
  • दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सगळ्या देशांचा आपसांत सहभाग, प्रत्यार्पण प्रक्रिया जलद आणि सोपी करणे.
  • आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावरची व्यापक परिषद त्वरित आयोजित करणे.
  • युनायडेड नेशनचे सुरक्षेबाबतचे उपाय आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रक्रियांची तातडीने अंमलबजावणी करणे.
  • धार्मिक तेढ वाढवणाऱ्यांविरोधात जी-२० च्या देशांमध्ये उपायांची आणि विचारांची देवाणघेवाण, सर्वात चांगल्या उपयांवर अंमलबजावणी करणे.
  • एफटीएफ अर्थात फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स आणि इतर प्रक्रियांद्वारे दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत रोखणे, आर्थिक मदतीचे पर्यायही गोठवणे.
  • एफटीएफ प्रमाणेच शस्त्रांच्या आणि स्फोटकांच्या तस्करीवर आणि खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासाठई वेपन अँड एक्स्प्लोझिव्ह अॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करणे.
  • जी-२० देशांकडून सायबर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना योजण्यावर भर देणे.
  • जी-२० देशांमध्ये एक दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी आणि उपाय योजण्यासाठी सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करणे.
  • जर्मनीतल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सहभागी झालेल्या सगळ्या देशांना केले आहे.

आयटीबीपीच्या प्रमुखपदी आर के पचनंदा

  • इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) प्रमुखपदाची धुरा आर के पचनंदा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
  • चीनलगतच्या लडाखमधील काराकोरम खिंड ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप दरीपर्यंतच्या ३४८८ किलोमीटर लांबीच्या सीमारेषेची जबाबदारी आयटीबीपीवर आहे.
  • सिक्किमलगतच्या भागात रस्ते बांधण्यावरून चीन आणि भारत परस्परांसमोर उभे ठाकल्याने १९६२नंतर प्रथमच दोन्ही देशांमधील वाद चिघळला आहे.
  • पचनंदा हे भारतीय पोलीस सेवेतील पश्चिम बंगाल केडरचे १९८३च्या तुकडीतील अधिकारी आहेत. दिल्लीच्या स्टिफन्स महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे.
  • आयटीबीपीची नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) प्रमुख म्हणून काम पाहत होते.
  • कोलकाताचे पोलीस आयुक्त, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदी महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
  • सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) विशेष महानिरीक्षक, महानिरीक्षक (प्रशिक्षण), पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागाचे महासंचालक, कारवाई विभागाचे उपमहानिरीक्षक आदी पदांवरील कामकाजाचा त्यांच्याकडे अनुभव आहे.
  • दहशतवादाविरोधातील लढाईत जागतिक पातळीवर होणाऱ्या मंथनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • ‘इंटरपोल’तर्फे आयोजित परिसंवादात ‘जागतिक दहशतवाद’, इस्रायलमध्ये आयोजित ‘आत्मघातकी दहशतवाद’ या विषयावरील मंथनातही ते सहभागी झाले आहेत.
  • विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, भारतीय पोलीस पदक आदींनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था, सीबीआयमधील विशेष कामगिरीबद्दलही त्यांचा गौरव झाला आहे.
  •  ‘टेररिझम अ‍ॅण्ड रिस्पॉन्स टू टेररिस्ट थ्रेट’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. 
  • अशा प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर पचनंदा हे आयटीबीपीचे नेतृत्व करताना परिस्थिती कौशल्यपूर्वक हाताळतील हे निश्चित आहे.

ग्राहकांच्या दायित्वासंबंधी आरबीआयची मार्गदर्शक तत्वे जारी

  • कार्ड्स किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने शून्य दायित्व (Zero Liability) आणि मर्यादित दायित्व (Limited Liability) या संकल्पनेची सुरूवात केली आहे.
  • या संकल्पनेचा फायदा ग्राहकांना मिळणार असून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे.
  • इंटरनेट बँकींग करणाऱ्या ग्राहकाचे खाते आणि कार्डमधून अनधिकृतरित्या होणाऱ्या व्यवहारांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत.
  • त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या दायित्वासंबंधीची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ती खालीलप्रमाणे:-
  • ऑनलाइन पद्धतीने तसेच दुकानात समोरासमोर करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा यात समावेश असेल.
  • फसवणुकीच्या प्रकरणात बँकही सामिल असल्यास किंवा ग्राहकांच्या तक्रारीकडे बँकेकडून दुर्लक्ष झाल्यास ग्राहकाचे शून्य दायित्व असेल.
  • बँकेच्या सहभागाशिवाय तिसऱ्याच व्यक्तीकडून फसवणूक झाल्यानंतर कामकाजाच्या ३ दिवसांच्या आत बँकेकडे तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकाचे दायित्व संपेल.
  • पण जर नुकसान ग्राहकांच्याच निष्काळजीपणामुळे झाले असेल, उदा. ग्राहकाने आपला पासवर्ड शेअर केला असेल तर फसव्या व्यवहारांची माहिती बँकेला कळवेपर्यंत ग्राहकांनाच त्याचा तोटा सहन करावा लागेल. बँकेकडे अशा बेकायदेशीर व्यवहाराची नोंद केल्यानंतर मग ग्राहकाची जबाबदारी संपेल.
  • नुकसान जर तिसऱ्या व्यक्तीकडून झाले असेल आणि या फसवणुकीबद्दलची तक्रार ग्राहकाने ४ ते ७ दिवसांच्या आत बँकेकडे न केल्यास झालेल्या आर्थिक व्यवहारासाठी मात्र स्वतः ग्राहकच जबाबदार असेल.
  • वरील ज्या दोन व्यवहारांसाठी ग्राहकांची जबाबदारी असणार आहे, त्याबाबतीत ग्राहकाचे जास्तीत जास्त उत्तरदायित्व बँकेतील बचत खात्यासाठी ५००० रुपये इतके असेल. तर इतर खात्यासाठी ते १० हजार रुपये इतके असेल.
  • ५ लाख रुपयांपेक्षा जास्त मर्यादेचे क्रेडिट कार्ड तसेच करंट, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट अकाऊंटमधील २५ लाख रुपयांपर्यंतच्या बचतीच्या खात्यांसाठी जास्तीत जास्त दायित्व २५,००० रुपये असेल.

फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ ९६व्या स्थानी

  • भारतीय फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत ९६व्या स्थानावर झेप घेतली असून, गेल्या दोन दशकांमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • आशियाई देशांपैकी अग्रेसर इराणचा संघ फिफा क्रमवारीत २३व्या स्थानावर आहे. आशियाई देशांमध्ये भारत फिफा क्रमवारीत १२वा आहे.
  • भारतीय संघाने मागच्या १५ पैकी १३ सामन्यांत विजय नोंदविले असून, गेल्या आठ सामन्यांत तर संघ एकदाही पराभूत झालेला नाही.
  • भारताने फेब्रुवारी १९९६मध्ये उत्तुंग भरारी घेताना सर्वोत्तम ९४वे स्थान प्राप्त केले होते. त्यानंतर नोव्हेंबर १९९३ मध्ये ९९वे स्थान मिळवले होते.
  • फेब्रुवारी २०१५मध्ये स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली, तेव्हा भारत १७१व्या स्थानावर होता.
  • चिलीला नमवून नुकतेच कॉन्फेडरेशन चषक विजेतेपद जिंकणाऱ्या विश्वविजेत्या जर्मनीने ब्राझील मागे टाकत फिफा क्रमवारीतील प्रथम स्थान पटकावले आहे.
  • ब्राझीलनंतर अर्जेटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

ड्यूएल एमआरपीवर बंदी

  • दुहेरी कमाल किरकोळ किंमत (ड्यूएल एमआरपी) पद्धतीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे.
  • या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर विक्रेत्यांना मॉल्स, एअरपोर्ट आणि हॉटेल्स आदी ठिकाणी जास्त किमतीला वस्तू विकता येणार नाहीत.
  • ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, दुहेरी एमआरपीवरील बंदी १ जानेवारी २०१८ पासून अमलात येईल.
  • या बंदीनंतर कंपन्यांना पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स अथवा स्नॅक्स यासाठी कोणत्याही ठिकाणी जास्त किंमत आकारता येणार नाही.
  • १ जानेवारीनंतर दुहेरी एमआरपीचा प्रकार आढळून आल्यास नागरिक तक्रार नोंदवू शकतात. त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा