चालू घडामोडी : ११ व १२ ऑगस्ट

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी

  • केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याशिवाय सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने सीबीएफसीचे वादग्रस्त माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे.
  • पहलाज निहलानी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांसाठी कायम चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.
  • उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा तसेच बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या.
  • या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. यामुळे अनेक दिग्दर्शकांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.
 पहलाज निहलानी 
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बंधू आहेत.
  • वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट त्यांनी वितरक म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली.
  • त्यांनतर ९०च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.
  • पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
  • पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली.
 प्रसून जोशी 
  • निहलानींच्या जागी नियुक्ती झालेले प्रसून जोशी नामवंत गीतकार आणि पटकथा लेखक आहेत.
  • तारें जमीन पर, भाग मिल्खा भाग, नीरजा, रंग दे बसंती या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे.
  • ‘तारें जमीन पर’मधील ‘मॉं’ आणि ‘चितगाव’मधील ‘बोलो ना’ या गाण्यासाठी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

  • व्यंकय्या नायडू यांनी ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. व्यंकय्या नायडू हे देशाचे १३ वे उपराष्ट्रपती आहेत. तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते देशाचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत.
  • राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली.
  • उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता.

गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ६३ बालमृत्यू

  • उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने गेल्या ५ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर के मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे.
  • बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
  • या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स कंपनीची ६९ लाख रुपयांची थकबाकी न दिल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता. 
  • या कंपनीने १ ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्ट रोजी या हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, त्या दिवशीही ९ रुग्ण मरण पावले होते.
  • या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत देवेंद्र सिंह अंतिम फेरीत

  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात देवेंद्र सिंहने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
  • त्याने पहिल्या प्रयत्नात ८२.२२ मीटर, दुसऱ्यांदा ८२.१४ मीटर तर तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात सर्वाधिक ८४.२२ मीटर भाला फेकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा