चालू घडामोडी : १४ ऑगस्ट

सौरऊर्जेशी संबंधित जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी शांतिपद चौधरी

  • भारतीय विद्युत अभियंता शांतिपद गोन चौधरी यांची ‘द इंटरनॅशनल सोलर इनोव्हेशन्स कौन्सिल’ या जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ही संस्था नवीनच असून तिचे मुख्यालय फिनलंडमधील हेलसिंकी येथे आहे. जगातील गरीब देशांचे ऊर्जा प्रश्न अभिनव उत्तरांच्या माध्यमातून सोडवण्याचा हेतू या संस्थेने ठेवला आहे.
  • सौर ऊर्जातज्ज्ञ असलेले चौधरी हे पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातून विद्युत अभियंता बनले आहेत.
  • त्यांनी गेली २७ वर्षे पुनर्नवीकरणीय (अक्षय) ऊर्जा क्षेत्रात काम केले आहे. तसेच अनेक शैक्षणिक व व्यावसायिक सरकारी संस्थात त्यांनी ऊर्जा तज्ज्ञ म्हणून काम केले आहे.
  • भारतात ‘बिजली- क्लीअर एनर्जी फॉर ऑल’ या प्रकल्पाच्या सल्लागार मंडळावरही त्यांनी काम केले.
  • याशिवाय त्रिपुरा सरकारच्या ऊर्जा धोरण विभागात त्यांनी काम केले असून पश्चिम बंगाल हरित ऊर्जा विकास महामंडळाचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. पश्चिम बंगाल सरकारचे ते विशेष ऊर्जा सचिवही होते. 
  • बंगाल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे संलग्न प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनातही भूमिका निभावली आहे.
  • देशातील पहिली सौर मीटर वीज दरप्रणाली तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
  • डॉ. चौधरी यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले असून सौरऊर्जा निर्मितीची अनेक प्रारूपे त्यांनी तयार केली आहेत.
  • आशिया व आफ्रिकेत सौरऊर्जेवर लक्ष केंद्रित करून तेथील ऊर्जा समस्या सोडवण्यावर त्यांचा भर आहे.
  • ऊर्जा क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा शाश्वत ऊर्जेसाठीचा ब्रिटनमधील अ‍ॅशडेन पुरस्कार त्यांना २००३मध्ये मिळाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा