चालू घडामोडी : १ सप्टेंबर

सायप्रसच्या उच्चायुक्तपदी आर के राघवन

  • मोदी सरकारने माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक केली आहे.
  • उच्चायुक्तपदी सहसा आयएफएस (भारतीय विदेश सेवा) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रथा असताना मोदी सरकारकडून या राजकीय नियुक्तीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • ७६ वर्षीय राघवन हे जानेवारी १९९९ ते एप्रिल २००१ या कालावधीत सीबीआयच्या संचालकपदी होते.
  • वर्ष २००२मध्ये त्यांच्याकडे गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. तपासानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीनचिट दिली होती.
  • २००८मध्ये राघवन यांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रोधा दंगलीचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती.
  • गुजरात दंगलीपूर्वी राघवन यांना २००६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.
  • राघवन यांनीच भारतातील पहिला सायबर सेल स्थापन केला होता. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भ्रष्टाचारप्रकरणाची यांनीच चौकशी केली होती.
  • २०००मध्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरणही राघवन यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे क्रिकेटचे करिअर संपुष्टात आले होते.

श्रीलंकेच्या नौदल प्रमुखपदी ट्रॅव्हिस सिनिया

  • श्रीलंका देशाच्या नौदल प्रमुखपदाची धुरा चार दशकांनंतर प्रथमच तामिळी वंशांच्या रिअर अ‍ॅडमिरल ट्रॅव्हिस सिनिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
  • श्रीलंकेत तामीळ वंशाच्या नागरिकांना शिक्षण व रोजगारात स्थान मिळत नसल्याचे सांगत तामिळी बंडखोरांनी १९७०मध्ये शस्त्र हाती घेऊन पुकारलेल्या युद्धाचा मे २००९ मध्ये शेवट झाला.
  • या काळात तामिळी वंशाच्या व्यक्तीला कधी सैन्य दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती.
  • सिनिया यांच्या सर्वोच्च पदावरील नियुक्तीने, आजवर देशासाठी प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
  • तामिळी बंडखोरांविरोधातील लढाईत सिनिया यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. या मोहिमेचे काही काळ त्यांनी नेतृत्व केले.
  • श्रीलंकन नौदलात सागरी युद्ध कार्यवाहीचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठतम अधिकारी ही सिनिया यांची ओळख.
  • नौदल प्रकल्प, योजना व संशोधन विभागाचे संचालक, नौदल (प्रशासन) विभागात उपसंचालक, संशोधन व विकास विभागात वरिष्ठ अधिकारी आदी पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत प्रथम स्थानी

  • फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबाबत १८ महिने सर्वेक्षण करण्यात आले होते.
  • या यादीत फोर्ब्सने आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • त्यामुळे आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला पहिले स्थान देण्यात आले आहे. तर व्हिएतनामचा दुसरा क्रमांक लागतो.
  • भ्रष्टाचाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे तर पाकिस्तानचा चौथा क्रमांक लागतो.
  • भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण सुमारे ६९ टक्के असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदी जे वाय पिल्ले

  • भारतीय वंशाचे ज्येष्ठ सनदी अधिकारी जे वाय पिल्ले यांची सिंगापूरचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • टोनी टॅन केंग याम यांनी राष्ट्रपतीपदाची ६ वर्षे पूर्ण केल्यानंतर जे वाय पिल्ले यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली आहेत.
  • पिल्ले हे कौन्सील ऑफ प्रेसिडेंशियल अॅडवायजर्सचे अध्यक्ष असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते या पदावर राहतील.
  • यापूर्वी राष्ट्राध्यक्ष परदेश दौऱ्यावर असताना, पिल्ले यांनी सुमारे ६०वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
  • जे वाय पिल्ले यांचे संपुर्ण नाव जोसेफ युवराज पिल्ले असे आहे. त्यांचा जन्म १९३४साली क्लांग येथे (सध्या मलेशिया) येथे झाला.
  • इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सायन्स अॅंड टेक्नॉलजी, लंडन विद्यापिठ येथे त्यांनी शिक्षण घेतले. पिल्ले हे सर्वोत्तम ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात.
  • सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कुआन यू हे त्यांना ‘इक्वल टू द बेस्ट ब्रेन्स इन अमेरिका’ असे संबोधत असत.
  • पिल्ले यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि राष्ट्रीय विकास या मंत्रालयांमध्ये पर्मनंट सेक्रेटरी म्हणून कामकाज पाहिले होते.
  • ते सिंगापूर एक्स्चेंज, डीबीएस बॅंकेचे अध्यक्षही होते. तसेच जीआयसी आणि मॉनेटरी अथॉरिटी आफ सिंगापूरचे ते व्यवस्थापकीय संचालकही होते.
  • पिल्ले हे सिंगापूर एअरलाइन्सचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. १९७२साली केवळ १२ विमानांसह सुरु झालेली ही विमानसेवा जगातील उत्कृष्ठ विमानसेवांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
  • पिल्ले यांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या अध्यक्षपदाचा कार्यभार १९९६पर्यंत सांभाळला.

कॅमडेनचे माजी महापौर सदाशिवराव देशमुख यांचे निधन

  • इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे माजी महापौर सदाशिवराव देशमुख यांचे२५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
  • साताऱ्यातील भूमीपुत्र असलेले देशमुख इंग्लंडमध्ये महापौर पद भूषवणारे ते पहिले मराठी व्यक्ती होते.
  • २० ऑक्टोबर १९३४ रोजी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील निमसोड गावामध्ये सदाशिवराव यांचा जन्म झाला होता.
  • १९६२साली त्यांनी लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये त्यांनी एलएलएम, एमफील, पीएचडी प्राप्त केली.
  • त्यानंतर समाजसेवेचा वसा घेतलेल्या देशमुखांनी लंडनमध्ये कार्याला सुरूवात केली. १९९४ ते १९९५ या काळात त्यांनी कॅमडेनचे उपमहापौरपद भूषवले होते.
  • त्यानंतर १९९५ ते १९९६ यादरम्यान देशमुख यांनी या शहराचे महापौर म्हणून कार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा