चालू घडामोडी : ३१ मे

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

  • महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
  • फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते.
  • पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले.
  • आणीबाणीच्या काळात त्यांनी ३ महिने तुरुंगवासही भोगला. यानंतर मिसाबंदी म्हणूनही ९ महिने ते तुरुंगात होते.
  • १९७७मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
  • फुंडकर यांनी ३ वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे तर १९७८ व १९८०मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
  • फुंडकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे.
  • ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट कृषीमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
  • १९८३ मध्ये कापूस प्रश्नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
  • त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले.
  • अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. मुंडे आणि फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती.
  • २००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना २००६-०७ या वर्षाचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

  • समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेला राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल अखेर ३० मे रोजी जाहीर झाला.
  • या परीक्षेत जळगाव येथील रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम आला आहे. मुलींमध्ये पुणे येथील रोहिणी नऱ्हे, तर राखीव गटातून सोलापूर येथील अजयकुमार नष्टे हे उमेदवार प्रथम आले आहेत.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उपजिल्हाधिकारी पदाच्या १४ जागांसह एकूण ३७७ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
  • यात पूर्वपरीक्षेसाठी १,९८,५९९ उमेदवार बसले होते. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे टप्पे पार करून १,१९४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
  • विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.
  • हा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.

भारत इंडोनेशिया दरम्यान १५ करार

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांचा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांचा दौरा ३० मेपासून सुरु झाला आहे.
  • इंडोनेशियामध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची मार्डेका पॅलेस येथे भेट घेतली.
  • त्यानंतर ३१ मे रोजी मोदींनी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे जाऊन मलेशियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महाथिर मोहंमद यांचे अभिनंदन केले.
  • यावेळी दोन्ही देशांदरम्यान १५ करारांवर सह्या करण्यात आल्या. तसेच मोदींनी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या विनामूल्य व्हिसाची घोषणाही केली.
  • इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रण त्यांनी दिले आहे.
  • इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे.

वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी

  • एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.
  • आंततराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने संजिता उत्तेजक चाचणी दोषी आढलली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे संजिता चानूला सुवर्णपदक गमवावे लागण्याची शक्यता आहे.
  • उत्तेजकांच्या यादीत असलेले द्रव्य संजिताच्या शरीरात आढळले असून तिच्यावर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.
  • संजिताने ५३ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव करत एकूण १९२ किलो वजन उचलत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
  • २०१४मध्ये वर्षांपुर्वी ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते.
  • कुंजाराणी देवी यांच्यापासून प्रेरणा घेत संजिताने वेटलिफ्टिंगमध्ये रस घेण्यास सुरुवात केली होती.

झिनेदिन झिदान रियल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

  • रियल माद्रिद क्लबला सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून देणारे त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
  • राफाएल बेनिटेझ यांच्यानंतर झिदान यांनी रीयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने ९ जेतेपदे पटकावली.
  • आतापर्यंत झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रीयाल माद्रिद १४९ सामने खेळला. त्यापैकी माद्रिदने १०४ सामन्यांत विजय मिळवला, तर २९ सामन्यांमध्ये बरोबरी साधली.

चालू घडामोडी : ३० मे

मूडीजकडून भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट

  • भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे.
  • यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी मूडीजकडून वर्तवण्यात आला होता.
  • मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजने वर्तवला आहे.
  • खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
  • अर्थात २०१९मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.
  • समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील.
  • येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटीचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात या पतनिर्धारण संस्थेने नमूद केले आहे.
  • जगभरातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करताना पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंगला महत्त्व देतात. त्यामुळे मूडीजसारख्या संस्थांच्या अहवालाकडे जगाचे लक्ष असते.
  • जर या संस्थांनी एखाद्या देशाचा पतदर्जा कमी केला तर त्या देशामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ मंदावण्याची भीती असते.

भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

    Vikas Gowda
  • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ३५व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१४मध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
  • विकासनेगेल्यावर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
  • म्हैसूरमध्ये जन्मलेला विकास ६ वर्षांचा असताना कुटुंबासमवेत अमेरिकेतील मेरीलँडमध्ये स्थायिक झाला. त्याचे वडील माजी खेळाडू आणि १९८८च्या ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक होते.
  • २०१२ मध्ये विकासने नोंदविलेला ६६.२८ मीटर थाळीफेकीचा राष्ट्रीय विक्रम अद्याप अबाधित आहे.
  • त्याने २०१३ आणि २०१५च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
  • तसेच त्याने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य व २०१४च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
  • २०१०च्या आशियाडमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१४च्या आशियाडमध्ये विकास रौप्याचा मानकरी ठरला.
  • २००४, २००८, २०१२ व २०१६ अशा ४ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा विकास २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये थाळीफेकीत अंतिम फेरीत पोहोचला होता.

प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते मुक्ता श्रीनिवासन यांचे निधन

  • ‘मुक्ता फिल्म्स’ कंपनीचे संस्थापक तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते व्यंकटचारी श्रीनिवासन उर्फ मुक्ता श्रीनिवासन यांचे ३० मे रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
  • १९५७साली श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला पहिला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता.
  • ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे मुक्ता श्रीनिवासन निर्माते होते.
  • १९५७पासून पुढली ६० वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी १९८४पासून चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासही सुरुवात केली.
  • त्याआधी त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते. ९०हून अधिक कथासंग्रह आणि सुमारे २५० पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.
  • जयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री-अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले. श्रीनिवासन यांच्यामुळे अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली.
  • उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५नंतरचा काळ आणि त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले होते.

पॅसिफिक कमांडचे इंडो-पॅसिफिक कमांड असे नामांतर

  • अमेरिकेच्या लष्कराने पॅसिफिक कमांडचे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड असे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
  • भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • पॅसिफिक कमांड हा विभाग पॅसिफिक महासागराच्या प्रदेशातील सर्व हालचालीं आणि कारवायांची जबाबदारी पाहातो. या प्रदेशात भारताचाही समावेश होतो.
  • सुमारे ३ लाख ७५ हजार नागरिक आणि सैनिकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आलेली आहे.
  • या नामांतरामुळे या प्रदेशासाठी काही विशेष फायदा होणार नसला तरी भारताचे या प्रदेशातील वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे.
  • या कमांडची जबाबदारी अॅडमिरल हॅरी हॅरिस यांच्याकडून फिलिप डेव्हीडसन यांनी स्वीकारली. तर हॅरी हॅरीस यांची दक्षिण कोरियात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

रघुराम राजन यांना विश्व हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण

  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या ‘विश्व हिंदू काँग्रेस’मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
  • रघुराम राजन यांना विश्व हिंदू काँग्रेसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
  • स्वामी विवेकानंदांनी शिकागोमधील विश्व धर्म संसदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमात आर्थिक, शैक्षणिक, माध्यम आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश असणार आहे.
  • विश्व हिंदू काँग्रेसची सुरुवात २०१४मध्ये दिल्लीतून झाली होती. या कार्यक्रमात ५० देशांमधून हिंदू धर्माच्या सुमारे १८०० लोकांनी सहभाग नोंदवला होता.
  • २०१६मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या राजन यांनी यापूर्वी संघाच्या धोरणांवर टीका केली होती. सध्या ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.
  • या कार्यक्रमासाठी राजन यांच्यासह आलावा विद्यापीठाच्या प्राध्यापिका कॅथरिन डुसेक, स्पाइसजेटचे प्रमुख अजय सिंह, पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल आणि केपीएमजी इंडियाचे प्रमुख अरुण कुमार यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

मासिक : मार्च २०१८

चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा.
मासिक आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २९ मे

सुधा बालकृष्णन आरबीआयच्या पहिल्या सीएफओ

  • ‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तत्कालिन डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेत सप्टेंबर २०१६मध्ये मध्यवर्ती गव्हर्नर झाल्यानंतर मुख्य वित्तीय अधिकारी पदनिर्मिती हा मोठा फेरबदल आहे.
  • आक्टोबर २०१७मध्ये बँकेत हे पद भरण्याबाबतचे सुतोवाच प्रथम करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय कामगिरीचे नेतृत्व या पदाकडे असेल.
  • सुधा बालकृष्ण या ‘एनएसडीएल’ या देशातील पहिल्या मोठय़ा डिपॉझिटरी सेवा कंपनीच्या पहिल्या ज्येष्ठ महिला अधिकारी राहिल्या आहेत.
  • रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळातील सुधा या आता १२व्या संचालक असतील. पुढील ३ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.

मिझोराम राज्यपालपदी कुम्मानम राजशेखरन

  • मिझोरामचे राज्यपाल म्हणून केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी २९ मे रोजी शपथ घेतली. मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ २८ मे रोजी संपला.
  • गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजीत सिंह यांनी राजशेखरन यांना पदाची शपथ दिली.
  • यावेळी मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानहावला यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
  • २०१४मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी १९७०मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. २०१५मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नासिरुल मुल्क पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

  • पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नासिरुल मुल्क यांचे नाव देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूक नियोजित आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाल ३१ मे रोजी संपत आहे.
  • त्यामुळे नासिरुल मुल्क हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत साधारण अडीच महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार चालवतील.
  • संसद विसर्जित झाल्यापासून नवीन सरकार येईपर्यंत देशाचा कारभार योग्य रीतीने चालविणे हे काळजीवाहू पंतप्रधानाचे काम असते.
  • त्यांच्याकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.
  • काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव निश्चित करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेले काही आठवडे मतभेद सुरू होते.
  • सुमारे सहा बैठका झाल्यानंतर मुल्क यांच्या नावावर एकमत झाले. मुल्क हे २०१४मध्ये पाकिस्तानचे २२वे सरन्यायाधीश होते.
  • पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान : शाहिद खकान अब्बासी

पतंजली टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे वृत्त खोटे

  • बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी बीएसएनएलसोबत हातमिळवणी करत आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे प्रसिध्द झालेले वृत्त खोटे असल्याची माहिती समोर आली आहे.
  • पतंजलीने बीएसएनएलसोबत फक्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करार केला असून, पतंजली कोणतेही सिमकार्ड लाँच करत नाहीये. पतंजली फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना ‘स्वदेशी समृद्धी सिमकार्ड’ देणार आहे.
  • बीएसएनएल पंतजलीच्या कर्मचाऱ्यांना १४४ रुपयांचा प्लान देणार आहे. ज्यात अनलिमिटेड कॉल, एसटीडी, रोमिंग तसंच दिवसाला २जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत.
  • पतंजलीचे सिमकार्ड हे कंपनीच्या स्वदेशी मोहिमेचा भाग आहे, ज्यामध्ये भारतीय सेवा आणि सुविधांना प्राधान्य दिले जाते.
  • पतंजलीने बीएसएनएलसोबत हातमिळवणी केल्याने त्यांच्या स्वदेशी मोहिमेला हातभार लागणार आहे.

चालू घडामोडी : २८ मे

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे तिसरे विजेतेपद

  • शेन वॉटसनने ८ षटकार आणि ११ चौकारांसह केलेल्या ११७ धावांच्या जबरदस्त नाबाद खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या तिसऱ्या विजेतेपदावर मोहोर उमटविली.
  • स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे गेली दोन वर्षे आयपीएल बंदीमुळे बाहेर असलेल्या या संघाने पुनरागमन करताच थेट विजेतेपदच पटकाविले.
  • सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या १७८ धावांना चेन्नईने चोख प्रत्युत्तर देत ८ विकेटस आणि ९ चेंडू राखून विजयाची नोंद केली.
  • चेन्नईचे हे तिसरे विजेतेपद ठरले. या कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ विजेतीपदे पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली.
  • आतापर्यंतच्या आयपीएल फायनलमध्ये शतकी खेळी करणारा वॉटसन हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ५७ चेंडूंत नाबाद ११७ धावा केल्या. २००८मध्ये पार पडलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये शेन वॉटसन मालिकावीर ठरला होता.
  • अंतिम सामन्यात हैदराबादला नमवत चेन्नईने एकाच स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला चारवेळा नमवण्याचा विक्रम केला.
 स्पर्धेतील पुरस्कार विजेते 
  • अंतिम सामन्याचा सामनावीर : शेन वॉटसन (चेन्नई सुपरकिंग्स)
  • ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : केन विलीयमसन (सनरायझर्स हैद्राबाद)
  • पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) : अँड्र्यु टाय (किंग्ज इलेव्हन पंजाब)
  • उदयोन्मुख खेळाडू : रिषभ पंत (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
  • स्टायलिश खेळाडू : रिषभ पंत (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
  • सुपर स्ट्राईकर : सुनील नारायन (कोलकत्ता नाईटरायडर्स)
  • व्हॅल्युएबल खेळाडू : सुनील नारायन (कोलकत्ता नाईटरायडर्स)
  • परफेक्ट कॅच : ट्रेंट बोल्ट (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
  • फेअर प्ले पुरस्कार : मुंबई इंडियन्स संघ

ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी उत्तम पाचारणे

  • ललित कलांच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी देशातील आघाडीचे शिल्पकार उत्तम पाचारणे यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे.
  • पाचारणे यांची प्रतिष्ठित कलासंस्थेवर निवड झाल्याने राजधानीतील कला दरबारात महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. ते पुढील ३ वर्षे या पदावर कार्यरत असतील.
  • पाचरणे एक प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी कला क्षेत्राच्या विविध पदांवर काम केले आहे.
  • ते सर जे जे स्कूल ऑफ आर्टस मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून पदवीधारक आहेत. त्यांनी अंदमानातील स्वातंत्र्यज्योतीची साकारलेली प्रतिकृती प्रसिद्ध आहे.
  • त्यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान ८ पुतळे महाराष्ट्रात आहेत तर लखनौ विद्यापीठात १३ फुटी शिवपुतळा आहे.
  • याशिवाय शाहू महाराजांचा पुतळा, सावरकरांचा पुतळा, मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ अशी अनेक शिल्पे त्यांनी साकारली आहेत.
  • सध्या, ते गोवा कला अकादमीचे सदस्य आणि पु.ल देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीचे ते माजी अध्यक्ष आहेत.
  • त्यांना राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पतंजलीच्या स्वदेशी समृद्धी सिमकार्डचे अनावरण

  • बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत.
  • यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)शी करार केला आहे.
  • हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात असून, या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे.
  • आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे.
  • त्यानंतर हे कार्ड देशभरात असणाऱ्या बीएसएनएलच्या ५ लाख काऊंटर्सवर सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
 पतंजली सिम कार्डचे फायदे 
  • हे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर १० टक्के सूट मिळणार.
  • १४४ रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. याशिवाय १०० मेसेज मोफत मिळणार.
  • हे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना २.५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, ५ लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार आहे.

जनक्षोभानंतर वेदांता ग्रुपचा स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद

  • वेदांता ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर तामिळनाडू सरकारने हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तुतिकोरिन येथील या प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.
  • त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
  • तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
  • तुतिकोरिन येथे वेदांता स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. यासाठी काम देखील सुरु झाले होते.
  • गेल्या १०० दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत होते. या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.
  • तसेच भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचेही स्थानिकांनी म्हटले होते.

भारतीय विमानकंपन्या जगात किफायतशीर

  • किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे.
  • ‘ग्लोबल फ्लाइट प्रायसिंग रिपोर्ट’च्या मते या यादीत एअर इंडिया एक्स्प्रेस दुसऱ्या तर, इंडिगो पाचव्या स्थानी आहे.
  • याशिवाय या यादीमध्ये जेट एअरवेज (१२व्या) आणि एअर इंडिया (१३व्या) या दोन भारतीय कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • हा अहवाल मेलबर्न येथील ‘रोम टू रियो’ या वेबसाइटने तयार केला आहे. यात प्रति किलोमीटर प्रवासाला येणाऱ्या खर्चाच्या आधारे जगभरातील २०० मोठ्या प्रवासी विमानकंपन्यांची तुलना करण्यात आली आहे.
  • एअर एशिया एक्स्प्रेस या विमानकंपनीने यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. या कंपनीचा प्रति किलोमीटरसाठी सरासरी प्रवासी खर्च ०.०८ डॉलर आहे.
  • या अहवालानुसार जगभरातील सर्वात स्वस्त पाच प्रवासी विमान कंपन्यांमध्ये चार कंपन्या आशिया खंडातील आहेत.
  • टॉप ५ कंपन्यांमध्ये इंडोनेशिया एअर एशिया आणि प्रायमेरा एअरलाइन्स या अन्य दोन कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • या यादीतील टॉप १० मध्ये एकाही ब्रिटिश आणि अमेरिकन कंपनीचा समावेश झालेला नाही.

चालू घडामोडी : २६ व २७ मे

आयुष्मान भारत योजनेसाठी दरनिश्चितीपत्रक जाहीर

  • अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत’ या योजनेत किमान १३५० उपचार सुविधांसाठी रु. १५०० ते रु. १.५० लाखांपर्यंतचे दरनिश्चितीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • ओबामा हेल्थकेअरशी तुलना होत असलेली केंद्र सरकारची आयुषमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना यात ५ लाख ते १० कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे.
  • राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना आणि केंद्रीय आरोग्य योजना (सीजीएचएस) याअंतर्गत उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन मगच आयुषमान भारतअंतर्गत दर ठरवले गेले आहेत.
  • त्यामुळे पारंपरिक केंद्रीय आरोग्य योजनेपेक्षा या मोहीमेतील उपचार १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त होतील.
  • यात उपचारांचे दर ठरवण्यात आल्याने, विमा आहे म्हणून रुग्णांची लूटमार होण्याची शक्यता कमी होणार आहे.
  • हृदयरोग, कर्करोग, मेंदूशस्त्रक्रिया, नवजात अर्भक उपचार यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे. उपचार व शस्त्रक्रिया यांचे स्वरूप यावरून दर ठरवण्यात आले आहेत.
  • या निविदा पत्रिकेत उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून त्याच्या आधारे राज्ये विमा योजनेत सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची यादी निश्चित करू शकतील.
  • रुग्णालयांची या योजनेतील पॅनल नोंदणी १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी विमा कंपन्यांकरिता राज्यांनी निविदा व लिलाव प्रक्रिया करायची आहे.
  • दोन आठवडय़ात ही प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टमध्ये योजना प्रत्यक्ष सुरू केली जाणार आहे.
  • देशातील खासगी रुग्णालयांतून आयुषमान भारत योजना राबवण्यात यावी, यासाठी त्या रुग्णालयांना प्रोत्साहन देण्याचाही केंद्र सरकारचा बेत आहे.
 ‘आयुष्मान भारत’ योजनेबद्दल 
  • या योजनेंतर्गत मिळणारे लाभ
  • प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांची आरोग्य सुरक्षा.
  • १० कोटी गरीब, मागास कुटुंबांना याचा फायदा मिळणार.
  • अस्थिविकार निवारण, ह्रदयविकार निवारण, कर्करोग निवारण, न्युरोसर्जरी यासारख्या २० खर्चिक उपचारांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
  • योजनेचे लाभार्थी
  • ग्रामीण भाग : कच्च्या भिंती व छप्पर असलेल्या घरांतील मागास कुटुंबे, कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कोणीही मोठी व्यक्ती नसलेली कुटुंबे, अनुसूचित जाती-जमातींतील गरीब कुटुंबे, रोजंदारीतून कमाई करणारी भूमिहीन कुटुंबे, भटकी कुटुंबे, आदिवासी.
  • शहरी भाग : कचरा गोळा करणारी कुटुंबे, भिकारी कुटुंबे, घरकाम करणारे, चर्मकार, फेरीवाले, बांधकामावरील मजूर, प्लम्बर, रंगारी, सुरक्षारक्षक.
  • प्रस्तावित दर
  • खुब्याचा (उखळीचा) सांधा व गुढघेबदल शस्त्रक्रिया : ९ हजार रुपये.
  • धमन्यांमध्ये स्टेन्ट बसवण्याचा खर्च : ४० हजार रुपये.
  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग शस्त्रक्रिया : १.१० लाख रुपये.
  • सिझेरियन प्रसूती : ९ हजार रुपये.
  • व्हर्टेब्रल अन्जिओप्लास्टी (एका स्टेन्टसह) : ५० हजार रुपये.
  • कर्करोगासाठी हिस्टेरेक्टमी शस्त्रक्रिया : ५० हजार रुपये.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

  • दिल्लीला मेरठशी जोडणाऱ्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २७ मे रोजी झाले.
  • १३५ किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस मार्ग देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस मार्ग आहे. उद्घाटनानंतर मोदींनी ६ किमी पर्यंत रोड शोही केला.
  • देशातील सर्वाधिक वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या या इस्टर्न पेरिफेरल मार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
  • दिल्ली आणि मेरठ या एक्सप्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी ९ किमी असून त्यात १४ मार्गिका आहेत.
  • निजामुद्दिन पुलापासून दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत हा रस्ता असेल. उर्वरित ९६ किमीचा मार्ग टप्प्याटप्प्याने २०१९-२०पर्यंत पूर्ण केला जाईल.
  • या मार्गामुळे गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएजा, पलवलला सिग्नलमुक्त रस्त्याने जोडले गेले असून त्यामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
  • दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात रालोआ सरकारने केली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

  • पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे २६ मे रोजी मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले.
  • कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.
  • वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला.
  • त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला.
  • गीता यांनी त्यावेळी त्यांचा मुलगा राजा त्यांना कशापद्धतीने त्रास द्यायचा हे प्रसारमाध्यमांसमोर दुःख कथन केले

रियाल माद्रिदची चॅम्पियन्स लीग जेतेपदाची हॅट्ट्रिक

  • अंतिम सामन्यात गॅरेथ बेलने ६४व्या मिनिटाला एक आणि ८४व्या मिनिटाला डागलेल्या दुसऱ्या अप्रतिम गोलच्या जोरावर रियाल माद्रिदने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली.
  • युक्रेनची राजधानी किव्ह येथे रंगलेल्या या सामन्यात लिव्हरपूलला ३-१ अशा गुणफरकाने नमवत, या जेतेपदासह रियाल माद्रिदने १३ युरोपियन किताब आपल्या नावावर केले आहेत.
  • बायर्न म्युनिचनंतर (१९७४ ते १९७६) चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरा करणारा रियाल माद्रिद क्लब हा पहिलाच क्लब ठरला आहे.
  • युरोपियन चषक/चॅम्पियन्स लीगचे जेतेपद ३ वेळा उंचावणारे झिनेदिन झिदान हे तिसरे प्रशिक्षक ठरले. यापूर्वी बॉब पैस्ली आणि कार्लो अँसेलोट्टी यांनी ही कामगिरी केली आहे, परंतु त्यांना जेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नव्हती.
  • युरोपियन चषक स्पर्धेची ५ जेतेपद नावावर करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला आहे. २००७-०८मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून रोनाल्डोने पहिल्यांदा हा चषक उंचावला. त्यानंतर रियाल माद्रिदकडून २०१३-१४, २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८मध्ये त्याने ही कामगिरी केली.

चालू घडामोडी : २५ मे

कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारचे बहुमत सिद्ध

  • कुमारस्वामी सरकारने कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केले आहे.
  • भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
  • भाजपाचे येडियुरप्पा सरकार अडीच दिवसात कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
  • कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ आमदार आहेत. तर १०४ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे.
  • पण बहुमतांसाठी आवश्यक ११२ आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुरप्पा यांना अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • बहुमत सिध्द करण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद मागणाऱ्या भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

गुजराती ज्येष्ठ विनोदी लेखक विनोद भट्ट यांचे निधन

  • गुजराती भाषेतील ज्येष्ठ विनोदी लेखक विनोद भट्ट यांचे २३ मे रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
  • मूत्रपिंड निकामी झाल्याने दीर्घ काळापासून ते अंथरुणाला खिळून होते. भट्ट यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार आहे.
  • भट्ट यांचा जन्म १९३८मध्ये गांधीनगर जिल्ह्याच्या देहगाम तालुक्यातील नंदोल तालुक्यात झाला. कर सल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
  • विनोद भट्ट यांनी अनेक वर्षे गुजराती वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. विनोदी लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांची४५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • ‘इदम तृतीयम’ व ‘माग नू नाम मारी’ या त्यांच्या विनोदी स्तंभाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. सन १९९६-१९९७ मध्ये ते गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते.
  • पेहलू सुख ना मुंगी नार, सुनो भाई साधो, विनोद भटना प्रेम पत्रो, हास्यायन, श्लील-अश्लील, नरो वा कुंजरो वा ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.
  • त्यांनी चार्ली चॅप्लिन, स्वप्नद्रष्टा मुन्शी, हास्यमूर्ती ज्योतिंद्र दवे, ग्रेट शो-मन जॉर्ज बर्नार्ड शॉ, अँतोन चेकोव्ह यांची चरित्रेही लिहिली.
  • कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, रमणभाई निळकंठ पुरस्कार, ज्योतिंद्र दवे पुरस्कार असे मानसन्मान त्यांना लाभले होते.

प्रियांका मोहिते ल्होत्से सर करणारी सर्वात लहान भारतीय महिला

  • साताऱ्यात राहणाऱ्या २६ वर्षीय प्रियांका मोहितेने जगातील चौथ्या क्रमांकावर उंच असणारे ल्होत्से शिखर सर करत एक विक्रम घडवला आहे.
  • प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.
  • प्रियांकाने याआधी वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे.
  • प्रियांका बंगळुरु येथे एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करते. तिने गिर्यारोहणातील शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिरिंग येथून घेतले आहे.

चालू घडामोडी : २४ मे

मणिपूरमध्ये पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार

  • मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या वटहुकुमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • या विद्यापीठामध्ये क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान आणि उच्च कामगिरी प्रशिक्षण यांवर लक्ष देण्यात येणार आहे. तसेच अॅथलीट आणि प्रशिक्षकांसाठी विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
  • मणिपूर सरकारने या प्रस्तावित विद्यापीठाला या आधीच जागा दिली आहे. त्यामुळे वटहुकुमावर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर कार्यवाही वेगाने होईल.

अतुल गोतसुर्वे उत्तर कोरियात भारताचे राजदूत

  • महाराष्ट्राचे सनदी अधिकारी अतुल गोतसुर्वे यांची उत्तर कोरियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
  • मूळचे सोलापूरचे असलेल्या गोतसुर्वे यांचे यांनी पुण्याच्या एमआयटीमधून बीई व सीओईपीमधून एमई केले आहे. पुण्यातूनच त्यांनी एलएलबी पूर्ण केले.
  • याआधी त्यांनी भूतान, मेक्सिको तसेच क्युबामध्ये काम केले असून, ते काही काळ पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुखही होते.
  • भारत व उत्तर कोरिया यांच्यातील संबंध सुधारत असताना व काही प्रमाणात व्यापार वाढत असताना, गोतसुर्वे यांची झालेली नेमणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तेजस्विनी सावंतला सुवर्ण

  • ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशा दोन पदकांची कमाई करणाऱ्या तेजस्विनी सावंतने म्युनिक, जर्मनी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी वर्ल्डकपमध्ये ५० मी. रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
  • उदयोन्मुख नेमबाज अंजुम मुदगिलला (६२१.२) मागे टाकून तिने ६२१.४ गुणांसह हे सुवर्ण जिंकले. तर अंजुम मुदगिलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात चेन सिंगने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. त्याने ६२७.९ गुणांची कमाई केली.

प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षपदी सी. के. प्रसाद यांची पुनर्नियुक्ती

  • सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. के. प्रसाद यांची दुसऱ्यांदा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • नोव्हेंबर २०१४पासून प्रसाद यांनी ३ वर्षे प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या मीडिया वॉचडॉगचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने प्रसाद यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.

उत्तर कोरियाकडून स्वतःचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट

  • कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांच्या उपस्थितील उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे.
  • उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाने हा तळ नष्ट करताना आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना निमंत्रण दिले नाही.
  • विविध आर्थिक आणि अन्य निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाने आपल्या आक्रमकतेला लगाम घातली असून कट्टर हाडवैर असलेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर चर्चा सुरु केली आहे.
  • मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.
  • पण आता उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळच नष्ट करुन संपूर्ण जगाला सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे संशयाला जागा उरतेच.
  • हा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबरची १२ जूनला सिंगापूरमध्ये होणारी नियोजित बैठक रद्द केली आहे.
  • ट्रम्प यांनी अचानक घेतलेली माघार हा एक मोठा झटका आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही बैठक होणे महत्वाचे होते.
  • उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा : किम जोंग उन

न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी स्टॅसी कनिंगहॅम

  • न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी स्टॅसी कनिंगहॅम यांची निवड करण्यात आली आहे.
  • या स्टॉक एक्स्चेंजच्या २२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे. स्टॅसी या सध्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य संचालन अधिकारी होत्या.
  • नॅसडॅक व न्यूयॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता महिलांच्या हातात आहेत. सध्या नॅसडॅकच्या मुख्य कार्यकारी ॲडेना फ्रीडमन या महिलाच आहेत.
  • त्या कनिंगहॅम या लेहाय विद्यापीठातून उद्योग अभियांत्रिकीत बीएस झालेल्या असून नंतर त्यांनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम सुरू केले.
  • १९६७मध्ये या संस्थेत मुरियल सिबर्ट यांच्या रूपाने एका महिलेला पहिल्यांदा स्थान मिळाले होते. त्यानंतर कॅथरिन किनी या २००२मध्ये सहअध्यक्ष झाल्या होत्या.

नागपूर मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार

  • स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला आहे.
  • नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे.
  • नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत.
  • या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आययूसीचे भारताचे प्रतिनिधी आशिष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

चालू घडामोडी : २३ मे

ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य

  • आंतरराज्य मालवाहतुकीसाठी केंद्र सरकारने लागू केलेली ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य होणार आहे. ही प्रणाली १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
  • पन्नास हजार किंवा त्याहून अधिक किंमतीच्या मालाची ने-आण दोन किंवा अधिक राज्यांमधून होत असल्यास ही प्रणाली लागू होईल.
  • दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकाला ई-माध्यमातून त्या देयकावरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरावा लागेल. या कराची पावती सादर केल्यानंतर संबंधित वाहनाला दुसऱ्या राज्यात प्रवेश मिळेल.
  • मालवाहतुकीतील जीएसटीमध्ये करचुकवेगिरी होऊ नये व हे कर संकलन सुलभ रीतीने व्हावे यासाठी सरकारने ही पद्धत सुरू केली आहे.
  • गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरयाणा आदी २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ही प्रणाली सुरू झाली आहे.
  • उर्वरित राज्यांत ही प्रणाली ३ जूनपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार ही प्रणाली महाराष्ट्रात ३१ मेपासून तर, पंजाब व गोवा येथे १ जूनपासून सुरू होईल.

सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे निधन

  • सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे २२ मे रोजी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
  • ६ सप्टेंबर १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली.
  • पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७मध्ये याच विद्यापीठातून एम.ए. केले.
  • १९६७मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते. सुमारे २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे अर्थसल्लागार होते.
  • टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
  • आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
  • डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती.
  • डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅडव्हाइस’ ही संस्था वित्तीय सल्लागार क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर होती.

एबी डिव्हीलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

  • दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने २३ मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
  • गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे थकलो असल्याचे सांगत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
  • मैदानात ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज अशी ओळख असलेला डीव्हिलियर्स रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपर कट यासारखे एकाहून एक सरस फटके सहज खेळतो.
  • मैदानात स्वभावाने शांत असलेल्या डिव्हीलियर्सची फलंदाजीतली कारकिर्द मात्र चांगलीच आक्रमक राहिलेली आहे.
  • एबीडीने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून २०,०१४ पटकावल्या आहेत.
  • एबीडीने २००४साली कसोटी क्रिकेटमध्ये, २००५साली वन-डे क्रिकेटमध्ये व २००६साली टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले.
  • यानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषविले. मात्र आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.
 डिव्हीलियर्सचे विक्रम 
  • एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक. (१६ चेंडूंमध्ये)
  • एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक (३१ चेंडूंमध्ये) व सगळ्यात जलद दीडशतक (६४ चेंडूंमध्ये).
  • कसोटीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
  • आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये सगळ्यात जास्त गुण कमावणारा तो दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे. (९३५ गुण)
  • ‘साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर’ हा मानाचा पुरस्कार एबीडीने २०१४ व २०१५ असा दोन वेळा पटकावला आहे.
  • सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथा दक्षिण अफ्रिकन खेळाडू आहे.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जॅक कॅलिस खालोखाल धावा करणारा दुसरा अफ्रिकन आहे.
  • ४० मिनिटांत १०० धावा आणि १९ मिनिटांत ५० धावांची खेळी.
  • एका सामन्यात सर्वाधिक १६ षटकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मासोबत डिविलियर्सच्या नावावर जमा आहे.
  • ३३८.६३ हा वनडेतील सर्वाधिक स्ट्राइक रेट एबीडीच्या खात्यावर जमा आहे.
एबी डिव्हीलियर्सची कारकीर्द
सामने धावा सर्वोच्च धावसंख्या सरासरी शतक अर्धशतक
कसोटी ११४ ८७६५ २७८* ५०.६६ २२ ४६
वन-डे २२८ ९५७७ १७६ ५३.५० २५ ५३
टी-२० ७८ १६७२ ७९* २६.१२ १० -

आरोग्यसेवांच्या बाबतीत जगात भारत १४५व्या स्थानी

  • आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांचा दर्जा, या संदर्भात वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, १९५ देशांच्या यादीत भारताचा १४५वा क्रमांक लागतो.
  • या यादीत चीनसह बांगलादेश, श्रीलंका, भूतान यांसारख्या छोट्या शेजाऱ्यांनीही भारताला मागे टाकले आहे.
  • आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत. १९९०मध्ये ते २४.७ इतकेच होते.
  • जरी भारताच्या एचएक्यू म्हणजे हेल्थकेअर अॅक्सेस अँड क्वालिटी निर्देशांकाने २००० ते २०१६ या काळामध्ये वेगाने झेप घेतली असली तरी सर्वात चांगल्या आणि सर्वात कमी गुणांमधील दरीही रुंदावल्याचे दिसून येते.
  • २०१६च्या आकडेवारीत गोवा आणि केरळ या राज्यांनी सर्वाधिक म्हणजे ६० पेक्षा जास्त गुण आहेत तर आसाम आणि उत्तरप्रदेशाला सर्वात कमी म्हणजे ४० पेक्षा कमी गुण आहेत.
  • भारतापेक्षा चीन (४८), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांची स्थिती चांगली आहे.
  • तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
  • या यादीत आईसलँड, नॉर्वे, नेदरलँडस, लक्झेंबर्ग हे देश पहिल्या चार क्रमांकांवर आहेत. तर फिनलंड आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तरीत्या ५व्या स्थानी आहेत.

जगातील सर्वात लहान वायरलेस रोबोचा शोध

  • अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे.
  • किटकासारख्या दिसणाऱ्या या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे.
  • हे संशोधक ब्रिसबेन येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अ‍ॅण्ड ऑटोमेशन’मध्ये हा शोध सादर करणार आहेत.
  • संशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत.
  • त्यांनी आयआयटी मुंबई येथे बी.टेक., तर अमेरिकेत एम.एस. केले आहे. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पी.एच.डी. करत आहेत.

चालू घडामोडी : २२ मे

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे जी परमेश्वर उपमुख्यमंत्री

  • कर्नाटकमधील सत्तासंघर्षानंतर जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री म्हणून तर काँग्रेसचे जी परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
  • त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के आर रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील.
  • काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्याबाबत निर्णय झाला.
  • २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल.
  • परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते असून काँग्रेसचेच रोशन बेग यांच्या नावाची यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होती.
  • तत्पूर्वी उपमुख्यमंत्रीपद हे लिंगायत समाजाच्या आमदाराला देण्यात यावे अशी मागणी लिंगायत संघटनांनी केली होती.
  • त्यानंतर काही मुस्लिम संघटनांनी हे पद मुस्लिम समाजाच्या आमदाराला देण्याची मागणी केली होती.
  • अखेर काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने ही जबाबदारी दलित नेते पी. परमेश्वर यांच्याकडे देण्याचे निश्चित केले. परमेश्वर हे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

मलेशियातील सरकारमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती

  • मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे गोविंद सिंग देव यांची निवड झाली आहे.
  • त्यांच्याकडे कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते देण्यात आले असून, मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील ते पहिलेच मंत्री आहेत.
  • देव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे. मलेशियात साधारणपणे १ लाख शीख लोक राहातात.
  • त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये एम. कुलसेहरन या भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे.
  • ते डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे.
  • ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांची मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली असून, जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले ते सर्वात वयोवृद्ध नेते आहेत.

चंद्राच्या अभ्यासासाठी चीनकडून उपग्रह प्रक्षेपित

  • आतापर्यंत फारशी माहिती न मिळालेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूचा अभ्यास करण्यासाठी चीनने २१ मे रोजी उपग्रह प्रक्षेपित केला.
  • ‘क्वेकियाओ’ असे या उपग्रहाचे नाव असून, त्याचे वजन ४०० किलो आहे. त्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.
  • या उपग्रहावर अनेक अँटेना असून, त्यातील एका अँटेनाचा व्यास ५ मीटर आहे. दूरवरच्या अवकाश मोहिमांमध्ये संदेशांसाठी वापरण्यात आलेला हा सर्वात मोठा अँटेना असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
  • या मोहिमेमध्ये चंद्रावर रोव्हर उतरविण्यात येणार आहे. चंद्राच्या दुसऱ्या बाजूवर एखादे उपकरण उतरविणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे.

राजा राम मोहन राय यांची २४६वी जयंती

  • भारतातील महान समाज सुधारक आणि विद्वान राजा राम मोहन राय यांची २२ मे रोजी २४६वी जयंती आहे.
  • ‘आधुनिक भारतीय समाजाचे जनक’ अशी त्यांची ओळख होती. देशातील सामाजिक आणि धार्मिक रचनेतील सुधारणा त्यांनी सुचवली.
  • मुघल सम्राज्याविषयी त्यांनी ब्रिटीश राजवटीसमोर जो पक्ष मांडला होता त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती.
  • राजा राम मोहन राय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजीबंगाल मधील राधानगर गावात एका ब्राह्मण कुटूंबात झाला.
  • अरबी, फारसी, इंग्रजी, ग्रीक, हिब्रू इत्यादी भाषांचे ज्ञान त्यांना होते. हिंदू, मुस्लिम, ईसाई आणि सूफी या धर्मांचाही त्यांचा अभ्यास होता.
  • १५ वर्षाच्या वयात त्यांनी मुर्ती पुजेला विरोध करणारे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या समाजसुधारणेची किंमतही त्यांना मोजावी लागली होती.
  • त्यांनी दूरदूरच्या यात्रा केल्या आणि विविध ठिकाणचे ज्ञान आणि अनुभव प्राप्त केले.
  • समाजातील कुप्रथांविरोधात त्यांनी २० ऑगस्ट १८२८ला ब्राम्हो समाजाची स्थापना केली. हे पहिले सामाजिक-धार्मिक सुधार आंदोलन होते.
  • सती प्रथेला भारतात खुप पाळले जात होते पण १८२९मध्ये या सतीप्रथेला संपविण्याचे श्रेय राजा राम मोहन राय यांना जाते.
  • शिवाय भारतीय शिक्षण पध्दतीतील बदलांना त्यांचे समर्थन होते. त्यांनी इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य विज्ञानाचे शिक्षण भारतीय शिक्षणात आणले.
  • त्यासाठी त्यांनी हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. जी त्या काळातील सर्वात आधुनिक संस्था होती.
  • २७ सप्टेंबर १८३३ रोजी मेंदूज्वराने राजा राम मोहन राय यांचे निधन झाले. ब्रिटनमधील ब्रिस्टल नगरच्या आरनोस वेल स्मशान येथे त्यांची समाधी आहे.

एलजी कंपनीचे अध्यक्ष कु बोन मु यांचे निधन

  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात नावाजलेल्या दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीचे अध्यक्ष कु बोन मु यांचे २० मे रोजी निधन झाले.
  • सुरूवातीला अगदी छोट्या असलेल्या एलजी कंपनीला नावारूपाला आणण्याचे काम कु बोन मु यांनी केले.
  • कु यांचा जन्म साउथ गेआँगसाँग प्रांतात जिंजू येथे झाला. त्यांचे शिक्षण योनसेई विद्यापीठात झाले व नंतर त्यांनी अ‍ॅशलँड विद्यापीठातून पदवी घेतली.
  • क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी उद्योग व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली होती. १९७५मध्ये त्यांनी एलजी कंपनीत प्रवेश केला.
  • नंतर ते एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक झाले आणि १९८५मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले.
  • त्यांच्या काळात कंपनीची आर्थिक वाढ मोठय़ा प्रमाणात झाली. एलजी समूहाचे मागोक डॉग या पश्चिम सेऊलमधील भागात ४२ एकरांवर सायन्स पार्क असून तेथे कंपनीच्या प्रयोगशाळा आहेत.
  • एकूणच २३ वर्षे नेतृत्व करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात कंपनीला पुढे नेण्यात कु यांचा मोठा वाटा होता.

चालू घडामोडी : २१ मे

केरळमध्ये दुर्मीळ निपाह विषाणूचा संसर्ग

  • केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
  • सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
  • तसेच रूग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी याप्रश्नी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चे उच्चस्तरीय डॉक्टरांचे पथक केरळमध्ये पाठविले आहे.
 निपाह विषाणूबाबत… 
  • जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे
  • यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असेही म्हटले जाते.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निपाह विषाणू हा ‘फ्रुट बॅट’ जातीच्या वटवाघुळामुळे फळ व फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो.
  • १९९८मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. यामुळे या विषाणूला ‘निपाह’ असे नाव देण्यात आले.
  • सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला आणि त्यामुळे २६५ जणांचा मृत्यू झाला.
  • २००१ आणि २००७मध्ये निपाह व्हायरसने भारतात धुमाकूळ घातला होता. भारतात सर्वात आधी पश्चिम बंगालमध्ये हा व्हायरस आढळून आला होता.
  • पश्चिम बंगालमध्ये दोन्ही वेळेस या व्हायरसची एकूण ७१ लोकांना लागण झाली होती. त्यात ५० लोकांचा मृत्यू झाला होता.
  • २००४मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.
  • या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
  • ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.
  • या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
  • एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारताने २१ मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता.
  • ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून मोबाइल लाँचरवरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.
  • ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार आहे.
  • भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास्त्रे ही ब्लॉक-III यंत्रणेने सज्ज आहेत.
  • भारतीय लष्कराकडून ब्राह्मोसचा जमिनीवरून हल्ला करणाऱ्या श्रेणीचा २००७पासून वापर केला जातो.
  • या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वत: वर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्याचबरोबर शत्रूच्या हवाई रक्षा प्रणालीपासूनही हे सुरक्षित राहू शकेल.

नौदलाच्या सहा महिला विश्व सागरपरिक्रमा करून भारतात परत

  • ४ खंड, ३ महासागर आणि सुमारे २१,६०० नॉटिकल मैल अंतर पार करत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कर्तबगारी बजावणाऱ्या नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांचे पथक २१ मे रोजी भारतात परतले.
  • या सागरी परिक्रमेबरोबरच त्या समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या आहेत.
  • हे पथक आठ महिन्यांपूर्वी १० सप्टेंबर २०१७ रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघाले होते.
  • या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आले होते. देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश होता.
  • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता.
  • पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
  • एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात घालवले.
  • या प्रवासादरम्यान या महिलांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले.
  • जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला ७ मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी ६० किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचा सामना करावा लागला.
  • सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिकाऱ्यांचे हे पथक २३ मे रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
  • यापूर्वी कमांडर दिलीप दोंदे यांनी भारताची पहिली विश्व सागरपरिक्रमा आयएनएसव्ही म्हादेई या शिडाच्या नौकेच्या साह्याने केली.
  • नंतर त्याच नौकेवर स्वार होत लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी याने विनाथांबा सागरपरिक्रमा केली.
  • आता तिसरी विश्व सागरपरिक्रमा ही महिला चमूची पार पडली असून त्यासाठी आयएनएसव्ही तारिणी ही नवी शिडाची नौका बांधण्यात आली होती.
 आयएसएनव्ही तारिणी 
  • आयएसएनव्ही तारिणी या ५५ फुट उंचीच्या नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे.
  • ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला.
  • वुडन फायबर-ग्लासने बनलेल्या या नौकेची बांधणी समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम अशी करण्यात आली आहे.

लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार

  • बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन ‘गोल्डन बूट’ पटकावण्याचा मान मिळवला आहे.
  • ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक ३४ गोल केल्यामुळे त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  • या पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सलाह आणि हॅरी केन हे दोन नामवंत फुटबॉलपटूही होते.
  • गेल्यावर्षीही मेस्सीने या पुरस्काराला गवसणी घातली होती. त्यापूर्वी २०१०, २०१२ आणि २०१३ या वर्षांमध्येही मेस्सी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
  • यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.

चालू घडामोडी : २० मे

माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना ३ वर्ष तुरुंगवास

  • भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना १९ मे रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
  • पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
  • माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे.
  • माधुरी गुप्ता यांना सरकारी गोपनियता अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवले असून, यामध्ये कमाल ३ वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
  • माधुरी गुप्ता १९८३साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली नेमणूक क्वालालंपूर येथे झाली होती. त्यानंतर त्या बगदादमध्ये होत्या.
  • २२ एप्रिल २०१० रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि जुलै २०१०मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. २२ मार्च २०१२ पासून हा खटला सुरू होता.
  • पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या एका अधिकाऱ्याच्या प्रेमात अडकलेल्या माधुरी गुप्ता यांनी बरीच गोपनीय माहिती त्याला पुरवली.
  • ही बाब भारतीय गुप्तचर यंत्रणांना लक्षात येताच, गुप्ता यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यात त्या खरोखरच पाकिस्तानला मदत करीत असल्याचे सिद्ध होताच, त्यांना अटक केली.

तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य - सीएमएस इंडिया

  • सीएमएस इंडियाने देशातील १३ मोठय़ा राज्यांमध्ये केलेल्या पाहणीत तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे आढळून आले आहे.
  • संबंधित राज्यातील नागरिकांची सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची मते, लाच मागण्याचे प्रमाण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले.
  • त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून सर्वाधिक भ्रष्ट आणि कमीत कमी भ्रष्ट राज्यांची यादी तयार करण्यात आली.
  • त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाब, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याचेही उघड झाले आहे.
  • तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळी मोठय़ा प्रमाणावर सक्रिय झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

  • एएफआर आशिया बँक ग्लोबल वेल्थच्या अहवालानुसार भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे.
  • यासाठी प्रत्येक देशातील खासगी मालमत्तांचा (बिगर सरकारी) विचार करण्यात आला आहे. यात सरकारी महसुलाचा विचार करण्यात आलेला नाही.
  • या खासगी मालमत्तेमध्ये स्थावरजंगम मालमत्ता, रोकड, शेअर्स, व्यावसायिक उत्पन्न आदीचा समावेश होतो.
  • या सूचीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील खासगी मालमत्ता ही ६२ हजार ५८४ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.
  • अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक असून चीनमध्ये २४ हजार ८०३ अब्ज अमेरिकी डॉलरची खासगी मालमत्ता आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानमध्ये १९ हजार ५२२ अब्ज अमेरिकी डॉलरची संपदा खासगी मालमत्तेच्या स्वरूपात आहे.
  • यानंतर ब्रिटन (९ हजार ९१९ अब्ज अमेरिकी डॉलर) व जर्मनी (९ हजार ६६० अब्ज अमेरिकी डॉलर) यांचा क्रमांक असून त्यांच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागला आहे.
  • भारताने या सूचीत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स व इटलीवर आघाडी घेतली आहे. भारतामध्ये ८ हजार २३० अब्ज अमेरिकी डॉलर संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • मोठ्या प्रमाणावरील उद्योगधंदे, उत्तम शिक्षणव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी, आरोग्यसुविधा, स्थावर मालमत्ता आदींमुळे भारताने हे स्थान पटकावले आहे.

शिवांगी पाठकने केले माउंट एव्हरेस्ट सर

  • १६ वर्षीय शिवांगी पाठक हिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.
  • एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे शिवांगीने सांगितले.
  • अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.
  • हरिणायाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या शिवांगीने ‘सेव्हन समिट ट्रेक’मध्ये सहभागी होऊन एव्हरेस्टची चढाई करण्याचा पराक्रम केला आहे.

राफेल नदालला रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

  • स्पेनच्या राफेल नदालने इटालीयन ओपन (रोम मास्टर्स) टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
  • या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेववर ६-१, १-६, ६-३ अशी मात केली.
  • नदालने ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली. या विजयाने नदालने टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. नदालहा ३२वा मास्टर्स किताब ठरला.

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersची PDF स्वरूपातील ही नोट्स मोफत डाउनलोड करा.
नोट्स आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
ही नोट्स फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : १९ मे

प्रख्यात तामिळ लेखक बालाकुमारन यांचे निधन

  • प्रख्यात तामिळ कादंबरीकार व चित्रपटकथा लेखक बालाकुमारन यांचे १५ मे रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यात ५ जुलै १९४६ रोजी झाला. साहित्य हा त्यांचा आवडता प्रांत होता.
  • सुरुवातीला ते एका कृषी कंपनीत ते लघुलेखक होते. ती नोकरी त्यांनी सोडली. नंतर त्यांनी चित्रपटांसाठी कथा व संवाद लिहिले.
  • ‘मर्क्युरी पोक्कल’ (मर्क्युरी ब्लॉसम्स) ही त्यांची पहिली कादंबरी खूप गाजली. त्यात एका कामगाराची प्रेमकथा रेखाटली होती.
  • वाझी मयक्कम ही त्यांची पहिली लघुकथा तर कनायाझी या नियतकालिकात त्यांची ‘पुढु कविधाई: द टेलिफोन क्लीनर’ ही पहिली धारावाहिक कादंबरी प्रकाशित झाली.
  • राज राजा चोझान यांच्यावर ‘उदयार’ या पुस्तकाचे सहा खंड त्यांनी लिहिले. त्याच्या किमान पंधरा आवृत्त्या तरी पूर्ण झाल्या आहेत.
  • आनंदविकटन, कालक्की, कुमुदम या नियतकालिकांतून त्यांनी केलेले लेखन नंतर छोटेखानी कादंबऱ्यांच्या रूपात प्रसिद्ध झाले.
  • नायकन, गुना, बाशा, जेन्टलमन या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. २००हून अधिक कादंबऱ्या व १०० लघुकथासंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
  • त्या काळात ‘काचाताथापारा’ हे बंडखोर साहित्य नियतकालिक प्रसिद्ध होत असे, त्याच्या संस्थापकांपैकी ते एक होते.
  • तामिळनाडू सरकारच्या कलईमामानी पुरस्कारासह त्यांना इतरही अनेक सम्मान मिळाले होते.

ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाहसोहळा संपन्न

  • ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा १९ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला आहे.
  • विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये ६०० खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे.
  • या शाही विवाह सोहळ्यावर सुमारे २९३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. हा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे.
  • विन्डसर कॅसलमध्ये विवाहबद्ध होणारे हॅरी-मेगनहे राजघराण्यातील सोळावे जोडपे ठरले आहे.
  • हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही या लग्नाला हजेरी लावली.
  • प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.
  • हॉलीवूडची ३६ वर्षीय अभिनेत्री मेगन मार्केलचे हे दुसरे लग्न आहे. २०११मध्ये तिने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते.

सीआयएच्या संचालकपदी जीना हास्पेल

  • अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हास्पेल सध्या सीआयएच्या उपप्रमुख होत्या. सीआयएकडून कैद्यांच्या चौकशीसाठी वापरण्यात आलेल्या अतिशय क्रूर पद्धतीतील त्यांच्या सहभागामुळे हास्पेल वादग्रस्त ठरला होत्या.
  • मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.
  • सीआयएच्या ७० वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत.