चालू घडामोडी : ८ मे

सीतांशु यशश्चंद्र मेहता यांना सरस्वती सन्मान जाहीर

  • गुजराती प्रयोगशील कवी सीतांशु यशश्चंद्र मेहता यांना त्यांचं ‘वखर’ या काव्यसंग्रहासाठी बिर्ला फाऊंडेशनकडून दिला जाणारा ‘सरस्वती सन्मान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • कच्छमध्ये जन्मलेल्या सीतांशु यशश्चंद्र मेहता यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. मुंबई विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले आहे.
  • फुलब्राइट शिष्यवृत्तीतून त्यांनी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सौंदर्यशास्त्र व तौलनिक साहित्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
  • त्यांचे मोहेंजोदारो, ओदिसियास नु हालेसू, जटायू, अश्वत्थामा, वखर हे काव्यसंग्रह लोकप्रिय ठरले आहेत.
  • त्यांच्या जटायू या काव्यसंग्रहाला १९८७साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिअला आहे.
  • कवितांबरोबरच त्यांचे नाटय़लेखनही गुजराती साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. त्यांच्या केम माकनजी क्या चाल्या, आ माणस मद्रासी लागे छे, ठोकर, वैशाखी कोयल आदी नाटकांनी गुजराती रंगभूमी समृद्ध झाली आहे.
  • मोजकेच पण सघन समीक्षालेखन, तसेच अनेक परदेशी भाषांतील साहित्याचे गुजराती अनुवादही त्यांनी केले आहेत.
  • साहित्य अकादमीच्या ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर’चे ते एक संपादक आहेत.
  • यशश्चंद्र यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्राध्यापक व नंतर सौराष्ट्र विद्यापीठात कुलपती म्हणूनही काम केले आहे.

मराठा व कुणबी समाजाच्या विकासासाठी ‘सारथी’ची स्थापना

  • शेतीआधारित मराठा व कुणबी या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे पर्याय शोधण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • मराठा व कुणबी समाजाच्या प्रमुख समस्यांवर कायस्वरूपी शास्त्रोक्त व संशोधनात्मक पद्धतीने पर्यायी उपाययोजना आखण्याचे काम ही संस्था करणार आहे.
  • या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ७९ पानांचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे.
  • यामध्ये ‘सारथी’ या संस्थेची कार्यपद्धती व विविध विकासाचा कार्यक्रम सखोल संशोधनानंतर नमूद केला आहे.
  • शेती, शेतकरी, रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात मराठा व कुणबी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या ‘सारथी’ या संस्थेचा आराखडा या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.
  • या संस्थेच्या माध्यमातून मराठा व इतर लक्षित गटांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणे शक्य असून, त्यातून समाजाच्या बहुतांश समस्यांवर मात करणे शक्य असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
 संस्थेचे उद्देश 
  • मराठा व कुणबी समाजामधून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे कुटुंब/कुटुंबाचे सदस्य म्हणजे मराठा व कुणबी समाजामधून उन्नत आणि प्रगत गट/व्यक्ती (क्रिमिलेयर) वगळून सर्व कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणे.
  • खासगी क्षेत्रात नोकऱ्या किंवा स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे विविध प्रशिक्षण देणे व दरवर्षी सुमारे दहा हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देणे.
  • मराठा व कुणबी समाजातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योजक प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे. त्यांना लघु व मध्यम दर्जाचे उद्योग अथवा लघुउद्योग उभारण्यासाठी भागभांडवल उभारणे व बॅंकांकडून आर्थिक मदत मिळवून देणे.
  • शासकीय व निम-शासकीय नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या यूपीएससी (प्रशासकीय सेवा), रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, एनडीए, न्यायव्यवस्था, जेआरई, टोफेल, सैन्य व पोलिस भरती, इत्यादींच्या पूर्व तयारीसाठी कोचिंग क्लासेस आयोजित करणे किंवा विविध विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोजित करणे.
  • तसेच, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. कायदा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, व्यवस्थापन, यूजीसी-नेट/ सेट आदींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोचिंग क्लासेसचे नियोजन करणे.
  • संभाषण कौशल्य, सामान्य ज्ञान, इंग्रजी इत्यादींमध्ये प्रावीण्य यासाठी विविध प्रकारचे फाउंडेशन कोचिंग क्लासेस दहावी पास, बारावी पास व स्नातक विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित करणे.
  • लक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्चशिक्षण (एमफिल आणि पीएचडी) मिळविण्यासाठी विविध फेलोशिप देणे व इतर उपक्रम राबविणे (सुमारे ६४१ फेलोशिप दरवर्षी).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा