प्रश्नसंच १९ - [अर्थशास्त्र]

---------------------------------------------------
[प्र.१] भूविकास बँकांचा भांडवल उभारणीचा सर्वात महत्वाचा स्त्रोत कोणता?
१] ठेवी
२] भागी भांडवल
३] कर्ज घेणे
४] कर्ज रोख्यांची विक्री

उत्तर
४] कर्ज रोख्यांची विक्री
------------------
 [प्र.२] निर्यात व्यापारातील जोखीमेला विमा संरक्षण कोण देते?
१] इ.सी.जी.सी.
२] क्रिसिल
३] एम.आय.सी.आय.एल.
४] एल.आय.सी.

उत्तर
१] इ.सी.जी.सी.
------------------
 [प्र.३] साखर कारखान्याच्या उभारणीत जागा ठरविताना कोणता घटक विशेष लक्षात घेतला जातो?
१] उसाची उपलब्धता
२] स्वस्त कामगारांची उपलब्धता
३] उच्च तंत्रज्ञान
४] मोठे बाजार

उत्तर
१] उसाची उपलब्धता
------------------
 [प्र.४] उत्पन्न निर्धारण सिद्धांतामध्ये खालीलपैकी कशावरिल खर्च हा गुंतवणूक म्हणून ग्राह्य धरला जात नाही?
१] कारखाना उभारणी
२] संगणक
३] विक्री न झालेल्या वस्तूमध्ये झालेली वाढ
४] सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग

उत्तर
४] सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग
------------------
 [प्र.५] 'आत्मनिर्भरता' या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही?
१] सर्व प्रकारची आयात बंद करणे.
२] व्यवहार तोलामध्ये संतुलन स्थापित करणे.
३] भांडवली वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे.
४] उच्च तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळामध्ये स्वयंपूर्ण होणे.

उत्तर
१] सर्व प्रकारची आयात बंद करणे.
------------------
 [प्र.६] संतुलित विकास म्हणजे .................................
१] कृषी व उद्योग क्षेत्राचा समान विकास
२] खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास
३] आयात व निर्यात समान असणे
४] वरील सर्व

उत्तर
२] खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास
------------------
[प्र.७] 'लघुउद्योग' नावाचे मासिक कोणामार्फत चालविले जाते?
१] MSSDIC
२] MIDC
३] RBI
४] SICOM

उत्तर
१] MSSDIC
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोखे बाजार नाही?
१] राजकोट
२] कोईमतूर
३] झाशी
४] मंगलोर

उत्तर
३] झाशी
------------------
[प्र.९] भारत निर्माण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणता घटक अंतर्भूत नाही?
१] ग्रामीण रस्ते
२] ग्रामीण विद्युतीकरण
३] ग्रामीण शिक्षण
४] ग्रामीण आरोग्य

उत्तर
३] ग्रामीण शिक्षण
------------------
 [प्र.१०] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.
अ] मंदीवाले दलाल हे संभाव्य तोट्याचा विचार करून व्यवहार करतात.
ब] तेजीवाले दलाल हे संभाव्य नफ्याचा विचार करून व्यवहार करतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
३] दोन्ही योग्य
-------------------------------------------------------------