प्रश्नसंच २० - [राज्यघटना]

---------------------------------------------------
[प्र.१] खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही?
१] निवडणूक आयोग
२] नियोजन आयोग
३] वित्त आयोग
४] राज्य लोकसेवा आयोग

उत्तर

२] नियोजन आयोग
------------------
 [प्र.२] कोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला?
१] ५१वी
२] ५२वी
३] ५३वी
४] ५४वी

उत्तर

३] ५३वी
------------------
 [प्र.३] खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना कलम ३७१(अ) नुसार विशेषाधिकार आहेत?
१] हरियाणा
२] नागलॅंड
३] आसाम
४] अरुणाचल प्रदेश

उत्तर

२] नागलॅंड
-----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्र्सुचीत होत नाही?
अ] गुन्हेगारी कायदा
ब] पोस्ट
क] पोलिस
ड] जमीन महसूल

१] फक्त क
२] क आणि ड
३] अ, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर

३] अ, क आणि ड
------------------
 [प्र.५] खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेत प्रतिनिधीत्व नाही?
१] लक्षद्वीप
२] दमण-दीव
३] अंदमान व निकोबार बेटे
४] वरीलपैकी नाही

उत्तर

४] वरीलपैकी नाही
------------------
 [प्र.६] गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येत नाही?
१] आसाम
२] नागलॅंड
३] सिक्कीम
४] अरुणाचल प्रदेश

उत्तर

३] सिक्कीम
------------------
[प्र.७] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] राष्ट्रपतीला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला

उत्तर

३] लोकसभेला
------------------
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते.
ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर

३] दोन्ही योग्य
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकुम काढू शकतात.
ब] वटहुकुमाचा अंमल हा कायद्याप्रमाणेच असतो.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर

३] दोन्ही योग्य
------------------
[प्र.१०] भारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो.
ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर

३] दोन्ही योग्य
-------------------------------------------------------------