प्रश्नसंच ४६ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात?
१] बँक ऑफ इंग्लंड
२] बँक ऑफ कोलकत्ता
३] ब्रिटीश भारत सरकार
४] स्थानिक कलेक्टर

उत्तर
३] ब्रिटीश भारत सरकार
----------------
[प्र.२] गृहनिर्माण क्षेत्राची सर्वोच्च संस्था म्हणून कोण कार्य करते?
१] ICICI बँक
२] RBI
३] NHB
४] HDFC

उत्तर
३] NHB [National Housing Bank]
----------------
 [प्र.३] खालीलपैकी कोणत्या उद्योगास मुलभूत उद्योग म्हणता येईल ?
१] लोह-पोलाद उद्योग
२] कापड उद्योग
३] रंग उद्योग
४] औषध निर्मिती उद्योग

उत्तर
१] लोह-पोलाद उद्योग
----------------
[प्र.४] स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणत्या करांची आकारणी करते?
१] घरपट्टी व देणगीकर
२] घरपट्टी व पाणीपट्टी
३] उत्पादन शुल्क
४] वाहन कर व विक्रीकर

उत्तर
२] घरपट्टी व पाणीपट्टी
----------------
[प्र.५] औद्योगिक कामगारांकरिता वर्गीकृत रोजगारातील किमान वेतन निश्चित करणे व सुधारित करणे यासाठी कशाचा वापर करतात?
१] ग्राहक किंमत निर्देशांक
२] उद्योगातील नफ्याच्या प्रमाणानुसार
३] सरकारी आदेशानुसार
४] कामगारांच्या अपेक्षांचा विचार करून

उत्तर
१] ग्राहक किंमत निर्देशांक
----------------
[प्र.६] राज्यात कृषीसंजीवनी योजना केव्हापासून सुरु झाली?
१] १९९९
२] १९९३
३] २०११
४] २०१३

उत्तर
३] २०११
----------------
[प्र.७] एप्रिल १९८७ पासून कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नवीन प्रादेशिक बँक स्थापनेस स्थगिती देण्यात आली?
१] सी रंगराजन समिती
२] केळकर समिती
३] अभिजित सेन गुप्ता समिती
४] नरिमन समिती

उत्तर
२] केळकर समिती
----------------
[प्र.८] जिल्हास्तरावरील उत्पन्नाचे अंदाज तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो?
१] उत्पन्न स्त्रोत पद्धत
२] खर्च पद्धत
३] गुंतवणूक पद्धत
४] उत्पन्न-खर्च पद्धत

उत्तर
१] उत्पन्न स्त्रोत पद्धत
----------------
[प्र.९] इंदिरा आवास योजनेबाबत योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेला केंद्र व राज्य यांच्याकडून अनुक्रमे ७५:२५ निधी पुरविला जातो.
ब] या योजनेची सुरुवात १९८५-८६ साली झाली.
क] किमान ६०% निधीचा वापर SC/ST करिता करणे बंधनकारक आहे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या आधारभूत वर्षासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] पहिले आधारभूत वर्ष १९४९-५० हे मानण्यात आले.
ब] २०१० सालापासून आधारभूत वर्ष म्हणून २००४-०५ हे वर्ष स्वीकारले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब योग्य
[पहिले आधारभूत वर्ष १९४८-४९ हे मानण्यात आले.]

-------------------------------------------------------------