प्रश्नसंच ३२ - [राज्यघटना]

[प्र.१] खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क नाही?
१] समतेचा हक्क
२] धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
३] शोषणाविरुद्धचा हक्क
४] रोजगाराचा हक्क


उत्तर
४] रोजगाराचा हक्क
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या ८व्या परिशिष्टात समाविष्ट नाही?
१] उर्दू
२] गुरुमुखी
३] सिंधी
४] नेपाळी


उत्तर
२] गुरुमुखी
----------------
 [प्र.३] भारतात कोणत्या प्रकारची शासनव्यवस्था आहे?
१] निरंकुश राजेशाही
२] अध्यक्षीय लोकशाही
३] संसदीय शासनव्यवस्था
४] संघराज्यात्मक शासनव्यवस्था


उत्तर
३] संसदीय शासनव्यवस्था
----------------
[प्र.४] कायदेविषयक अधिकार कोणाच्या हाती असतात?
१] राष्ट्रपती
२] संसद
३] पंतप्रधान
४] राज्यपाल


उत्तर
२] संसद
----------------
[प्र.५] विधानपरिषदेतील सदस्यसंख्या कमीत कमी किती असावी लागते?
१] ५०
२] ४०
३] ६०
४] ७०


उत्तर
२] ४०
----------------
[प्र.६] ४२वी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली?
१] १९७४
२] १९७५
३] १९७६
४] १९७७


उत्तर
३] १९७६
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणता अधिकार भारताचा नागरिक नसलेल्या लोकांनादेखील मिळतो?
१] अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
२] संचार स्वातंत्र्याचा अधिकार
३] संपत्तीचा अधिकार
४] जीविताचा अधिकार


उत्तर
४] जीविताचा अधिकार
----------------
[प्र.८] खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ] गरजेनुसार विविध खात्यांची निर्मिती पंतप्रधान करतो.
ब] कॅबिनेट सचिव हा युपीएससीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही चूक
४] एकही नाही


उत्तर
२] फक्त ब
----------------
[प्र.९] राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] सर्वोच्च न्यायालय
२] मंत्रीमंडळ
३] संसद
४] लोकसभा


उत्तर
३] संसद
----------------
[प्र.१०] मंत्रीपरिषदेविरुद्धचा अविश्वासाचा ठराव कोठे मांडला जातो?
१] लोकसभेत
२] राज्यसभेत
३] दोन्ही सभागृहात
४] संयुक्त अधिवेशनात


उत्तर
१] लोकसभेत
--------------------------------------------------