प्रश्नसंच ७२ - [पंचायत राज]

[प्र.१] स्थानिक स्वराज्य परिषदेच्या अध्यक्षपदी पी.बी.पाटील समितीने कोणाची शिफारस केली?
१] राज्यपाल
२] मुख्यमंत्री
३] जिल्हाधिकारी
४] विभागीय आयुक्त

उत्तर
२] मुख्यमंत्री
------------------
[प्र.२] 'सामाजिक न्याय समितीची स्थापना करण्यात यावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] बलवंतराय मेहता समिती

उत्तर
१] अशोक मेहता समिती
------------------
[प्र.३] 'विकास प्रशासनाचे केंद्र जिल्हा असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बाबुराव काळे समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] जी.व्ही.के.राव समिती

उत्तर
४] जी.व्ही.के.राव समिती
------------------
[प्र.४] 'ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची लोकसंख्या २००० असावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बाबुराव काळे समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] जी.व्ही.के.राव समिती

उत्तर
३] पी.बी.पाटील समिती
------------------
[प्र.५] जिल्हास्तरीय योजनासंबंधी शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
१] एल.एम.सिंघवी समिती
२] हनुमंतय्या समिती
३] गोविंद सहाय समिती
४] भूषण गगराणी समिती

उत्तर
२] हनुमंतय्या समिती
------------------
[प्र.६] सरपंचांना मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बलवंतराय मेहता समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] अशोक मेहता समिती

उत्तर
३] पी.बी.पाटील समिती
------------------
[प्र.७] मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मजुरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते?
१] तलाठी
२] सरपंच
३] उपसरपंच
४] ग्रामसेवक

उत्तर
४] ग्रामसेवक
------------------
[प्र.८] पंचायत राज संस्था स्वशासित संस्था म्हणून विकसित करण्यासाठी त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] एल.एम.सिंघवी समिती
२] हनुमंतय्या समिती
३] गोविंद सहाय समिती
४] भूषण गगराणी समिती

उत्तर
१] एल.एम.सिंघवी समिती
------------------
[प्र.९] पी.बी.पाटील समिती नेमण्यामागील खालीलपैकी कोणते उद्दिष्टे होते?
अ] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्माचा-यांच्या समस्या
ब] ग्रामपंचायतीचे आर्थिक प्रश्न
क] पंचायतराजच्या कार्याचे पुनर्विलोकन
ड] ग्रामपंचायत प्रशासनात सुधारणा

१] अ,ब आणि क
२] ब,क आणि ड
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] पी.बी.पाटील समितीच्या शिफारशी लक्षात घ्या.
अ] ग्रामपंचायतीची महसुली कार्ये हि पंचायत समितीकडे असावी.
ब] अविश्वास ठरावावर  १/३ सदस्यांची सही असावी.
क] ग्रामसेवकाप्रमाणे तलाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा.

वरीलपैकी कोणती शिफारस पी.बी.पाटील समितीची नाही?
१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] अ आणि क

उत्तर
१] फक्त अ
---------------------------------------------