प्रश्नसंच ७७ - [इतिहास]

[प्र.१] श्रीमद भगवतगीता मूळ कोणत्या भाषेत लिहिलेली होती?
१] संस्कृत
२] प्राकृत
३] पाली
४] अपभ्रंश

उत्तर
१] संस्कृत
------------------
[प्र.२] मेगस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता?
१] सेल्युकस
२] नेपोलियन
३] अलेक्झांडर
४] दारीस

उत्तर
१] सेल्युकस
------------------
[प्र.३] १९३२ च्या जातीय निवाड्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती याला अपवाद कोणता प्रदेश होता?
१] आसाम
२] पंजाब
३] बंगाल
४] वायव्य सरहद्द प्रांत

उत्तर
४] वायव्य सरहद्द प्रांत
------------------
[प्र.४] मुंबई योजनेच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
१] लाला श्रीराम
२] जी.डी.बिर्ला
३] भुलाभाई देसाई
४] जे.आर.डी.टाटा

उत्तर
३] भुलाभाई देसाई
------------------
[प्र.५] मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली?
१] १८८२
२] १८८३
३] १९८४
४] १८८४

उत्तर
४] १८८४
------------------
[प्र.६] गंगेच्या मैदानामध्ये मानवाच्या वास्तव्याचे सर्वात पहिले अवशेष खालीलपैकी कोठे आढळतात?
१] बागोर
२] कल्पी
३] आदमगड
४] टेरीस

उत्तर
२] कल्पी
------------------
[प्र.७] योग्य जोडी ओळखा.
अ] आदिनाथ चरित्र - वर्धमान
ब] शांतीनाथ चरित्र - देवचंद्र
क] पृथ्वीचंद्र चरित्र - शांतीसुरी

१] फक्त अ
२] फक्त क
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सूर्यमंदिर आढळते?
१] श्रीशैलम [आंध्रप्रदेश]
२] मोधेरा [गुजरात]
३] हळेबिड [कर्नाटक]
४] सिकर [राजस्थान]

उत्तर
२] मोधेरा [गुजरात]
------------------
[प्र.९] घटना कालानुक्रमे लावा.
अ] राष्ट्रीय सभेची स्थापना
ब] खिलाफत चळवळ
क] मुस्लिम लीगची स्थापना
ड] जहाल मवाळ फुट

१] अ-ब-क-ड
२] अ-क-ड-ब
३] अ-ड-क-ब
४] ड-अ-क-ब

उत्तर
२] अ-क-ड-ब
------------------
[प्र.१०] ब्रिटीश भारतातील रयतवारी महसूल प्रशासनासंबंधी खालीलपैकी कोणाचे नाव महत्वाचे आहे?
१] थॉमस मनरो
२] आर.एम.बर्ड
३] चार्ल्स नेपिअर
४] जोनाथन डंकन

उत्तर
१] थॉमस मनरो
----------------------------------