प्रश्नसंच ९५ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत नाही?
१] ज्वलन
२] श्वसन
३] किण्वन
४] प्रकाश संश्लेषण

उत्तर
४] प्रकाश संश्लेषण
------------------
[प्र.२] रासायनिक रूपातील शुष्क बर्फ म्हणजे काय?
१] शुष्क सल्फर डायऑक्साइड
२] शुष्क कार्बन डायऑक्साइड
३] शुष्क क्लोरीन
४] रासायनिक क्रिया करून बनवलेला वर्फ

उत्तर
२] शुष्क कार्बन डायऑक्साइड
------------------
[प्र.३] संतृप्त सोडियम क्लोराईडला उष्णता दिल्यास तो . . . . .
१] विद्युत वाहक बनेल
२] अतिसंतृप्त बनेल
३] असंतृप्त बनेल
४] रंगहीन बनेल

उत्तर
३] असंतृप्त बनेल
------------------
[प्र.४] परमशुन्य तापमान म्हणजेच . . . . . .
१] ज्या तापमानामुळे द्रवाचे बाष्प बनते.
२] ज्या तापमानामुळे द्रवाचे स्थायू बनण्यास सुरुवात होते.
३] कोणत्याही तापमानाचा आरंभ बिंदू असतो.
४] शास्त्रीयदृष्ट्या सर्वात न्यूनतम तापमान असते.

उत्तर
४] शास्त्रीयदृष्ट्या सर्वात न्यूनतम तापमान असते.
------------------
[प्र.५] चुकीची जोडी ओळखा.
१] रेशीम - पॉलीअमाईड
२] इंडिगो [नीळ] - एजोरंजक
३] लाइपेज - उत्प्रेरक
४] कॅरोटीन – प्रोटीन

उत्तर
२] इंडिगो [नीळ] - एजोरंजक
------------------
[प्र.६] लोखंडाच्या पाईपांना जास्ताचे लेपन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
१] Electroplating
२] Annealing
३] Galvanization
४] Vulcanization

उत्तर
३] Galvanization
------------------
[प्र.७] समभारी [Isobar] म्हणजेच
१] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा भिन्न असतो.
२] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा समान असतो.
३] अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो व अणुअंक हा समान असतो.
४] अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो व अणुअंक हा भिन्न असतो.

उत्तर
१] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा भिन्न असतो.
------------------
[प्र.८] उत्प्रेरक पदार्थ म्हणजे असा पदार्थ जो . . . . . .
१] रासायनिक अभिक्रिया थांबवतो
२] रासायनिक अभिक्रिया सुरु करण्यास मदत करतो
३] रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतो
४] रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो

उत्तर
४] रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो
------------------
[प्र.९] योग्य विधान ओळखा.
१] मार्शगॅस म्हणजेच मिथेन वायू
२] मार्शगॅस कोळश्याच्या खाणीत सापडतो
३] मार्शगॅस हा गोबरगॅसमध्ये मुख्यत्वे आढळतो
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या क्रियेत बेंझीन वापरतात?
१] साबण तयार करण्यासाठी
२] वॉटरप्रुफ कपडे तयार करण्यासाठी
३] पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून
४] वीजनिर्मिती केंद्रात

उत्तर
३] पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून
----------------------------------