प्रश्नसंच ९२ - [राज्यघटना]

[प्र.१] भारतीय नागरीकात्वासंबंधी व्यापक तरतुदी कोणत्या कायद्याने करण्यात आल्या?
१] १९४७चा कायदा
२] १९३५चा कायदा
३] १९५५चा कायदा
४] १९४९चा कायदा

उत्तर
३] १९५५चा कायदा
------------------
[प्र.२] राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागचा उद्देश काय?
१] राजकीय लोकशाहीची स्थापना
२] सामाजिक लोकशाहीची स्थापना
३] गांधीवादी लोकशाहीची स्थापना
४] सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना

उत्तर
४] सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या प्रकाराने भारतीय नागरिकत्व प्राप्त होते?
अ] नोंदणी करून
ब] वारसा हक्काने
क] जन्माने

१] फक्त अ आणि क
२] फक्त ब आणि क
३] वरील सर्व
४] फक्त क

उत्तर
३] वरील सर्व
------------------
[प्र.४] जनहित याचिका या सकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
१] नॉर्वे
२] अमेरिका
३] कॅनडा
४] भारत

उत्तर
२] अमेरिका
------------------
[प्र.५] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ४८
२] कलम ४९
३] कलम ५०
४] कलम ५१

उत्तर
४] कलम ५१
------------------
[प्र.६] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये होतो?
अ] वेठबिगार व मानवी तस्कर बंदी
ब] अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.७] सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आली आहे?
१] कलम १४
२] कलम १६
३] कलम २०
४] कलम २१

उत्तर
२] कलम १६
------------------
[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला?
१] २४ वी
२] ४२ वी
३] २५ वी
४] २७ वी

उत्तर
२] ४२ वी
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] रोजगाराचा अधिकार हा मुलभूत हक्क आहे.
ब] संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर हक्क आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.१०] कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आदेश काढू शकतात?
१] कलम ३२
२] कलम ३१
३] कलम २२६
४] कलम २१६

उत्तर
३] कलम २२६
--------------------------------