प्रश्नसंच १०८ - [विज्ञान]

[प्र.१] कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून पाळला जातो?
१] डॉ. चंद्रशेखर बोस
२] डॉ.चंद्रशेखर वेंकटरमण
३] डॉ. रामचंद्र वेंकटरमण
४] डॉ. जगदीशचंद्र बोस  

उत्तर
२] डॉ.चंद्रशेखर वेंकटरमण
------------------
[प्र.२] "सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध" कोणी लावला?
१] केप्लर
२] आईनस्टाईन
३] न्यूटन
४] एडिसन

उत्तर
३] न्यूटन
------------------
[प्र.३] कर्करोगात पेशींचे विभाजन कोणत्या पद्धतीने होते?
१] सूत्री विभाजन
२] अर्धसुत्री विभाजन
३] अनियंत्रित सूत्री विभाजन
४] अनियंत्रित अर्धसुत्री विभाजन

उत्तर
३] अनियंत्रित सूत्री विभाजन
------------------
[प्र.४] मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ या दरम्यान असते.
१] ०.००२ KHz ते ०.२०२ KHz
२] ०.२ KHz ते २.२ KHz
३] ०.०२ KHz ते २० KHz
४] २ KHz ते २० KHz

उत्तर
३] ०.०२ KHz ते २० KHz
------------------
[प्र.५] रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
१] १००%
२] ९७%
३] ९०%
४] ५०%

उत्तर
३] ९०%
------------------
[प्र.६] समुद्राचे पाणी निळ्या रंगाचे दिसते कारण............
१] प्रकाशाचे अपवर्तन
२] प्रकाशाचे अपस्करण
३] प्रकाशाचे विकिरण
४] प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन

उत्तर
३] प्रकाशाचे विकिरण
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणता परपोशींचा पोषण गट जैविकदृष्ट्या महत्वाचा आहे?
१] प्राणीसदृश्य
२] परजीवी
३] अंत परजीवी
४] मृतोपजीवी

उत्तर
४] मृतोपजीवी
------------------
[प्र.८] सूर्य सोडून पृथ्वीला सर्वात जवळचा तर कोणता?
१] प्रोक्झीमा सेंटॉरी
२] अल्फा सेंटॉरी
३] ध्रुव तारा
४] वेगा

उत्तर
१] प्रोक्झीमा सेंटॉरी
------------------
[प्र.९] पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वाहन करतो?
१] rRNA
२] tRNA
३] mRNA
४] xRNA

उत्तर
३] mRNA
------------------
[प्र.१०] खालीलपैकी अनानिल श्वसन [Anaerobic Respiration] पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही?
१] दुधाचे दही होणे
२] अल्कोहोल तयार करणे
३] पाव तयार करणे
४] सायट्रिक आम्ल तयार करणे

उत्तर
४] सायट्रिक आम्ल तयार करणे
----------------------------------