चालू घडामोडी - २९ ऑक्टोबर २०१४


  • भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. 
  • ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त देशात "राष्ट्रीय एकता दिन" साजरा करण्यात येणार आहे. 
  •  आठ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवट लागू  असलेल्या दिल्लीमध्ये सरकार स्थापनेविषयी होत असलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. 
  • जपानमधील टेलिकॉम व इंटरनेट क्षेत्रातील आघाडीच्या "सॉफ्टबँक"ने 'Snapdeal'या ऑनलाईन रिटेलरमध्ये ६२७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 
  • 'मजलिस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लिमीन' (MIM) या पक्षाची महिला शाखा २०१५मध्ये मुंबई येथे सुरु होणार आहे. 
  • १९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक गर्ल चाईल्ड दिनाची थीम : मुलींचे सक्षमीकरण 

चालू घडामोडी - २८ ऑक्टोबर २०१४

  • विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवलेल्या तीन भारतीयांची नावे केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टासमोर सादर केली. 
    1. प्रदीप बर्मन [डाबर इंडिया कंपनीचे माजी संचालक]
      • सध्या 'संदेश' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 
    2. पंकज चिमणलाल लोढीया [श्रीजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन]
    3. राधा सतीश तिन्बोलो [गोव्यातील खाण व्यावसायिक तिन्बोलो समूहाच्या प्रतिनिधी]
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या एकूण २२ बैठका होणार आहेत.
  • सानिया मिर्झा आणि कारा ब्लेक (झिम्बाब्वे) यांनी WTA फायनल जिंकली. 
  • रशियाकडून आयात केलेल्या 'सुखोई-३०' विमानाला अपघात झाल्याने तांत्रिक चाचणी होईपर्यंत संरक्षण मंत्रालयाने या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. 
  • देशाच्या पश्चिम किना-यावर निलोफर चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. 
  • पेशंटला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी 'अरमान'या सामाजिक संस्थेने 'मुंबई हिरो' उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे आयसीयू आणि रक्ताची उपलब्धता याबाबतची माहिती संगणक व मोबाईलद्वारे पुरविण्यात येईल. 


सामान्य ज्ञान
  • एडीस इजिप्ती नामक डासांमुळे डेंग्यू रोगाचा प्रसार होतो.
  • भारताने विविध देशांकडून आयात केलेली लढाऊ विमाने 
    • रशिया - मिग-२५, मिग-२७, मिग-२९, सुखोई-३०
    • ब्रिटन - जॅग्वार
    • फ्रांस - मिराज २०००
    • अमेरिका - हर्क्युलस