चालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१४

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  ट्विटरवर फॉलोअर्स ८० लाखांच्या घरात पोहोचले आहेत.

·        अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पोप फ्रान्सिस यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा तिसरा क्रमांक लागतो.

·        मोदींचे फेसबुकवर १ कोटी ५० लाख चाहते असून  फॉलोअर्सच्या चाहत्यांमुळे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत.

·        गुगलने खास बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या वैदही रेड्डीने बाजी मारली होती.

·        बालदिनी गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून वैदहीने आसामवर रेखाटलेले चित्र दाखविण्यात आले.

·        गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २० नोव्हेंबर रोजी थाटात उद्घाटन झाले.

·        महोत्सवाचे प्रमुख अतिथी : अमिताभ बच्चन

·        पुढील वर्षी इफ्फीसाठी गोव्यातील दोनापावला येथे स्वतंत्र संकुल निर्माण करण्यात येणार

·        ४५व्या इफ्फीचे औचित्य साधून दक्षिणी अभिनेते रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते शताब्दी पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले.

·        जागतिक प्रसाधनगृह दिवसाच्या (World Toilet Day) निमित्ताने संयुक्त राष्ट्राने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५९० कोटी लोक प्रसाधनगृहाचा वापर करत नाहीत.

·        त्यापैकी ५९.७ कोटी उघड्यावर प्रातर्विधी उरकणारे लोक भारतातील आहेत. भारत देशातील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण जवळपास ४७ टक्के आहे.

·        संयुक्त राष्ट्रांनी टेक पू टू द लूमोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे उघड्यावर बसण्याचा धोका कमी होणार आहे.

·        भारताने २०१९ पर्यंत ११ कोटी प्रसाधनगृह बांधण्याचे ठरवले आहे.

·        जागतिक प्रसाधनगृह दिवस ( World Toilet Day ): १९ नोव्हेंबर

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या महाधिवक्तापदावर नागपूर हायकोर्टातील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांची नियुक्ती केली आहे.

·        राज्याचे महाधिवक्ता दरायस जहांगीर खंबाटा यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती.

·        श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली.

·        अध्यक्ष म्हणून राजपक्षे यांची ही दुसरी टर्म आहे. श्रीलंकेत अध्यक्षपदाचा कालावधी सहा वर्षाचा असतो.

·        आताही त्यांचा सहा वर्षाचा कालावधी २०१६मध्ये पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी निवडणुकीची घोषणा केली आहे.

·        सर्वोच्च न्यायालयाद्वारे १० वर्षांतील रद्द करण्यात आलेल्या कोळसा खाणींच्या लिलावाची नवी प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

·        पहिल्या टप्प्यात ७४ खाणींसाठी ई-लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

·        भारताचा महत्त्वाकांक्षी अवकाश प्रकल्प मंगळ मोहिमेसाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजी सरकारचे आभार मानले आहेत.

·        मंगळ मोहिमेचा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून भारताचे आघाडीचे शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या अभियंत्यांनी फिजीमध्ये तळ ठोकला होता.

·        ही संपूर्ण मोहीम फिजीतून ऑपरेट करण्यात आली होती.

·        एमएमआरडीएच्या बैठकीनंतर मुंबई मेट्रो-२, मेट्रो-५ ला प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

·        मेट्रो-२ साठी २५ हजार ६०५ कोटी तर मेट्रो-५ साठी १९ हजार ९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

·        मेट्रो-२ प्रकल्पामध्ये दहिसर, चारकोप ते मानखूर्द आणि वांद्रे या मार्गाचा समावेश आहे.

·        मेट्रो-५ प्रकल्पामध्ये वडाळा, घाटकोपर ते ठाणे आणि कासारवाडवली या मार्गाचा समावेश आहे.

·        यंदाच्या प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता पुरस्कारासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोची निवड करण्यात आली आहे.

·        यंदाचा गदिमा पुरस्कारज्येष्ठ लेखक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिकास दिला जातो.

·        ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

·        नव्या उभारीच्या प्रतिभावंताना देण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्कारासाठी कवी संदीप खरे यांची निवड करण्यात आली.

·        तर गदिमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांना देण्यात येणार आहे.

·        गायिका उर्मिला धनगर यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे.

·        शिवाय मराठी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणारी हातकणंगले येथील विद्यार्थिनी नेहा शांतीनाथ पाटील हिला गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा