चालू घडामोडी - ५ नोव्हेंबर २०१४

  • IPL-६ दरम्यान झालेल्या बेटिंग व  स्पॉटफिक्सिंगबाबत एन. श्रीनिवासन व अन्य १२ क्रिकेटपटूविरोधात न्या. मुकुल मृदगल समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. 
    • ICC चे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना क्लिनचिट देण्यात आली. 
    • श्रीनिवासान यांचे जावई व चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे माजी प्रमुख गुरुनाथ मय्यपन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 
  • कॅलिफोर्नियाच्या ब्रिटनी मेनार्ड या २९ वर्षीय महिलेने इच्छामरण पत्करले. 
    • तिला ग्लिओब्लास्टोमा हा चौथ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर होता. 
    • कॅलिफोर्नियामध्ये इच्छामरणाला परवानगी नसल्यामुळे तिने ओरेगॉनमधील पोर्टलँडला स्थानांतर केले आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्या गेलेल्या विशिष्ट मात्रेच्या प्रमाणित औषधांच्या माध्यमातून तिने मरण पत्करले.  
  • इंडिया कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सच्या अध्यक्षपदी लोकेश चंद्रा यांची निवड करण्यात आली. 
  • केंद्रीय अर्थसचिव म्हणून राजीव महर्षी यांची नियुक्ती. 
  • मराठी रंगभूमी दिन : ५ नोव्हेंबर