चालू घडामोडी - ४ व ५ डिसेंबर २०१४

·        ४ डिसेंबर – राष्ट्रीय नौदल दिन

·        श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती धिमी राखल्याबद्दल इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला एका एकदिवसीय सामन्यातून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम वजा करण्यात आली आहे.

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आवाजी मतदानाने सिद्ध केलेले विश्वासमत आणि त्या पद्धतीने विश्वासमत सिद्ध करण्यास मंजुरी देण्याचा दावा सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मंजुरीप्रकरणी आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी केलेल्या याचिका फेटाळून लावल्या.

·        वाहनांच्या 'आरसी बुक'साठी 'स्मार्ट कार्ड'च्या कंत्राटाचे नूतनीकरण करणार नसल्याचे परिवहन विभागाने अचानक कळविल्याचा आरोप करीत 'रोझमेर्टा'ने उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारचा निर्णय रद्द ठरविण्याची व करार पुढे सुरू ठेवू देण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

·        वाहनांच्या खरेदीनंतर वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) 'स्मार्ट कार्ड'च्या रूपात उपलब्ध देण्याप्रकरणी 'रोझमेर्टा टेक्नॉलॉजी' कंपनीने राज्य सरकारसोबत केलेला करार दीड वर्षांपूर्वीच संपुष्टात आल्याने कंपनी राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर दावा करू शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.

·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी दुपारी पहिला विस्तार झाला. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली.

·        भाजपचे कॅबिनेट मंत्री

·        गिरीश बापट - विधीमंडळ कामकाज आणि अन्न व नागरी पुरवठा

·        गिरीश महाजन - जलसिंचन

·        बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता

·        राजकुमार बडोले - सामाजिक न्याय

·        चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा

·        शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री

·        सुभाष देसाई - उद्योग

·        दिवाकर रावते - वाहतूक

·        एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)

·        रामदास कदम - पर्यावरण

·        डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण

·        राज्यमंत्री-

·        राम शिंदे (भाजप) - गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन

·        विजय देशमुख (भाजप) - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग

·        महाराज अमरिश अत्राम (भाजप) - आदिवासी विकास

·        रणजित पाटील (भाजप) - विधी व न्याय विभाग

·        प्रविण पोटे पाटील (भाजप) - उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(सार्व.उपक्रम वगळून)

·        संजय राठोड (शिवसेना) - महसूल

·        दादाजी दगडू भूसे (शिवसेना) – सहकार

·        दिपक केसरकर (शिवसेना) - वित्त, ग्रामविकास

·        विजय शिवतारे (शिवसेना) - जलसंपदा, जलसंधारण

·        रविंद्र वायकर (शिवसेना) - गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण

·        पश्चिम कैरोत गेल्यावर्षी ११ पोलिसांना ठार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने १८८ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी  १० पोलिसांना ठार केल्याचा आरोप आहे

·        अध्यक्ष मोर्सी यांच्या हकालपट्टीनंतर २२००० जणांना अटक करण्यात आली असून त्यात मुस्लीम ब्रदरहूडच्या नेत्यांचा समावेश आहे. आताच्या निकालावर इजिप्तमधील नियमानुसार सर्वोच्च धर्मगुरूंचे शिक्कामोर्तब होणे आवश्यक असून अंतिम निकाल २४ जानेवारीला दिला जाईल.

·        संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत देशांनी अण्वस्त्रमुक्त होण्याबरोबरच स्वत:कडील सर्व अण्वस्त्रे नष्ट करण्याचा ठराव मांडण्यात आला.

·        यात भारतासह अमेरिका, पाकिस्तान व इतर १६९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर सात देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. चीन आणि भुतान यांच्यासह पाच देशांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

·        रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक वेळा हॅट्ट्रिक नोंदवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ला लीगामधील २३वी हॅट्ट्रिक आणि २००वा गोल करत रोनाल्डोने रिअल माद्रिदला सेल्टा व्हिगोवर ३-० असा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

·        टेल्मो झारा आणि रिअल माद्रिदचे महान फुटबॉलपटू अल्फ्रेडो डी स्टेफानो यांचा २२ वेळा हॅट्ट्रिक लगावण्याचा विक्रम रोनाल्डोने मागे टाकला. त्याचबरोबर त्याने १७९ सामन्यांत २०० गोल झळकावण्याची करामत केली.

·        या विजयामुळे रिअल माद्रिदने सर्व स्पर्धामध्ये सलग १८ सामने जिंकण्याचा स्पॅनिश फुटबॉलमधील विक्रमाशी बरोबरी साधली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा