चालू घडामोडी - ५ जानेवारी २०१५

·        ५ जानेवारी १९४९ : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए) पुणे येथे सुरु झाली.
·        गुजरातच्या पोरबंदरजवळ अरबी समुद्रात तटरक्षक दलाने ३१ डिसेंबरच्या रात्री केलेल्या पाठलागादरम्यान उडवून देण्यात आलेल्या बोटीवरील चौघेजण संशयित दहशतवादीच होते.
·        ते पाकिस्तानी लष्कर आणि मेरीटाईम अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसे काही परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्याचे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिले.
·        रविवारी एका सभेत ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावल्यानंतर, तृणमूलच्या कार्यकत्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.
·        देबाशिष आचार्य असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात तीन ठिकाणी तसेच शरीरावर अन्यत्रही जखमा झाल्या असून त्याच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
·        छत्तीसगडमधील रायगड या शहराच्या महापौरपदी तृतीयपंथी मधू किन्नर यांची निवड झाली आहे.
·        अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मधू किन्नर यांनी भाजपच्या महावीर चौहान आणि काँग्रेसच्या जेठुराम मनहर याMadhu Kinnar उमेदवारांचा ९५०० मतांनी पराभव करत महापौरपदाची निवडणूक जिंकली.
·        छत्तीसगडच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथीयाने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे, राजकारणात प्रवेश करणाऱ्या मधू किन्नर यांनी पहिल्याच प्रयत्नात थेट महापौरपद काबीज केले आहे.
·        याआधी २००० मध्ये मध्य प्रदेशमधील सुहागपूर मतदारसंघातून शबनम मौसी यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली होती. देशाच्या इतिहासात तृतीयपंथीय व्यक्तीची लोकप्रतिनिधी म्हणून निवड होण्याची ती पहिली वेळ होती.
·        पासपोर्ट सेवेचे अत्याधुनिकीकरण असणारी ‘ई-पासपोर्ट’ सेवा पुढील वर्षीपासून प्रत्यक्षात येणार आहे. सध्या या प्रक्रियेचे टेंडर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
·        साधारणतः पुढील वर्षी ई-पासपोर्ट सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी दिली.
·        अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान योग्य प्रकारे कारवाई करत आहे, असे प्रमाणपत्र अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी दिले आहे. त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळू शकणाऱ्या आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
·        पाकिस्तानला प्रतिवर्षी १.५ अब्ज डॉलर्स आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद असलेले केरी-लुगार विधेयक २०१० साली अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर करण्यात आले आहे. याअंतर्गत २०१० ते २०१४ पर्यंत पाकिस्तानला मदत देण्याची तरतूद आहे.
·        मात्र, ही मदत मिळविण्यासाठी दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची अट घालण्यात आली होती. पाकिस्तानने यावेळी या अटीची पूर्तता केल्याचे केरी यांनी स्पष्ट केले आहे.
·        केरी यांच्या या प्रमाणपत्रानंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे कोणत्याही क्षणी मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
·        अमेरिकेच्या सिनेटवरील लोकांमधून निवडून आलेले पहिले कृष्णवर्णीय सिनेटर एडवर्ड डब्ल्यू. ब्रूक यांचे फ्लोरिडातील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
·        ते १९६६ मध्ये मेसॅच्युसेट्समधून सिनेटवर निवडून गेले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा