चालू घडामोडी - ३१ जानेवारी २०१५

·      आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ब्रिटिश लेखक सलमानSalman Rushdie रश्दी यांच्या नवीन कथासंग्रहाचे टू इअर्स एट मंथस अँड ट्वेंटी एट नाईट्स असे नाव असून, त्यामध्ये अरेबियन नाईट्सप्रमाणेच लोककथांचा समावेश आहे.
·      या सर्व कथांमधून वाचकांना इतिहास, पुराणशास्त्र, काळाचे बंधन नसलेल्या प्रेमकथा अशा सर्व घटकांचा आस्वाद घेता येईल.
·      रश्दींविरोधात इराण सरकारने १९८८ मध्ये फतवा काढला होता. त्यांच्या सटॅनिक व्हर्सेस कादंबरीतील लिखाणास काही मूलतत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता.
·      त्यांच्या मिडनाईट्स चिल्ड्रन या साहित्याकृतीला १९८१ साली बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
·      गेल्या काही दिवसांत अमेरिकेच्या काही भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यावेळी बोस्टनमधील केरी यांच्या घराबाहेरही बर्फ साचला होता. तो वेळेत न हटविल्याबद्दल स्थानिक प्रशासनाने केरी यांना ५० डॉलरचा दंड ठोठावला.
·      शारदा चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसचे नेते मुकुल रॉय यांची चौकशी केली. सुमारे चार तास चाललेल्या या चौकशीनंतर सीबीआयने आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.
·      दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या स्पाइसजेट या प्रवासी विमान कंपनीला वाचवण्यासाठी या कंपनीचे मूळ मालक असलेल्या अजयसिंह यांनी दीड हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे.
·      दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६७३ उमेदवारांपैकी २३० उमेदवार कोट्यधीश आहेत. या यादीत कॉंग्रेसचे उमेदवार सर्वाधिक असल्याचे एडीआर या संस्थेने नमूद केले आहे.
·      या यादीत शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार (एसएडी) मनजिंदरसिंग सिरसा हे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले असून, त्यांनी २३९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. ते राजौरी गार्डन मतदारसंघातून उभे आहेत.
·      आर. के. पुरममधून रिंगणात उतरलेल्या आपच्या प्रमिला टोकस दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती ८७ कोटी, तर बिजवासनमधील भाजप उमेदवार सतप्रकाश राणा ७८ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
·      कोट्यधीशांच्या यादीत कॉंग्रेसचे सर्वाधिक ५९ उमेदवार आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे ४४ आपचे २८ उमेदवार कोट्यधीश आहेत.
·      अमेरिकाप्रणित आघाडीच्या फौजांनी मागील आठवड्यात इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट (आयसिस) संघटनेचा रासायनिक शस्त्रांमधील एक तज्ज्ञ मारला गेला, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली.
·      अबू मलिक असे ठार झालेल्या तज्ज्ञाचे नाव आहे. लष्करी बळाच्या गैरवापराच्या आरोपावरून इराकचे फाशी देण्यात आलेले सद्दाम हुसेन यांच्या मुथाना रासायनिक शस्त्र निर्मिती कारखान्यात तो पूर्वी काम करीत होता.
·      नंतर तो २००५ मध्ये इराकमधील अल-कायदामध्ये दाखल झाला. आयसिसचा तो अभियंता होता. मोसुल भागात २४ जानेवारी रोजी तो ठार झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा