चालू घडामोडी - ७ फेब्रुवारी २०१५

·        गुजरातमधील वापी येथे देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी प्लास्ट इंडिया परिषदेत बोलताना केली.
·        यासाठी गुजरात सरकार मॅसॅच्युसेट्‌स लोवेल विद्यापीठाचे सहकार्य घेणार आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून प्लॅस्टिक उद्योगास कुशल मनुष्यबळ पुरविले जाणार आहे.
·        गांधीनगरमध्ये ७ फेब्रुवारीपासून नवव्या प्लास्ट इंडिया-२०१५’ या परिषदेला प्रारंभ झाला. या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री पटेल यांनी राज्यातील प्लॅस्टिक उद्योगाला बळ देण्याचे संकेत दिले.
·        भारताचा परकीय चलनसाठ्यात ५.८४ अब्ज डॉलरची वाढ होऊन तो आता ३२७.८८ अब्ज डॉलर एवढा झाला आहे. परकीय चलनसाठ्यातील ही विक्रमी उच्चांकी पातळी मानण्यात येत आहे.
·        कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने भारताच्या आयातीवरील खर्च कमी होण्यात मदत झाली आहे. आयातीवरील खर्च कमी झाल्याने परकीय चलनसाठा वाढण्यास हातभार लागला आहे.
·        यापूर्वी सप्टेंबर २०११ मध्ये भारताचा परकीय चलनसाठा ३२०.७९अब्ज डॉलर होता.
·        देशातील डिसेंबर २०१४ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे.
·        जगातील सर्वांत मोठेG Talk सर्चइंजिन असलेल्या गुगलने जी टॉक ही सेवा १६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
·        गुगलने या सेवेऐवजी आता गुगल हँगआऊट अॅप्लिकेशन वापरण्याचा सल्ला मेसेजद्वारे आपल्या जी टॉक युजर्सना दिला आहे.
·        गुगल हँगआऊट या सेवेचा वापर करण्यासाठी युजर्सना डेस्कटॉपऐवजी स्मार्टफोन किंवा टॅब्लेटचा वापर करावा लागणार आहे.
·        भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी आनंदाची बातमी मिळाली असून, त्याची पत्नी साक्षीने मुलीला जन्म दिला आहे. गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात धोनीला कन्यारत्न झाले.
·        दिल्ली विधानसभा निवडणुक वैशिष्ट्येDelhi Elections :
·        २,२७,३१६ :- १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदार
·        ३६,९४,९७५ :- १९ ते २९ वर्षे वयोगटातील मतदार
·        ३११ :- १०० वर्षांच्या पुढील मतदार
·         ७१४ :- संवेदनशील मतदान केंद्रे
·        १९१ :- अतिसंवेदनशील मतदान केंद्रे
·        ५५००० :- सुरक्षा कर्मचारी
·        बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून मुख्यमंत्री जतिन राम मांझी यांनी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे विधानसभा बरखास्त करण्याचे आवाहन केले आहे.
·        पाकिस्तानचा आघाडीचा फिरकीपटू सईद अजमल याची गोलंदाजी शैली निर्दोष ठरवीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्या गोलंदाजीवरील बंदी उठविली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा